नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
"मोकाट कुत्र्यांची दहशत"
नागपूरच्या " लोकमत " या वृत्तपत्राच्या 7 सप्टेंबर , 2016 च्या अंकात नागपूर पुरवणीच्या प्रथम व द्वितीय पृष्ठावर आलेली हि बातमी. ( खरं तर सकाळी सकाळीच हि बातमी अंजु ताई ने फेसबुक वर दिली होती , त्यासाठी तिचे कौतुक ) .
बाकी बातमी वाचल्यावर तुम्हाला सगळं कळेलच. थोड्या फार फरकाने भारत भर हेच चित्र आहे .
मोकाट कुत्र्यांची दहशत
नागरिकांनी फिरणे सोडले : सायकलिंगही बंद केली
नागपूर : शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. कुत्र्यांच्या धास्तीमुळे काही नागरिकांनी सकाळ- सायंकाळ 'वॉक' करणे सोडले आहे तर काहींनी सायकलिंग करणे बंद केले आहे. काही नागरिकांनी तर येण्याजाण्याचा रस्ताही बदलला आहे.
बेवारस कुत्र्यांपासून सर्वांनाच असुरक्षितता वाटू लागली आहे. झोपडपट्टी पासून ते पॉश वस्तीत राहणारे नागरिकही भयग्रस्त आहेत. बेवारस कुत्र्यांचा आतंक पाहून नागरिकांनी नगरसेवक व महापालिकेच्या अधिकार्यांकडे तक्रार केली होती. मात्र, महापालिकेतर्फे आजवर कुठलीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. शहरातील बहुतांश भागात रात्री ८ नंतर लोक पायी चालायला, सायकलने फिरायला किंवा दुचाकीने जायलाही घाबरतात.
कोण घेणार दखल ?/२ अनेकांना घेतला चावा
गेल्या काही वर्षात बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मात्र, महापालिकेतर्फे उपाय योजले गेले नाहीत. रस्त्यावर फिरणारे बेवारस कुत्रे पायी जात असलेल्या नागरिकांवर तसेच दुचाकीस्वारांवर हल्ला करून त्यांना चावा घेत आहेत. सदर येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोरील उड्डाण पुलावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर कुत्र्यांनी हल्ला चढविला होता. यात चालक गंभीर जखमी झाला होता. अशाच घटना दररोज घडत आहेत. असे असले तरी महापालिकेकडे बेवारस कुत्र्यांची आकडेवारी नाही व नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाची उपाययोजनाही नाही.
कोण घेणार दखल ?
मोकाट कुत्र्यांची दहशत : मनपा मात्र सुस्त
मनपाला गंभीर व्हावे लागेल
शहरात बेवारस कुत्र्यांची दहशत निर्माण होणे गंभीर आहे. महापालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. नागरिकांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
- सुनील मनोहर, माजी महाधिवक्ता नागपूर : इमामवाडा, गांधीसागर, संत्रा मार्केट, कडबी चौक, सदर, गड्डी गोदाम, सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टीखदान, बोरगांव, झिंगाबाई टाकळी, नारा-नारी, वर्धा रोड, अजनी, राहटे कॉलनी, नंदनवन, वर्धमान नगर आदी भागात बेवारस कुत्र्यांची दहशत आहे. सेमिनरी हिल्स, रामगिरी, सिव्हिल लाईन्स, फुटाळा तलाव, तेलंखेडी, अंबाझरी, व्हीएनआयटी, वर्धमान नगर आदी भागात लोक सकाळी व सायंकाळी फिरायला जातात. बेवारस कुत्र्यांचा हैदोस वाढल्यामुळे आता या भागात नागरिकांनी फिरायला जाणे सोडले आहे. उत्तम आरोग्यासाठी सायकलिंग करणार्यांनीही याच कारणामुळे सायकलिंग बंद केले आहे. (प्रतिनिधी) मोकाट कुत्र्यांची दहशत : मनपा मात्र सुस्त

No comments:
Post a Comment