Sunday, April 26, 2020

" कोरोना टाळेबंदी कोणासाठी ? " - एक स्वरचित उपहासात्मक कविता

" कोरोना टाळेबंदी कोणासाठी ?  " - एक स्वरचित उपहासात्मक कविता 


Wednesday, April 22, 2020

SOCIAL DISTANCING ( सामाजिक अंतर ) SCOOTER

SOCIAL DISTANCING ( सामाजिक अंतर  ) SCOOTER


Tuesday, April 14, 2020

करोना , करोना आणि करोना

जेथे पहावं , ऐकावं , वाचावं  तेथे करोना , करोना आणि करोना . 
सगळं वातावरण एकदम नकारात्मक  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत NEGATIVE )  झालं आहे . 
त्याच नकारात्मक वातावरणाचं सकारात्मक  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत POSITIVE ) वातावरणात परिवर्तन  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत TRANSFORMATION  ) करण्यासाठी  आजच लिहिलेली खालील कविता पाठवीत आहे . 
आपणाला हि कविता वाचक , प्रेक्षक , श्रोते यांच्यापर्यंत न्यायची असेल तर अवश्य न्यावी ( माझ्या परवानगीची गरज नाही ) , फक्त  माझ्या नावासकट न्यावी हि नम्र विनंती . .


Sunday, April 12, 2020

घराचे घरपण घालवणारी माणसं 


घराचे घरपण घालवणारी माणसं 


Friday, April 10, 2020

आपले पोलीस

" आपले पोलीस " 

पोलिसांना मानाचा मुजरा ! 

त्यांच्या अविरत परिश्रमावर लिहिलेली हि कविता 


Monday, April 6, 2020

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल

मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल 

" खूप प्रयत्न करून  आज *मास्क* ला पर्यायी मराठी शब्द मिळाला आहे.

मुखनाकसंरक्षकजीवजंतूरोधकहवागाळ झाकोळ पट्टी " . 

हा असा विचित्र संदेश कसं काय ? / काय मग ? ( WHATSAPP ) द्वारे दिनांक ५ एप्रिल , २०२० पासून पसरवला ( VIRAL केला ) जातोय . मराठी भाषेचे अतीव दुःख म्हणजे हा संदेश मराठी आडनाव असलेल्या , मराठी भाषिक व्यक्तींकडूनच अग्रेषित ( FORWARD ) केला  जातोय.  

मराठी भाषिक हे विसरतोय कि हे असले विचित्र संदेश अग्रेषित करून ते मराठी भाषेची टिंगल , टवाळी करताहेत . ते हे विसरताहेत कि मराठी हि मराठी आडनाव असलेल्यांची मातृभाषा (MOTHER TONGUE )  आहे , म्हणजेच आपण आपल्या आईची खिल्ली उडवतोय . 

माझी तरी मराठी भाषा हि  मातृभाषा आहे , आणि मी माझ्या मातृभाषेची  खिल्ली  उडविणारी नाही , उडू देणार नाही . 

ज्या व्यक्तीने हा संदेश बनविला असेल , बहुतेक त्याच्या मेंदूवर कायमचा मुखवटा ( MASK ) लावलेला असेल .  

तुमची मातृभाषा कोणती आहे ? तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान आहे का ?  



Friday, April 3, 2020

आपले पोलीस

पोलिसांना मानाचा मुजरा .

गेले २ /३ आठवडे आपले पोलीस दिवस अन रात्र राबताहेत . त्यांच्या या अथक परिश्रमाला माझा मानाचा मुजरा . सगळ्या पोलिसांना " आपले पोलीस " हि कविता सादर अर्पण . 


Wednesday, April 1, 2020

"खादाड " प्रवृत्ती

"खादाड " प्रवृत्ती :

काही वर्षांपूर्वी , मी FACEBOOK  ( FB ) वरील  “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ” या माझ्या एका गाजलेल्या व " लोकप्रभा " या साप्ताहिकेत छापून आलेल्या लेखात  "खादाड " प्रवृत्ती विषयी लिहिले होते.  मला वाटलं होत कि या प्रवृत्तीच्या व्यक्ती फक्त समाजरूप / समाजचेहरा  (   FACEBOOK  ) या सामाजिक माध्यमात आढळून येतात . पण ते चुकीचं होत कारण मला अश्या प्रवृत्तीच्या व्यक्ती कसं काय ? / काय मग ? ( what'sapp )  या सामाजिक माध्यमावर देखील आढळून आल्या . आज तर हद्दच ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत HEIGHT  ) झाली . आज , , १ एप्रिल , २०२० रोजी भारत देशातील एक सुप्रसिद्ध व्यक्तीने   TWEETER  या सामाजिक माध्यमावर सोबत जोडलेल्या छायाचित्रातील माहिती टाकली होती . व त्यावर  अंबा  ( ज्याला आंबा म्हणतात ) घालून शिरा  ,  येता का  breakfast ( हे आजचं शुद्ध व प्रचलित मराठी )  ला  असे लिहिले होते . 

याला काय म्हणू  ? अजून काय लिहू ? भारतीय कधी प्रगल्भ  ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत MATURE ) कधी होणार ? खरं तर सामाजिक माध्यमांचा उपयोग  सामाजिक प्रभोधनासाठी  , सामाजिक प्रश्नांना वाच फोडण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे . 

माझ्या लेखातील त्या  "खादाड " प्रवृत्ती विषयीचा भाग येथे देत आहे 
 
 "खादाड " प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या   व्यक्तींना  सदा न कदा  खाण्याच्या पदार्थांचे फोटो , किवा स्वतः खात असतानाचे   फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्था संदर्भातील फोटो FB वर टाकण्यात / SHARE करण्यात  फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच ( RICE PLATE ) काय दाखवतील . तर कधी  भजी ,  बटर घातलेली पाव भाजी ,   जिलेबी ,  मिसळ  वगैरे चे फोटो टाकून त्याबरोबर , असे काहीतरी लिहितात या खायला वाट पाहतो,  येता का खायला , कोण कोण येणार हे सगळं गरमा  गरम खायला ? या प्रकारच्या प्रवृत्तींना हि खाण्याच्या पदार्थांची छायाचित्रे अनेकांना TAG करायची देखील एक ( अप )  प्रवृत्ती असते. TAG केल म्हणजे ती सगळी पदार्थांची छायाचित्रे नाईलाजास्तव पाहिलीच  जातात.  सुरुवातीला एवढे खाण्याचे पदार्थ या छायाचित्रातून पाहिले जायचे कि मला न्याहारी देखील करायची इच्छा होत नसे. तसेच  काहीही न खाता मला अनेकदा ढेकर यायची, व अपचन देखील व्हायचं. माझ्या आत्तापर्यंत " हाजमोला " च्या ५ बाटल्या संपवून झाल्या आहेत , त्याचप्रमाणे " GELUSIL " च्या हि ६ बाटल्या संपवून झाल्या आहेत. खूप विचारा अंती हि सगळी खाद्य पदार्थांची छायाचित्रे याला कारणीभूत आहेत हे कळाले . या प्रवृत्तीवर काही उपाय आपल्या कडे असेल तर मला जरूर कळवा .

अश्याच या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झाल . त्याने लग्नातले भरपूर फोटो FB वर टाकले. त्यात लग्नातील विधींचे , जेवणाचे  , एकमेकांना भरवितांना वगैरे असे अनेक  फोटो होते हे वेगळं  सांगायची गरज नाही. गम्मत तर पुढे आहे . त्याने एका HOTEL मध्ये शिरतानाचा  फोटो टाकला होता व लिहिले होते कि मधु चंद्राला आलो आहे. 

जसे खाद्य पदार्थांचे फोटो टाकल्यावर अश्या व्यक्ती लिहितात कि  चला या खायला किंवा येता का खायला ? , अथवा कोण कोण येणार हे सगळं गरमा  गरम खायला ? तसच मला वाटल कि आता ती व्यक्ती लिहिते कि काय , चला या XXXXXX ला किंवा येता का XXXXX ला ? , अथवा कोण कोण येणार XXXXXXXXX ला ? . इतक्यांदा त्या व्यक्तीने अनेक पदार्थ खायला FB वर आमंत्रण दिले होते , पण मी काही  गेलो नव्हतो आणि तसा मला दांडगा अनुभव असल्यामुळे ( अहो काय हे भलताच काय विचार करता ? मी प्रवासाच्या  अनुभवाबद्दल बोलतोय )  म्हणून म्हटलं कि यावेळी  आता त्याचे मन नाही मोडायचे , आणि त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करायचा ,   मी लगेचच  माझी प्रवासाची पेटी ( TRAVEL BAG ) भरायला घेणारच होतो पण तशी  वाक्ये त्या व्यक्तीने तेथे टाकली नव्हती त्यामुळे माझा तसा मोठा पचकाच झाला .