Tuesday, March 28, 2017

पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

कोकण
पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा
By pudhari | Publish Date: Mar 17 2017 11:04PM | Updated Date: Mar 17 2017 11:04PM
मालवण : प्रतिनिधी

मालवणात मोकाट जनावरांचा प्रश् नेहमीच चर्चिला जात असताना शुक्रवारी एका बेवारस पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांचा चावा घेत जखमी केले. जखमी झालेल्यांमध्ये नागरिकांसह नगरपालिका कर्मचारी आणि एका पर्यटकाचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती वार्यासारखी पसरल्यानंतर मालवणात खळबळ उडाली आणि त्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली. सुमारे दीड दोन तासांनंतर मालवण बंदर जेटी येथे हा कुत्रा मृत झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जखमी झालेल्या या दहाही जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

मालवणातील सोमवारपेठ भागात दुपारच्या सुमारास नागरिकांची वर्दळ सुरू असणार्या गावंडीवाडा भागातून आलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत समोर दिसेल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. एक- दोन नव्हे तर तब्बल दहा जणांचा या कुत्र्याने चावा घेतला. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने समोर दिसेल त्याला चावा घेत हल्ला चढविल्याने त्या कुत्र्याची शहरात दहशत निर्माण झाली. कुत्र्याच्या या हल्ल्यामुळे शहरात एकच धावपळ सुरू झाली. ही गोष्ट मालवण नगरपालिकेला कळल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी कुत्र्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या पकडापकडीत .. चे सफाई कामगार मनोहर जाधव यांचाही कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याच्या या हल्ल्यात घन:श्याम पराडकर, हेमलता वेंगुर्लेकर, पूजा हुले, शालिनी सावंत, लक्ष्मी हिंदळेकर, प्रज्ञा मालंडकर, प्रियांका मसुरकर, दत्तराज मसुरकर, मनोहर जाधव, शैलेश गोठपगार यांना कुत्र्याने जखमी केले. या सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

मालवणात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांचा चावा घेतल्याचे कळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत, आरोग्य सभापती आपा लुडबे, मोहन वराडकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत रुग्णांची चौकशी केली. 

मालवण शहरात मोकाट गुरे, कुत्रे, बकरी यांच्या बंदोबस्ताबाबत नगरपालिका कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने मोकाट जनावरांचा हैदोस शहरात वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे आजची कुत्र्याने चावा घेतल्याची घटना आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेने मालवणातील मोकाट जनावरांचा प्रश् पुन्हा ऐरणीवर आला आहे.



( जनजागृतीसाठी एका जागरूक नागरिकांकडून  )

No comments:

Post a Comment