Tuesday, March 21, 2017

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन - भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणारी अनिर्बंध वाढ

गेली ४ / ५ वर्षे मी भटक्या कुत्र्यांच्या या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध गल्ली ते दिल्ली लढत आहे.
माहितीच्या अधिकाराखाली बरीच माहिती मिळवली. सह्यांचे निवेदन गोळा केले व आमदार श्री. संजय केळकर यांना दिले.
काही महिन्यांपूर्वी त्यांना या जटील प्रश्नाबाबत एक निवेदन दिले. त्या वेळची दोन छायाचित्रे येथे देत आहे.
नागपूर येथील डिसेंबर २०१५ , डिसेम्बर , २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार श्री. संजय केळकर साहेब हा प्रश्न मांडणार होते. त्यांना हा प्रश्न मांडण्याची संधी त्या अधिवेशनात मिळाली नाही .
त्याचप्रमाणे २०१६ च्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आमदार श्री. संजय केळकर साहेब यांनी हा जटील प्रश्न मांडला होता , पण तो पटलावर आला नाही . 
त्यांना हा प्रश्न सध्या चालू असलेल्या २०१७ च्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मांडण्याची संधी मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना .
तसंही आपणाला माहीतच असेल कि गेले  काही वर्षे महाराष्ट्र राज्याच्या  अधिवेशनात बहुतांश वेळ हा बहिष्कार , आरडा ओरडा यातच वाया जातो . लोककल्याणाच्या किती प्रश्नांवर चर्चा होते हे एक गूढच आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



No comments:

Post a Comment