Saturday, September 24, 2016

कोणी स्वच्छतागृह ( TOILETS ) देता का या ठाणेकराला ? - ठाणे - एक स्मार्ट सिटी



From: Satyajit Shah
Date: 2016-09-10 21:19 GMT+05:30
Subject: कोणी स्वच्छतागृह देता का या ठाणेकराला ?



प्रति ,
माननीय आयुक्त ,
ठाणे महानगर पालिका ,
ठाणे , महाराष्ट्र , भारत
विषय : कोणी स्वच्छतागृह ( TOILETS  ) देता का या ठाणेकराला ?

"स्वछ  ठाणे,  सुंदर ठाणे" हे  एक हृदयाला भिडणारे घोषवाक्य जे कागदोपत्री , वर्तमानपत्रातील जाहिरातीत , वेगवेगळ्या फलकांवर ( HOARDINGS वर ) वाचायला फार छान वाटते , अगदी अभिमानाने उर भरून येतो.  याच ठाणे शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी फिरताना जेव्हा ठाणेकरांच्या शरीरातील मुत्राशयामध्ये , जेव्हा मूत्र ( लघवी ) भरून येते , तेव्हा लघवी करण्यासाठी सार्वजनिक स्वछतागृह न सापडल्याने अगोदर लिहिल्याप्रमाणे अभिमानाने भरून आलेले उर ताबडतोब रिकामे होते. आणि जेव्हा कोठेही स्वच्छतागृह दिसत नाही , आणि असह्य झाल्याने जेव्हा पोट दुखायला लागते तेव्हा  "स्वछ  ठाणे,  सुंदर ठाणे" हे घोषवाक्य आठवून देखील , कागदोपत्री स्वछ  व सुंदर असलेले ठाणे , मनात नसून देखील उघड्यावरच , सार्वजनिक ठिकाणी " ठाने शहराला अस्वच्छ व घाण " करायला भाग पाडतं .
या सोबत शुक्रवार, ९.९.२०१६ रोजी , सायंकाळी मी टिपलेले एक छायाचित्र जोडत आहे .  छायाचित्रातील ठिकाण आहे ठाणे पश्चिम येथील नितीन कंपनी कडून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्ता  व महामार्ग याच्या मध्ये जो पट्टा आहे तो. हा पट्टा छान  पैकी हिरवळ लावून , फिरण्यासाठी मार्गिका ठेऊन , व्यायामासाठी काही साधने ( OPEN GYM ) ठेऊन , छान बनविला आहे .तेथे अनेक सेवानिवृत्त , आजी , आजोबा त्यांच्या नातवंडांना घेऊन येत असतात. अनेक व्यक्ती व्यायाम करायला , फिरायला येत असतात . एवढ्या चांगल्या ठिकाणी , माझ्या माहितीप्रमाणे स्वच्छतागृह नाही . त्या छायाचित्रातील वयोवृद्ध गृहस्थांना देखील " दोस्ती " GROUP ने उभारलेल्या खांबाजवळ असे उघड्यावर लघवी कारणे आवडले नसेल , पण त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी त्या छानश्या ठिकाणाला मुतारी बनवली . माननीय आयुक्त साहेब हे असे उघड्यावर पुरुष मंडळींना शक्य आहे , पण विचार करा कि , महिला वर्गाने असह्य झाल्यावर काय करायचे ?
मला आठवतेय , कि काही वर्षांपूर्वी ठाणे  महानगरपालिकेतील बहुसंख्य नगरसेवकांनी लाखो रुपये ( जनतेच्या करातील ) खर्चून त्यांच्या मतदार संघात त्यांचे  नांव  ठळकपणे लिहिलेली लोखंडी मोट्ठी , उंच प्रवेशद्वारे लावली होती ( जी सध्या दिसत नाहीत , कोठे गायब झाली आहेत माहीत नाही , सगळा करदात्यांचा पैसा पाण्यात ) . त्या प्रवेशद्वाराचा जनतेस ( ठाणेकरांना ) काय फायदा झाला हे त्या माननीय , वंदनीय , आदरणीय , पूजनीय नगरसेवक साहेब च सांगू शकतील . गम्मत पहा ना , त्यातील एका ही नगरसेवकाला ठाणेकर नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वछतागृह बांधावीशी वाटली नाहीत याचे फार दुखः होते. यालाच " संस्कृती " असे म्हणतात का ?
या ठाणे शहरात रस्ते अडवून , करोडो रुपये खर्चून राजकारण्यांकडून  अनेक सण साजरे केले जातात , पण त्यांना देखील ठाणेकर नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वछतागृह बांधावीशी वाटली नाहीत याचे सुद्धा फार दुखः होते.
नागरिकशास्त्र या विषयात "लोकांनी , लोकांसाठी चालविलेले " अशी " लोकशाही " ची व्याख्या शिकलो होतो.

माननीय आयुक्त साहेब , निदान नागरिकशास्त्र या विषयाच्या पाठय पुस्तकातील व्याख्या खरी ठरविण्यासाठी तरी , ठाणेकर नागरिकांच्या सोत्यी साठी ठाणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी पुरुष व महिला स्वच्छता गृहांची ताबडतोब सोय करावी अशी मी एक ठाणेकर करदाता म्हणून हात जोडून आपणाला  विनंती करतो.
आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित अ शाह - ठाणे
०९८२११५०८५८
प्रत ( C C TO :  ) : माननीय आमदार श्री. संजय केळकर साहेब यांना


No comments:

Post a Comment