Sunday, September 11, 2016

भ्रमणध्वनी चा जीवघेणा , अतिरेकी उपयोग

नमस्कार , सुंदर दुपार ,

" भ्रमणध्वनी चा जीवघेणा , अतिरेकी उपयोग "


हे छायाचित्र पहा . या छायाचित्रांमध्ये एक तरुण मुलगा , दुचाकीवर प्रवास करीत आहे, आणि प्रवास करताना तो भ्रमणध्वनी यंत्रावर बोलत आहे . गम्मत म्हणजे त्या विभागात एक शाळा देखील आहे त्यामुळे तेथे लहानग्या विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. खरं तर त्याने रस्त्यावर त्याच्या उजवीकडे वळण घेताना हे छायाचित्र टिपले आहे. वळण घेतल्यावर एक वेग नियंत्रक ( SPEED BREAKER ) देखील आहे आहे . तो रस्ता अति वर्दळीचा आहे.

आज काल असे आढळून येत आहे कि असा जीवघेणा प्रताप अनेक व्यक्ती सर्रास पणे जीवावर उदार होऊन करीत असतात , आणि अपघातांना आमंत्रण देत असतात.

करतो कोण आणि मग भोगतो कोण ?

कसा काय भारत देश जगात पुढे मार्गक्रमण करणार ?

( छायाचित्र सुस्पष्ट नाही निघाले , पण मला जो संदेश द्यायचा आहे तो अगदी सुस्पष्ट आहे ) .

भ्रमणध्वनी चा जीवघेणा , अतिरेकी उपयोग " 

No comments:

Post a Comment