Saturday, June 29, 2019

कोण म्हणतो तंत्रज्ञानात भारत देश मागे आहे ? कापूरबावडी उड्डाण पुल


कोण म्हणतो तंत्रज्ञानात भारत देश मागे आहे ?
खड्डे पडणारे रस्ते बनविणे असे हे प्रगत तंत्रज्ञान फक्त भारत या देशाकडे आहे.
ठाणे या एका स्मार्ट सिटी मधील एक जगप्रसिद्ध असा ( उपहासात्मक म्हटले आहे ) कापूरबावडी येथील उड्डाण पुलाचे घाई घाईत उदघाटन २४ जुलै, २०१४ रोजी त्या वेळच्या राज्य शासनाने केलं . त्यानंतर   लगेचच २ ते ५ दिवसात पावसानंतर  त्या उड्डाणपुलावर खड्डे तयार झाले . त्यावर तात्पुरती मलमपट्टी झाली , पुन्हा खड्डे झाले , पुन्हा मलमपट्टी झाली .
सन २०१५, २०१६ , २०१७ , २०१८ या वर्षी देखील त्या उड्डाण पुलावर त्याच ठिकाणी व काही नवीन ठिकाणी पावसानंतर  खड्डे पडले , त्यावर तात्पुरती मलमपट्टी झाली , पुन्हा खड्डे झाले , पुन्हा मलमपट्टी झाली .
काल , म्हणजे २८ जून , २०१९ रोजी पुन्हा मुसळधार पाऊस झाला , पुन्हा खड्डे दिसू लागले . काही दिवसातच त्या खड्ड्यांचे डबके होतील , त्यावर तात्पुरती मलमपट्टी होईल , पुन्हा खड्डे होतील , पुन्हा मलमपट्टी होईल.
दरवर्षी असे नित्य नियमाने खड्डे पडणारा उड्डाण पूल बांधल्याबद्दल , बांधणाऱ्या आस्थापनेचे कौतुक करावेसे वाटते .
खड्डे पडणारे रस्ते बनविणे असे हे प्रगत तंत्रज्ञान फक्त भारत या देशाकडे आहे असेच यावरून वाटते . कोण म्हणतो तंत्रज्ञानात भारत देश मागे आहे ?









Monday, June 24, 2019

" सॅटीस " चा रेनकोट


" सॅटीस " चा रेनकोट


" सॅटीस " ठाणे शहरातील जगप्रसिद्ध असे वास्तुशिल्प ( हे एक उपहासात्मक वाक्य आहे ) . पावसाळा जवळ आला  म्हणून बहुतेक त्या वास्तुशिल्पाला गळू नये म्हणून प्लॅस्टिकच्या भल्या मोठ्ठ्या आवरणाच्या मलमपट्टीची गरज पडली असेल असे भासते . ( हे पाहून रेनकोट घालून शाळेत जाणारे बाल विद्यार्थी मला आठवले . )

अहो एवढे मोठ्ठे वस्तूशिल्प म्हणजे पावसात गळणारच ना ? लगेचच त्याच्या बांधकामाच्या प्रतीवर संशय का हो घेता ?
ठीक आहे मुंबईतील अनेक वस्तूशिल्प वर्षानुवर्षे झाली तरीही त्यांना मलमपट्टीची गरज नाही भासत . फक्त ठाण्याचा पाऊस ( जवळच येऊर चे अरण्य असल्यामुळे ) हा तसा गळकाच असतो , नाही का ?

( ता. क. हे सर्व उपहासात्मक लिहिलं आहे . सुज्ञास अधिक काही सांगण्याची गरज नाही . )

" महाराष्ट्र टाईम्स " - सिटीझन रिपोर्टर चे हा प्रश्न वाचकांसमोर नेल्याबद्दल धन्यवाद .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





महाड- बिरवाडी - दहीवड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत, ग्रामस्थांमध्ये भ...





महाड- बिरवाडी - दहीवड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीती.

महाड- बिरवाडी - दहीवड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत, ग्रामस्थांमध्ये भ...





महाड- बिरवाडी - दहीवड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीती.

Sunday, June 23, 2019

पोलिसांच्या गोलाकार बोधचिन्हाचा खुलेआम वापर


पोलिसांच्या गोलाकार बोधचिन्हाचा खुलेआम वापर 

" पोलिसांच्या बोधचिन्हाचे खुलेआम  विक्री ! " या मथळ्याखाली " मुख्यमंत्री " या साप्ताहिकाच्या सोमवार , २४ जून , २०१९ च्या अंकात एक बातमी छापली याबद्दल मी त्या साप्ताहिकेचे श्री. अनिल शिंदे , व संपादक यांचा आभारी आहे .  

ठाणे शहरातील अनेक खाजगी मालकीच्या दुचाकींच्या  मागे पोलिसांचे बोधचिन्ह असलेले  वर्तुळाकार स्टिकर लावलेल्या , त्याचप्रमाणे " POLICE " असे लिहिलेले आढळून येते .   महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम कलम १३४(६) सहा कलम  मोटर वाहन कायदा कलम १७७ प्रमाणे खाजगी दुचाकींच्या मागे  बोध चिन्ह लावणे , POLICE लिहिणे , खाजगी चार चाकी वाहनात  " POLICE  " फलक ठेवणे  बाबत कायदेशीर कारवाई करण्यात येते. 


याविरुद्ध मी गेली अनेक वर्षे माननीय पोलीस उपायुक्त - वाहतूक - ठाणे यांना अनेकदा पुराव्यानिशी ई मेल द्वारे अनेकदा दाखवून दिले आहे की ठाणे शहरात कोणीही त्यांच्या दुचाकीच्या मागे असे पोलिसांचे गोलाकार बोधचिन्ह असलेले स्टिकर लावतात व बिनधास्तपणे कोणत्याही नाका बंदीतून सही सलामतपणे सुटतात व बेदरकारपणे फिरत असतात . आपल्याला आश्चर्य वाटेल कि माननीय पोलीस उपयुक्त - वाहतूक - ठाणे यांच्या तीन हाथ नाका येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या ,  त्याचप्रकारे अनेक पोलीस , वाहतूक पोलीस स्थानकांच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक  दुचाकीच्या मागे अजून देखील असे पोलिसांचे गोलाकार बोधचिन्ह असलेले स्टिकर लावलेले व "POLICE " लिहिलेले आढळते . 

भारत या देशात नियम सर्वांसाठी सम समान लागू असताना देखील अशी नियमांची पायमल्ली का होते ? हे सगळं पोलिसांना , वाहतूक पोलिसांना का दिसून येत नाही ? 

फेसबुक वर अनेक विद्वान व्यक्ती बहुसंख्य वेळेला कोणत्याही विषयावर टिप्पणी करताना आढळून येतात , पण अश्या व इतर अनेक प्रश्नांविरुद्ध स्वतःहून लढताना मात्र कधीच आढळून येत नाहीत . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !