Monday, September 19, 2016

" भविष्यातील होऊ घातलेले हल्ले "


2016-09-04 20:38 GMT+05:30

प्रति  ,
माननीय
मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य ,

नमस्कार ,

आपण मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळील " ठाणे " नावाच्या एका शहरात राहणारा मी एक सामान्य रहिवासी आहे.

भविष्यातील होऊ घातलेल्या / घडू शकणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींबद्दल मला कधी कधी अगोदरच जाणीव होत असते . थोडक्यात म्हणजे माझा  SIXTH SENSE मला अश्या काही गोष्टींबद्दल त्या गोष्टी घडण्याअगोदरच जाणीव करून देत असतो. अनेकदा त्यातील काही गोष्टी सत्यात येतात / घडतात देखील .  

अशीच एक गोष्ट ती बहुअंशी खरी झाली आहे ती म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीचा श्वान दंशाच्या वाढत जाणाऱ्या घटनांचा प्रश्न , मला या प्रश्नांची जाणीव अंदाजे ५  ते  ६  वर्षांपूर्वीच झाली होती मी हा प्रश्न अक्षरशः गल्ली ते दिल्ली सगळ्यांना कळविला होता , त्यावर विनाविलंब योग्य ती कार्यवाही करण्यास अक्षरशः सगळ्यांसमोर भीक मागितली होती , पण कोणीही याकडे गंभीरतेने पाहिले नाही आणि त्याचा परिणाम सारा भारत देश भोगत आहे ( " महाराष्ट्र " या आपल्या राज्यात दर रोज अंदाजे ७,७७० व्यक्तींना श्वानदंश होतो तर "भारत" या देशात दर रोज अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वानदंश होतो .)

अशीच भविष्यात घडू शकणाऱ्या काही गोष्टी मला दिसताहेत , जाणवताहेत , त्यामुळे आपल्या राज्यात अशांतता पसरू शकते , आपण या राज्याचे मुख्यमंत्री असल्याने , जरी मी एक अती सामान्य नागरिक असून देखील एक जागरूक नागरिक या नात्याने , जे मला भविष्यातील दिसतंय ते कळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
माननीय मुख्यमंत्री  जी , ती महत्वाची गोष्ट  आपल्याला सांगण्या अगोदर त्याच संदार्भात काही थोडेसे सांगावेसे वाटते. नुकतेच मानवतेला काळिमा फासणारी एक घटना तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या " महाराष्ट्र " राज्यात घडली , ती म्हणजे विलास शिंदे या एका वाहतूक पोलिसांचा कर्त्यव्य बजावता ना  ( एका दुचाकीस्वाराला शिरस्त्राण नाही घातले म्हणून विचारले असता ) , त्याचा राग येऊन त्यांना मारहाण झाली व त्यात विलास शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . खरं  तर नागरिकांकडून कायदे पाळले जातात कि नाही यावर लक्ष्य ठेवण्यासाठी पोलीस या व्यक्तीची नेमणूक झालेली असते. पूर्वीच्या काळात पोलीस या व्यक्तीचा नागरिकांमध्ये आदरयुक्त असा दरारा होता. तो दरारा , तो आदर या अश्या प्रकारच्या अनादरात परावर्तित झाला आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे. हे लिहीपर्यंत पोलिसांवर हात उगारणे, पोलिसांच्या अंगावर गाडी घालणे अश्या प्रकारच्या पुन्हा काही  नवीन  घटना " महाराष्ट्र " राज्यात घडल्या आहेत.

माननीय मुख्यमंत्री  जी, गेल्या काही दिवसात , महिन्यात , वर्षात काही लोकनियुक्त प्रतिनिधींनी , नेत्यांनी , राजकारण्यांनी ,राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हात उगारण्याच्या काही घटना घडल्या होत्या  , काही घटनांमध्ये तर त्यांनी पोलिसांच्या अक्षरशः कानाखाली लगावली होती . माझ्यामते या अश्या  घटनांमुळे  सामान्य नागरिकांना पोलिसांवर हात उगारण्याची  प्रेरणा मिळाली असेल अशी दाट शक्यता आहे ,  कारण , भारत या देशात सामान्य नागरिक हे अनुकरण प्रिय आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा लोकनियुक्त प्रतिनिधी , नेते, राजकारणीच पोलिसांवर हात उगारतात त्यानंतर पोलिसांबद्दलचा दरारा सामान्य नागरिकांमध्ये कसा काय कायम राहणार ? आताच असे कळले कि " महाराष्ट्र " राज्यातील धुळे  येथे वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्री. पी एस ढोले यांना नागरिकांनी मारहाण केली. माननीय मुख्यमंत्री  जी, हे असे चालू राहिले तर हे सगळं अराजकेकडे जाण्याची लक्षणं दिसतात.
पोलिसांच्या अश्या प्रकारच्या खच्चीकरणावरील प्रश्नावर ( पोलिसांचे देखील अनेक प्रश्न आहेत त्यावर देखील शासनाने ताबडतोब अंमलबजावणी करणे गरजेचे आहे ) मी आपल्याला नंतर सविस्तरपणे लिहिणार आहे . येथे  एकच सुचवावेसे वाटते कि आजच्या या घडीला नेत्यांनी , राजकारण्यांनी , लोकनियुक्त प्रतिनिधींनी , नागरिकांनी अश्या प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.
आत्ता सरळ मला भविष्यातील जे दिसते , जे घडण्याची भीती वाटते ते तुम्हाला कळवितो .
- या पूर्वी लोकलच्या मोटरमन वर नागरिकांनी हल्ले केले आहेत , रुग्णालयातील डॉक्टरांना  नागरिकांनी मारहाण केली होती , आत्ता तर नागरिकांची पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत  मजल गेली आहे.
- काही वर्षांपूर्वी ( अंदाजे सन १९८४ )  रोजी पोलिसांचे बंड झाले होते , त्याची पुनरावृत्ती देखील भविष्यात होऊ शकते.
- भविष्यात नेते , राजकारणी, मंत्री अश्या व्यक्तींवर देखील  असे हल्ले उदभवतात .
- गेल्या काही दिवसात एक जगावेगळी पद्धत रुजू होऊ घातली आहे , आणि ती म्हणजे  सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय पायदळी  तुडवणे / सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करणे . जर हे देखील असेच चालत , वाढत राहिले तर या पुढे उच्च न्यायालयाच्या ,  सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना , न्यायाधीशांना देखील मारहाण , त्यांच्यावर हल्ले संभवतात .
- एखादा सामना , एखादी मालिका हरल्यावर क्रिकेटपटुंवर देखील हल्ले संभवतात .

हि सगळी भावी अराजकतेची लक्षणे वाटतात .
माननीय मुख्यमंत्री  जी ,अश्या या सगळ्या गोष्टी भविष्यात घडू शकतील असे मला वारंवार वाटतं . या पूर्वीचा असा अनुभव आहे कि मला जे भासते , वाटते, भविष्यातील जे  दिसते ते अनेकदा कालांतराने सत्यात उतरते.

हे असे काही होऊन आपल्या राज्यात अराजकतेचे वातावरण पसरू नये म्हणून म्हणून जरी मी एक अति सामान्य नागरिक असून हि , एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या निदर्शनास आणण्याचे धाडस करीत आहे.
पोलिसांचे सबलीकरण व्हावे , त्यांना स्वसौंरक्षणासाठी शस्त्रे द्यावीत , राजकारण्यांनी , नेत्यांनी , मंत्र्यांनी पोलिसांवर हात उगारु नयेत , सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयीन निर्णयाचा मान ठेऊन , त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. अश्या काही छोट्या, साध्या व शक्य असणाऱ्या गोष्टी माझ्यासारख्या अति सामान्य नागरिकांच्या डोक्यात येत आहेत. माननीय मुख्यमंत्री  जी , मी हे आपल्याला लिहिण्याचे धाडस केले कारण मी शाळेत असताना नागरिकशास्त्र या विषयात असे शिकलो होतो कि " लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या राज्याला लोकशाही असे म्हणतात " .माननीय मुख्यमंत्री  जी ,  माझ्या हातून काही चूक झाली असेल तर , माफी असावी .  माझा कोणाचाही अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही . आपण मुख्यमंत्री असलेल्या राज्यात या प्रकारे अराजकता, अशांतता पसरू नये या एका प्रामाणिक इच्छे  पायी  हे सगळं आपल्या समोर मांडण्याचे धाडस केले.
आपल्या राज्या तील  जनता शांततेने राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
आपला कृपाभिलाषी .
सत्यजित अ  शाह - ठाणे
०९८२११५०८५८

1 comment:

  1. पूर्णपणे सहमत
    माननीय मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे वाटत आहे.
    पोलिसांनी पण आपले वागणे सुधारणे गरजेचे

    ReplyDelete