Saturday, September 10, 2016

" मराठी भाषेसाठी इंग्रजी कुबड्या "

" मराठी भाषेसाठी इंग्रजी कुबड्या "

शुद्ध मराठी व XXरी आडनांवें असलेल्या मराठी व्यक्तींचीखालील दोन वाक्ये वाचा .

1. ) जेव्हा "पेपरात" ( वर्तमानपत्रात ) ती बातमी वाचली तेंव्हा मला कळले ...
2. ) गाड्या " लेट " ( उशिरा ) होत्या म्हणून " टाईमावर " ( वेळेवर ) नाही पोहचलो "


" पेपरात " , " टाईमावर " , " लेट " असे महा भयंकर , विचित्र असे अमराठी शब्द आज काल स्वतःला अति कर्मठ मराठी व्यक्तींकडून देखील फेसबुकवर वापरलेली दिसते , त्याच प्रमाणे अवती भोवती ऐकू येते .
गंम्मत म्हणजे अशी वाक्ये वापरणाऱ्यांची आडनावे " XX " , " XXXX " , " XX " , " XXX " अशी चक्क XXरी असतात .

मराठीत बोलताना मराठी माणसे पदो पदी इंग्रजी / अमराठी शब्दे का वापरतात हे माझ्या सारख्या एका अमराठी व्यक्तीला सांगेल का ?

आपली मराठी भाषा अशी इंग्रजीच्या कुबड्या घेऊन कधी पासून चालू लागली आहे ?

कधी इंग्रजी बोलणाऱ्यांना "COME ON WE WILL HAVE जेवण" असे बोलताना ऐकले आहे का ? किंवा "JUST NOW I HAD नाश्ता" असे म्हणताना ऐकले आहे का ?

मी तरी नाही ऐकले, पण दोन मराठी व्यक्ती हमखास "चल LUNCH करू" , त्याचप्रमाणे "आत्ताच BREAKFAST झाला" असे हमखास म्हणतात.

No comments:

Post a Comment