Wednesday, September 7, 2016

लेप्टोस्पायरोसिस - " उंदीर , घुशींचा नायनाट करावा "

लेप्टोस्पायरोसिस - " उंदीर , घुशींचा नायनाट करावा "

हे असे बृहन्मुंबई महानगरपालिका - सार्वजनिक आरोग्य खाते यांनी बुधवार , 7 सप्टेंबर , 2016 च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीरुपी जाहिरातीत लिहिले आहे.

त्या जाहिरातीत " लेप्टोस्पायरोसिस " हा एक रोग कोण कोणत्या प्राण्यांमुळे होतो , त्या प्राण्यांची छायाचित्रे देखील त्या माहितीरुपी जाहिरातीत सुस्पष्ट पणे दिली आहेत.

मला मिळालेल्या माहितीनुसार " डोंबिवली " या शहरात भटक्या कुत्र्यांमुळे दर रोज अंदाजे 2 ते 2.5 टन विष्ठा जमा होते. त्या मुळे सुद्धा " लेप्टोस्पायरोसिस " या रोगाची लागण होते.

पण कित्ती गम्मत आहे ना , फक्त " उंदीर , घुशींचा नायनाट करावा " हे असे सुस्पष्ट पणे त्या माहितीरुपी जाहिरातीत लिहिले आहे ?

सध्या गणेशोत्सव म्हणजे गणपती बाप्पा चा सण सुरु आहे. या गणपती बाप्पाचे वाहन उंदीर ( मूषक ) आहे. त्याच मूषकांचा / उंदरांचा नायनाट करावा हे योग्य वाटते का ?

माझ्या माहितीप्रमाणे उंदीर , घुशी हे सुद्धा प्राणीच आहेत .( माझी हि माहिती चुकीची असेल तर कृपया मला कालवा म्हणजे माझी चूक सुधारता येईल.
भारत या देशात प्राणी मित्र प्राणी मैत्रिणी यांच्या शब्द कोशात प्राणी म्हणजे फक्त आणि फक्त भटका कुत्रा अशीच व्याख्या आहे असे भासते . ) मग फक्त त्यांचीच हत्या का करायची ?

आता " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रिणी " कोठे गायब झाल्या ? या विरुद्ध त्यांनी का नाही आवाज उठविला ?

हे सगळं दुटप्पी धोरण फक्त " भारत " या देशातच पाहायला मिळतं.

No comments:

Post a Comment