पिसाळलेल्या कुत्र्याचा शाळकरी मुलींवर हल्ला
By pudhari | Publish Date: Oct 24 2016 11:16PM | Updated Date: Oct 24 2016 11:16PM
देवगड : प्रतिनिधी
http://www.pudhari.com/news/kokan/94485.html
पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी जामसंडे बाजारपेठेत चौघांचा चावा घेतला आहे. या घटनेने जामसंडे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा नगरपंचायतीने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
सोमवारी दुपारी 2.30 ते 4 वाजण्याच्या कालावधीत जामसंडे बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने दोन शाळकरी मुलांसह दोन नागरिकांना चावा घेतला. यामध्ये तनिष प्रवीण वारीक व उषाबाई रघुनाथ भिसे (वय 9) या दोन शाळकरी मुुलींना सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. यातील उषाबाई भिसे या मुलीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दोघांच्याही पायाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला तर दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास प्रशांत बाळकृष्ण परब (26) व सुभाष पोपटराव माने (63) या दोघांचा या कुत्र्याने चावा घेतला. यामुळे जामसंडे बाजारपेठेतील ग्रामस्थ संतप्त झाले.
देवगड व जामसंडे परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून त्यांचा नगरपंचायतीने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
( जनजागृतीसाठी एका जागरूक नागरिकांकडून )
No comments:
Post a Comment