Tuesday, March 28, 2017

उल्हासनगर -पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा
Published 21-Mar-2017 22:50 IST

ठाणे- भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठया प्रमाणात हैदोस सुरू असून एकाच परिसरातील शाळेतील लहान मुलांसह नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. पालिकेला या पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती दिल्यानंतर तब्बल तासांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून नेण्यात आले.

 
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. येथील सुभाष टेकडीतील परिसरात  सकाळी वाजल्यापासून पिसाळलेल्या एका कुत्र्याने प्रथम जाणाऱ्या काही महिलांना चावा घेण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या साडया फाडल्या. काही जणांना चावा घेतला. नागरिकांना या पिसाळलेल्या कुत्र्याबाबत कळताच ते आपल्या दारासमोर काठया घेऊन त्या कुत्र्याला परिसरातून हाकलण्यासाठी प्रयत्न करत होते. अशातच शाळेत जात असणाऱ्या लहान मुलांना त्या पिसाळलेल्या कुत्र्याने पायाला चावा घेतला

पालिकेने ज्या संस्थेला कुत्रे पकडण्याचा ठेका दिला आहे त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या त्या कुत्र्यासह इतर कुत्र्यांनाही पकडून नेले. पिसाळलेल्या कुत्र्याने त्या तिन्ही कुत्र्यांना चावा घेतल्यामुळे त्यांना देखील उपचारासाठी त्या पथकाने पकडून नेले आहे

कुत्रा चावून जखमी झालेल्या १० नागरिकांपेकी काहींनी खासगी तर काहींनी सरकारी रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे नागरिक खुपच भयभीत झाले आहेत. पालिकेने शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2017/03/21225136/News-In-Marathi-Dog-Bite-to-10-citizen.vpf


( जनजागृतीसाठी एका जागरूक नागरिकांकडून  )


No comments:

Post a Comment