2016-09-04 20:38 GMT+05:30
प्रति ,
माननीय मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य ,
नमस्कार ,
आपण मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळील " ठाणे " नावाच्या एका शहरात राहणारा मी एक सामान्य रहिवासी आहे.
भविष्यातील होऊ घातलेल्या / घडू शकणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींबद्दल मला कधी कधी अगोदरच जाणीव होत असते . थोडक्यात म्हणजे माझा SIXTH SENSE मला अश्या काही गोष्टींबद्दल त्या गोष्टी घडण्याअगोदरच जाणीव करून देत असतो. अनेकदा त्यातील काही गोष्टी सत्यात येतात / घडतात देखील .
अशीच एक गोष्ट ती बहुअंशी खरी झाली आहे ती म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीचा व श्वान दंशाच्या वाढत जाणाऱ्या घटनांचा प्रश्न , मला या प्रश्नांची जाणीव अंदाजे ५ ते ६ वर्षांपूर्वीच झाली होती व मी हा प्रश्न अक्षरशः गल्ली ते दिल्ली सगळ्यांना कळविला होता , व त्यावर विनाविलंब योग्य ती कार्यवाही करण्यास अक्षरशः सगळ्यांसमोर भीक मागितली होती , पण कोणीही याकडे गंभीरतेने पाहिले नाही आणि त्याचा परिणाम सारा भारत देश भोगत आहे ( " महाराष्ट्र " या आपल्या राज्यात दर रोज अंदाजे ७,७७० व्यक्तींना श्वानदंश होतो. तर "भारत" या देशात दर रोज अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वानदंश होतो .)
अशीच भविष्यात घडू शकणाऱ्या काही गोष्टी मला दिसताहेत , जाणवताहेत , त्यामुळे आपल्या राज्यात अशांतता पसरू शकते , आपण या राज्याचे मुख्यमंत्री असल्याने , जरी मी एक अती सामान्य नागरिक असून देखील एक जागरूक नागरिक या नात्याने , जे मला भविष्यातील दिसतंय ते कळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
माननीय मुख्यमंत्री जी, गेल्या काही दिवसात , महिन्यात , वर्षात काही लोकनियुक्त प्रतिनिधींनी , नेत्यांनी , राजकारण्यांनी ,राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हात उगारण्याच्या काही घटना घडल्या होत्या , काही घटनांमध्ये तर त्यांनी पोलिसांच्या अक्षरशः कानाखाली लगावली होती . माझ्यामते या अश्या घटनांमुळे सामान्य नागरिकांना पोलिसांवर हात उगारण्याची प्रेरणा मिळाली असेल अशी दाट शक्यता आहे , कारण , भारत या देशात सामान्य नागरिक हे अनुकरण प्रिय आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा लोकनियुक्त प्रतिनिधी , नेते, राजकारणीच पोलिसांवर हात उगारतात त्यानंतर पोलिसांबद्दलचा दरारा सामान्य नागरिकांमध्ये कसा काय कायम राहणार ? आताच असे कळले कि " महाराष्ट्र " राज्यातील धुळे येथे वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्री. पी एस ढोले यांना नागरिकांनी मारहाण केली. माननीय मुख्यमंत्री जी, हे असे चालू राहिले तर हे सगळं अराजकेकडे जाण्याची लक्षणं दिसतात.
- या पूर्वी लोकलच्या मोटरमन वर नागरिकांनी हल्ले केले आहेत , रुग्णालयातील डॉक्टरांना नागरिकांनी मारहाण केली होती , आत्ता तर नागरिकांची पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली आहे.
- भविष्यात नेते , राजकारणी, मंत्री अश्या व्यक्तींवर देखील असे हल्ले उदभवतात .
हि सगळी भावी अराजकतेची लक्षणे वाटतात . माननीय मुख्यमंत्री जी ,अश्या या सगळ्या गोष्टी भविष्यात घडू शकतील असे मला वारंवार वाटतं . या पूर्वीचा असा अनुभव आहे कि मला जे भासते , वाटते, भविष्यातील जे दिसते ते अनेकदा कालांतराने सत्यात उतरते.
हे असे काही होऊन आपल्या राज्यात अराजकतेचे वातावरण पसरू नये म्हणून म्हणून जरी मी एक अति सामान्य नागरिक असून हि , एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या निदर्शनास आणण्याचे धाडस करीत आहे.
आपल्या राज्या तील जनता शांततेने राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
आपला कृपाभिलाषी .
सत्यजित अ शाह - ठाणे
०९८२११५०८५८
No comments:
Post a Comment