Sunday, September 25, 2016

" Top 10 Most Dangerous Animals of INDIA " म्हणजेच " भारतातील 10 अतिशय धोकादायक प्राणी "



" Top 10 Most Dangerous Animals of INDIA  " म्हणजेच " भारतातील 10 अतिशय धोकादायक प्राणी "

अहो दचकू नकात , भारतातील 10 अतिशय धोकादायक प्राण्यांमध्ये 10 व्य स्थानावर भटका कुत्रा ( STRAY DOG ) आहे.

हा लेख कृपया वाचा , आणि बाकीच्यांना देखील सांगा .

http://www.walkthroughindia.com/…/top-10-most-dangerous-an…/

Top 10 Most Dangerous Animals of India
There is reason animals are called as animal, wild animals has their own way to protect their territories and himself, while interacting with human beings or any outsider. Indian has a rich culture of wild forest and exotic animals such as Tiger,Giant King Cobra and other wild animals. Due to deforestation,loss of habitat and pray, wild animals in India are visiting near by villages for pray and attacking on humans. The Asiatic Black Bear, krait snake and Bengal Tiger are few most dangerous wild animal of India. Most of the attacks of wild animals come into picture due to Human interference in their habitat. All animals will defend their territory by fighting with those who try to invade it. Some how monkeys and crocodile also attacked on humans in some part of India.

Snakes
Snakes are considered to be the most deadliest animal on earth, The krait is a type of snake and from the family of Big Four Deadliest Indian Snakes to Humans found in India and considered as one of the most venomous snakes after King Cobra. India has been listed as having the highest number of deaths after snakebites. An estimated 50000 people are killed by snake bites in India every year. Due to the ignorance and the deep-rooted superstitions, Indian peoples start sucking venom from the wound or do their own treatment with the help of local sadhu or ojha.

Tiger
The Royal Bengal Tiger is another deadliest animals in India, Although humans are not regular prey for them, the tiger has killed more people than any other cat. The beautiful creature Tiger kills approximately 800 to 1000 people a year in India. The Bengal tigers of the Sundarbans are listed as man-eaters tigers in India, However man-eaters are mostly old and injured tigers. Man-eaters have been a recurrent problem for India, especially in Garhwal and the Sundarbans mangrove swamps of Bengal, where some healthy tigers also have been known to hunt humans.

Black Beer
In India The Black Bear and the Brown Bear are found in the Himalaya region,The Indian black bear is very aggressive by nature and can attack without any reason. The number of black bear attacks on humans is higher than those of brown bears and other animals. Most of the attacks of black bear in India are happened early in the morning, when villagers entered into the jungle for their work an got face to face with the wild predator of jungle.

Leopard
Leopard is one of the big cat found across all over India, He always spotted while roaming in nearby fields of village for pray. Leopard attacks increase in India in last few years as habitat shrinks and due to depleting forest cover,shortage of prey or for an easy pray. A large number of people are attacked by leopard each year in various parts of India. Latest attack is a leopard has injured several villagers in India and villagers also injured and killied leopard in return.

Elephant
Elephants might look big and slow moving animals, but they can attack very aggressively. The Wild elephants enter the region of India each year in search of food and destroy everything in their path. In heavily forested region of India, Wild elephants have been a serious problem, as they destroy homes and killed many people on a regular basis. Over 2000 people have been killed by wild elephants in various parts of India in the last three years. At the different regions 1000 of elephants are killed by poachers in India every year for their ivory.

Scorpions
There are around 86 different species of scorpions found in India, out of which 50 are dangerous to people. The Giant Indian Black Scorpion is one of the most dangerous to the point of killing humans. The common red Indian scorpion bite killed around 50-80 peoples per year in India.

Mosquito
The mosquito is a common flying insect that is found throughout the India, Females drink blood and nectar. Mosquito bite is very harmful to health,it causes malaria and Dengue fever. A bite from a parasite-infected female Anopheles mosquito causes malaria. Malaria kills more than 200000 people in India each year, Dengue fever also one of the main cause of death due to Mosquito bite in India.

Crocodile
Crocodiles are native of rivers and lakes and well known for their attacks on human, This species of reptiles are considered dangerous to adult humans. Attacks of mugger crocodiles are reported from tribal region of Indian state Kerala in January 2001 and one from Andaman Islands. . In the recent attack of crocodiles in India is British man was attacked and killed by a crocodile in one of the holy river of south India Cauvery River. The river is said to be infested with large number of mugger crocodiles.

Monkey
Monkeys are considered as most sacred animal in India and they should not be killed. There are so many cases reported till now from all around the country regarding the attacks of monkey on humans and injured them very badly. Monkey’s have become a problem in India due to habitat loss and interference of humans into their territories.

Stray Dog
India has a large number of stray dogs around most of the cities, These dogs are very dangerous for children across the street and in their play area. These street dogs have become one of major problem for most of the state authorities and municipality. There are many cases of death due to Rabies and injuries have reported due to stray dog bites in India. The conflict mostly occurred during the mate or fighting season of street dogs. More then 1000 dog bite cases were being reported in last couple of months from all across the country.

Minor killed by stray dogs - THIS HAPPENS IN INDIA

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" Minor killed by stray dogs "

UNI ची " Minor killed by stray dogs " या शीर्षकाची एक बातमी खाली देत आहे.

किती गम्मत आहे ना , कि " भारत " या देशातील " प्राणी मित्र " व " प्राणी मैत्रिणी " यांना भटक्या कुत्र्यांमुळे बळी पडलेल्या बातम्या वाचता येत नाहीत .

Posted at: Apr 13 2016 7:44PM

Minor killed by stray dogs

Raipur, Apr 13 (UNI) A four-year-old boy was fatally mauled by five stray dogs in Aarla village, outskirts of Rajnandgaon District headquarters, police said here today.

The ghastly incident occurred yesterday when nursery student Bhupendra Sahu was sent to a field near his dwelling by his father Mukesh for attending to a call of nature. As the minor was getting late for school, Mukesh told a neighbour to find the child but Bhupendra succumbed before locals could come to the rescue.

Read more at http://www.uniindia.com/minor-killed-by-stray-dogs/states/news/446849.html#TeZGmv3As6Vz2SQs.99

Saturday, September 24, 2016

कोणी स्वच्छतागृह ( TOILETS ) देता का या ठाणेकराला ? - ठाणे - एक स्मार्ट सिटी



From: Satyajit Shah
Date: 2016-09-10 21:19 GMT+05:30
Subject: कोणी स्वच्छतागृह देता का या ठाणेकराला ?



प्रति ,
माननीय आयुक्त ,
ठाणे महानगर पालिका ,
ठाणे , महाराष्ट्र , भारत
विषय : कोणी स्वच्छतागृह ( TOILETS  ) देता का या ठाणेकराला ?

"स्वछ  ठाणे,  सुंदर ठाणे" हे  एक हृदयाला भिडणारे घोषवाक्य जे कागदोपत्री , वर्तमानपत्रातील जाहिरातीत , वेगवेगळ्या फलकांवर ( HOARDINGS वर ) वाचायला फार छान वाटते , अगदी अभिमानाने उर भरून येतो.  याच ठाणे शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी फिरताना जेव्हा ठाणेकरांच्या शरीरातील मुत्राशयामध्ये , जेव्हा मूत्र ( लघवी ) भरून येते , तेव्हा लघवी करण्यासाठी सार्वजनिक स्वछतागृह न सापडल्याने अगोदर लिहिल्याप्रमाणे अभिमानाने भरून आलेले उर ताबडतोब रिकामे होते. आणि जेव्हा कोठेही स्वच्छतागृह दिसत नाही , आणि असह्य झाल्याने जेव्हा पोट दुखायला लागते तेव्हा  "स्वछ  ठाणे,  सुंदर ठाणे" हे घोषवाक्य आठवून देखील , कागदोपत्री स्वछ  व सुंदर असलेले ठाणे , मनात नसून देखील उघड्यावरच , सार्वजनिक ठिकाणी " ठाने शहराला अस्वच्छ व घाण " करायला भाग पाडतं .
या सोबत शुक्रवार, ९.९.२०१६ रोजी , सायंकाळी मी टिपलेले एक छायाचित्र जोडत आहे .  छायाचित्रातील ठिकाण आहे ठाणे पश्चिम येथील नितीन कंपनी कडून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्ता  व महामार्ग याच्या मध्ये जो पट्टा आहे तो. हा पट्टा छान  पैकी हिरवळ लावून , फिरण्यासाठी मार्गिका ठेऊन , व्यायामासाठी काही साधने ( OPEN GYM ) ठेऊन , छान बनविला आहे .तेथे अनेक सेवानिवृत्त , आजी , आजोबा त्यांच्या नातवंडांना घेऊन येत असतात. अनेक व्यक्ती व्यायाम करायला , फिरायला येत असतात . एवढ्या चांगल्या ठिकाणी , माझ्या माहितीप्रमाणे स्वच्छतागृह नाही . त्या छायाचित्रातील वयोवृद्ध गृहस्थांना देखील " दोस्ती " GROUP ने उभारलेल्या खांबाजवळ असे उघड्यावर लघवी कारणे आवडले नसेल , पण त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी त्या छानश्या ठिकाणाला मुतारी बनवली . माननीय आयुक्त साहेब हे असे उघड्यावर पुरुष मंडळींना शक्य आहे , पण विचार करा कि , महिला वर्गाने असह्य झाल्यावर काय करायचे ?
मला आठवतेय , कि काही वर्षांपूर्वी ठाणे  महानगरपालिकेतील बहुसंख्य नगरसेवकांनी लाखो रुपये ( जनतेच्या करातील ) खर्चून त्यांच्या मतदार संघात त्यांचे  नांव  ठळकपणे लिहिलेली लोखंडी मोट्ठी , उंच प्रवेशद्वारे लावली होती ( जी सध्या दिसत नाहीत , कोठे गायब झाली आहेत माहीत नाही , सगळा करदात्यांचा पैसा पाण्यात ) . त्या प्रवेशद्वाराचा जनतेस ( ठाणेकरांना ) काय फायदा झाला हे त्या माननीय , वंदनीय , आदरणीय , पूजनीय नगरसेवक साहेब च सांगू शकतील . गम्मत पहा ना , त्यातील एका ही नगरसेवकाला ठाणेकर नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वछतागृह बांधावीशी वाटली नाहीत याचे फार दुखः होते. यालाच " संस्कृती " असे म्हणतात का ?
या ठाणे शहरात रस्ते अडवून , करोडो रुपये खर्चून राजकारण्यांकडून  अनेक सण साजरे केले जातात , पण त्यांना देखील ठाणेकर नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वछतागृह बांधावीशी वाटली नाहीत याचे सुद्धा फार दुखः होते.
नागरिकशास्त्र या विषयात "लोकांनी , लोकांसाठी चालविलेले " अशी " लोकशाही " ची व्याख्या शिकलो होतो.

माननीय आयुक्त साहेब , निदान नागरिकशास्त्र या विषयाच्या पाठय पुस्तकातील व्याख्या खरी ठरविण्यासाठी तरी , ठाणेकर नागरिकांच्या सोत्यी साठी ठाणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी पुरुष व महिला स्वच्छता गृहांची ताबडतोब सोय करावी अशी मी एक ठाणेकर करदाता म्हणून हात जोडून आपणाला  विनंती करतो.
आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित अ शाह - ठाणे
०९८२११५०८५८
प्रत ( C C TO :  ) : माननीय आमदार श्री. संजय केळकर साहेब यांना


HC SEEKS NMC'S ( NAGPUR MUNICIPAL COUNCIL ) RESPONSE ON STRAY DOG MENACE


नमस्कार ,

HC SEEKS NMC'S ( NAGPUR MUNICIPAL COUNCIL ) RESPONSE ON STRAY DOG MENACE

या मथळ्याची बातमी THE HITAVADA या इंग्रजी वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीच्या CityLine या 23 सप्टेंबर , 2016 तारखेच्या पुरवणी मध्ये छापून आली होती. ( आता म्हणजे 24 सप्टेंबर, 2016 च्या रात्री , नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी विमान पकडताना हे वृत्तपत्र मला वाचायला सुदैवाने मिळाले ) .
मला येथे अतिशय आनंद होत आहे हि उच्च न्यायालयाला देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्ष्यात आले आहे आणि या अगोदरच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने हे सुचविले आहे “ ANIMAL LOVERS, WHO OPPOSED MERCY KILLING OF STRAY DOGS , TO TAKE RESPONSIBILITY OF STRAY DOGS AND IN CASE OF DOG BITING , THESE ORGANIZATIONS SHOULD COMPENSATE THE AGGRIEVED VICTIMS “.

हे तर सगळ्यांनाच माहित आहे कि भारत या देशातील " प्राणी मित्र " व " प्राणी मैत्रिणी " श्वान दंश झाल्यावर अचानक गायब ( MR . INDIA ) होतात .

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "BETTER LATE THAN NEVER" .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

ब्लॉग : http://fightofacommonman.blogspot.in/










Friday, September 23, 2016

भटक्या कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा - AN APPEAL TO DECLARE " STRAY DOGS" AS OUR NATIONAL ANIMAL - "



From: Satyajit Shah [mailto:satyajitshah64@gmail.com]
Sent: 08 April 2015 14:28

Subject: AN APPEAL TO DECLARE " STRAY DOGS" AS OUR NATIONAL ANIMAL - "
भटक्या कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा

प्रती,
माननीय मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .

विषय : भटक्या कुत्र्यांचा हाताबाहेर जात चाललेला प्रश्न
संदर्भ : माझ्या या विषयावरच्या अगोदरच्या अनेक तक्रारी

नमस्कार ,
मी ठाणे , महाराष्ट्र , भारत येथे राहणारा एक अति क्षुद्र नागरिक आहे.
या   मेल द्वारे मी भारतातील राष्ट्रीय ठेव असणाऱ्या " भटक्या कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा अशी विनंती करीत आहे. ( कृपया ATTACHMENT  पहावी )
याद्वारे भटक्या कुत्र्यांपासून जो सामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्यातून मार्ग निघू शकेल.
आपण यावर विचार करून ताबडतोब योग्य ते पाऊल उचलावे हि आपल्याला विनंती.
आपला कृपाभिलाषी ,

सत्यजित शाह 
मोबा. ०९८२११५०८५८ / ०७०४५००१३४०
/ १३०१, HYDE PARK REGENCY CHS ,
तत्वाद्यान विद्यापीठाच्या मागे , घोडबंदर  रोड ,
ठाणे ( पश्चिम ) - ४०० ६१०.
 
" भटक्या  कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा

मी एक अति सामान्य असा क्षुद्र असा  भारतीय नागरिक आहे ज्याला या लोकशाही असलेल्या देशात काडीचीही किंमत दिली जात नाही.

माझी किंमत फक्त काही दिवसांपुरतीच असते आणि ती म्हणजे निवडणुकीच्या काळात. त्याकाळात मी फक्त काही दिवसांसाठी राजा झालेला असतो. पण निवडणुकीचे निकाल जाहीर होतात आणि मी धप्पकन जमिनीवर कोसळतो  परत एक क्षुद्र भारतीय म्हणून पुढील वर्षे खडतर आयुष्य जगत असतो. बर असही नाही कि मी कर भरता किव्वा कर चुकवून जगतो. मी सामान्य नोकरदार असल्याने भारतातील सगळे लागू असलेले कर मी नित्यनियमाने भारत असतो , भरून सांगतो कुणाला नाहीतर माझ्यावर लगेचच करचूकवेगिरीची  कारवाई  अतिशय तत्परतेने केली जाते.  

माझ्या सारख्याच्या कर दात्याला जेव्हा भटका   कुत्रा चावतो तेव्हा माझ्यासारख्याचे " कुत्र्यापेक्षाही वाईट  हाल होतात" . अरेच्या चुकलोच मी . मला माफ करा मी एक जुनी झालेली पण आजच्या काळात अयोग्य असणाऱ्या अश्या म्हणीचा वापर केला. कारण आजच्या काळात भटक्या कुत्र्यांचे  वाईट हाल होतच नाहीत या उलट मानव प्राण्यांचेच हाल हे भटके कुत्रे चावल्यावर होतात.

असो मुद्दा असा कि जर मला एखादा भटका कुत्रा चावला तर मी शासकीय रुग्णालयात जावू शकत नाही कारण त्यांच्याकडे बर्याचदा नेमकी ती औषधे , लसी यांचा साठा ही उपलब्ध नसतो त्यामुळे मला शीव येथील शासकीय रुग्णालयात  पाठविले जाते अथवा के एम या परेल येथे असलेल्या रुग्णालयात पाठविले जातेइथून तिथून रुग्णालयात धावण्यात मी ( म्हणजे ज्याला श्वान दंश झाला आहे तो ) अगदी अर्ध मेला होवून जातो. हे सगळ टाळण्यासाठी मग खाजगी दवाखान्यात जातो महाग अश्या त्या INJECTION चा ठराविक असा COURSE पुरा करावा लागतो. या महाग अश्या औषधाच्या खर्चानेच माझ्या सारख्याचे कंबरडे मोडले जाते.

पण जर श्वान दंश लहान मुलांना झाला असेल तर त्यांची अवस्था  फारच बिकट असते . ( आपल्या माहितीसाठी सांगतो श्वान दंश झालेल्यांपैकी अंदाजे ८० % रुग्ण हे ते या वयोगटातील असतात. ) या लहान मुलांना श्वान दंशाची जखम अतिशय वेदनादायक असते. या बिचाऱ्या लहान मुलांना " तोंड  दाबून बुक्याचा मारहि म्हण तंतोतंत लागू होतेत्यांच्या उपचारादरम्यान त्या मुलांचे त्या बरोबरच  त्यांच्या पालकांचे असे काही हाल होतात किभिक नको पण कुत्र आवर " या म्हणीचा प्रत्यय येतो. हि म्हण मी थोडी कालानारूप बदलतो नवीन म्हण आहे " श्वानदंशाचा औषधोपचार नको पण भटक कुत्र आवर. ".

असे कळाले आहे कि अगदी परवा एका माननीय , आदरणीय  अश्या एका आमदार साहेबांना भटका कुत्रा चावला तर त्यांच्यासाठी एक परदेशातून अंदाजे २०,००० / ४०,०००  रुपये किमतीचे INJECTION आणणारमला एक आपला साधा प्रश्न पडला आहे कि आतापर्यंत हजारो , लाखो सामान्य नागरिकांना भटका कुत्रा चावला तेव्हा कोणालाच याची गरज नाही लागली आताच कशी काय एकदम याची गरज लागली ?

एका कवितेत कवी मंगेश पाडगावकर म्हणतात किप्रेम म्हणजे प्रेम असत , तुमच आमच , तुमच आणि आमच सेम  असत " त्याच धर्तीवर आता म्हणव लागेल कि " श्वान दंश ,  श्वान दंश  हा सेम नसतो , आमदारांचा श्वान दंश हा सामान्य नागरिकाच्या श्वान दंशा पेक्ष्या फारच वेगळा असतो. "

मला असे कळाले आहे कि खाजगी दवाखान्यात श्वान दंश झाल्यावर VACCINE चे DOSES दिले जातात पण ठा पा च्या रुग्णालयात मात्र च्या ऐवजी नच दिल्या जातात कारण म्हणे त्यांच्या कडे या VACCINE चा आवश्यक असा साठा नसतो. यावर अजून काय लिहिणार

माझे ( अति शुद्र अश्या सामान्य माणसाचे ) दुख इथेच संपले नाही. समजा जर माझ्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला अथवा मला हल्ला होईल अशी शंका जरी आली म्हणून मी हातात एखादा दगड / काठी घेवून त्यांना मारला अथवा मारायला गेलो तर काही विशिष्ठ असे भारतीय नागरिक कोठून तरी उगवतात , कुत्र्याला मारले तर पोलिसांना सांगू आत मध्ये  टाकू अशी धमकी देतात. काही जण तर लगेचच पोलिसांना दूरध्वनी करतात अश्या वेळेला पोलिस तत्परतेने येतात माझ्यासाख्या अति सामान्य शुद्र माणसाला अटक करून घेवून जातात . खटला चालवितात . म्हणजे या भारतात मानवाला स्वसौरक्षण करण्याचा अधिकार हि वापरायची परवानगी नाही असेच म्हटले पाहिजे . आपण " बैल मुझे मारहा एक वाक्प्रचार वापरत असतो , त्या ऐवजी " कुत्ते माझे काट " असा नवीन वाक्प्रचार सध्याची परिस्थिती बघून प्रचलित  होवू  शकतो . .

मराठीत एक म्हण आहे "माय मरो पण मावशी जगो ". आजच्या भारतातील  एक म्हण मी  तुम्हाला सांगतो ती तुम्ही लक्ष्यात ठेवा " माणूस मरो पण भटका कुत्रा जगो ".

या सगळ्यावर मार्ग काढायला एवढ्या वर्षात एकाही राजकीय पक्षाला वेळ मिळाला नाही. का नाही मिळाला याचे विश्लेषण मी येथे करणार नाही कारण ते सगळ्या भारतीयांना माहित आहे. यावर माझ्या सारख्या एका अति क्षुद्र नागरिकाच्या मनात एक विचार आला . अहो हसू नका भारतात क्षुद्र नागरिकही विचार करू शकतात , पण त्यांची ते कोणासमोर बोलण्याची / मांडण्याची हिम्मत नसते कारण आतापर्यंत आम्हाला कोणी बोलूच दिले नाही.

असो. माझी भारतीय सरकारला एक नम्र मागणी आहे कि भारताचा राष्टीय प्राणी बदला  “ भटका कुत्रा " याला  भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करा .  हे  असे करणे भारतात काही अवघड नाही जर भारतात शहरांची , विमान तळाची , विद्यापीठाची  नावे बदलली जातात तर मग राष्ट्रीय प्राणी आपण का नाही बदलू शकत ?

दुसरी  माझी सरकारला महत्वाची विनंती आहे कि  जागो जागी रस्त्याच्या कडेला खांब उभे करावे म्हणजे या भटक्या कुत्र्यांना एक पाय वर करणे ( लघवी करणे ) फारच सोयीचे होईल .

रस्त्याच्या कडेला जनतेला मुतारी नसली तरी चालेल पण भटक्या  कुत्र्यांसाठी मात्र खांब हवेच. या खांबांचा अजून एक उपयोग म्हणजे राजकारण्यांना त्यांच्या वाढदिवसाचे प्रत्येक खांबावर फलक लावता येतील. या फलकाला कोणीही अनधिकृत म्हणू शकणार नाही.

नाक्या नाक्यावर भटक्या कुत्र्यांसाठी पाणी पिण्याची सोय हवी . हे पाणी BISLERI चे असावे म्हणजे त्यांना नळाच्या अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग होणार नाहीत. ( नागरिकांना मात्र साध नळाचेच पाणी द्यावे कारण त्यांना BISLERI पाणी हे पचणार नाही  ).  त्याच्या बाजूला दिवसातून तीन वेळा भटक्या कुत्र्यांसाठी सकस अश्या अन्नाची व्यवस्था शासनाने चुकता करावी. अगदी त्यासाठी शाळेतील मध्यांन भोजन थांबवावं लागले तरी चालेल.

ठाण्यातील ५० % तलाव या भटक्या कुत्र्यांच्या अंघोळीसाठी ( डुम्बण्यासाठी राखीव करावी ) . ठाण्यातील ५० % मैदाने भटक्या कुत्र्यांसाठी  राखीव ठेवावीत म्हणजे त्यांना बागडायला बरे पडेल.  ज्याप्रमाणे  काही ठिकाणी JOGGERS PARK असतात त्याप्रमाणे “ STRAY DOG PARK “  युद्ध पातळीवर बनवावेत .

अजून एक महत्वाच विसरलो . या भटक्या कुत्र्यांच्या शरीर स्वास्थाबाद्दल आपण कसे काय विसरू शकतोप्रत्येक प्रभाग समिती मध्ये एक तरी प्राण्यांचा डॉक्टर असावा. सगळ्या भटक्या कुत्र्यांची नित्य नियमाने शारीरिक तपासणी करावी ज्यामुळे त्यांचे शरीर स्वास्थ्य चांगले राहील.

विसरू नकात  भारत देशाला भटक्या कुत्र्यांची नितात्न्त गरज आहे माझ्या मते " भटके कुत्रे " ही एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावीजगभर भटका कुत्रा ही एक नष्ट होत असलेली प्राण्यांची जमात आहे. अगदी चीन या देशातही भटके  कुत्रे  रस्त्यावर  पाहायला मिळत नाहीत.

आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो कि भारताबाहेरील अनेक प्रगतशील देशांनी भटक्या कुत्र्यांना उपद्रव करतात म्हणून मारून टाकले आहे. रोमानिया या देशा तील  संसदेने तर एका वर्षाच्या मुला वर  भटक्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला म्हणून देशातील सगळे भटके कुत्रे ( अंदाजे ५०,००० भटके कुत्रे )  मारण्यासाठी विधेयक पारित केले. म्हणे त्यांच्याकडे मानवी जीवाला जास्त किंमत आहे. अगदी विचित्रच मागासलेला  देश म्हणायचा तो जेथे मानवी जीव हा भटक्या कुत्र्यापेक्षा महत्वाचा मानला जातो.

केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याने " STRAY DOG TOURISM " या नावाने भारताची  जगभर योग्य प्रकारे जाहिरात करावी ज्यामुळे अनेक प्रगतशील देशातील नागरिक " भटका कुत्राही अनोखी , नष्ट होत चाललेली प्राणी जात पाहण्यासाठी अनेकांच्या संख्येने भारतात येतीलत्यामुळे भारताला अतिशय उपयोगी अशी  परदेशी गंगाजळी मिळेल. भारतात पर्यटनाला ही चालना मिळेल.

प्रत्येक कुत्री एका वेळेला १२ पिल्लांना जन्म देते . त्यामुळे कुत्रीच्या बाळंत पणाची योग्य जबाबदारी ही शासनाने घ्यावी ज्यायोगे या पिल्लांच्या जगण्याचे प्रमाण वाढेल म्हणजेच कुत्र्यांच्या बाल मृत्यूंचे प्रमाण कमी होईल त्या पिल्लांची योग्य काळजी घ्यावी म्हणजे या पिल्लांचा कुपोषणाने मृत्यू होणार नाही.

हिंदी सिनेमा मध्ये " कुत्ते मै तेरा खून पी जावूंगा " असा एक संवाद असतो . या पुढे असे वाक्य कोणत्याही सिनेमा मध्ये आले तर त्या निर्मात्यावर , लेखकावर, कलाकारावर अत्रोसिटी ( ATROCITY ) च्या कलमाखाली खटला भरण्यात यावा. त्याच प्रमाणे भारतीय नागरिकाला " कुत्ते कि मौत " , " कुत्ते कि औलाद " अशी कुत्र्यांची बदनामी होणारी वाक्ये उच्चारायला कायद्याने मनाई केली पाहिजे . जो अशी वाक्ये उच्चारेल अथवा लिखाणात वापरेल त्या व्यक्तींवर देखील अत्रोसिटी च्या कलमाखाली कारवाई करण्यात यावी.

जो चित्रपट निर्माता " कुत्ता मेरा साथी " असा कुत्र्यांची महती सांगणारा चित्रपट काढेल त्याला ५० % अनुदान द्यावे, तो चत्रपट करमुक्त करावा

जसा वर्षातून वेगवेगळा दिवस ( friendship  day सारखा ) साजरा केला जातो तसा " भटका कुत्रा दिवस”  शासकीय पातळीवर सर्वत्र साजरा केला जावा. त्या दिवशी सुट्टी देण्यात यावी.  शाळेत विद्यार्थ्यांना भटक्या कुत्र्यांचे महत्व पटवून द्यावे. कुत्र्यांवर चित्रकला, फोटो , निबंध अश्या वेगवेगळ्या स्पर्धा घाव्यात.

ज्या आमदार , खासदार , नगरसेवक यांच्या मतदार संघात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असेल त्यांना पुरस्कार , सन्मान पत्र देण्यात याव.

प्रत्येक निवासी संकुलामध्ये किमान घर हे भटक्या कुत्र्यांसाठी राखून ठेवाव. ज्या निवासी संकुलात भटके कुत्रे यांची संख्या जास्त असेल त्यांच्या PROPERTY TAX मध्ये सवलत द्यावी.
जे  नागरिक , भटक्या  कुत्र्याला " हाड " असे चुकून जरी म्हणाले तरीही तो  एक गंभीर असा अदखल पात्र असा  गुन्हा ठरवून अश्या लोकांवर कठोर अशी कारवाई करावी. कुत्र्याच्या चुकीमुळे सुद्धा तो गाडीखाली येवून त्याचा मृत्यू झाला तरीही , गाडी चालविणार्याला ताबडतोब अटक करून कठोर अशी शिक्षा  ताबडतोब सूनवावी. सलमान खान च्या खटल्यां सारखा खटला लांबवू नये.  

हे सगळ केल्यावर श्वान दंशाच्या घटना कमी होतील.

माझ्या या मागणीला आपण सर्व क्षुद्र नागरिक सहमत असालच.

चला भटक्या कुत्र्यांची संख्या एवढी वाढवूया कि भारताचे  नाव Guinness Book of World Records मध्ये आणूया.

सत्यजित शाह - ठाणे