नमस्कार , सुंदर दुपार ,
" आमदार श्री. संजय केळकर यांचा कार्य अहवाल - २०१४ - २०१६ "
आज
, सोमवार , १३ मार्च, २०१७ रोजी , ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर
यांच्याशी त्यांच्या कार्यालयात भेट झाली . अनेक महत्वाच्या प्रश्नांवर
छानश्या गप्पा झाल्या .
केळकर साहेबांनी मला त्यांच्या २०१४ - २०१६ च्या कार्य अहवालातील , मी त्यांच्यावर लिहिलेला , व या पूर्वी एका दैनिकात देखील छापून आलेला " संजय केळकर - राजकारणातील समाजकारणी " हे लेख दाखविला. माझ्या लेखाला त्यांच्या कार्य अहवालात जागा मिळाली याचा मला अत्यानंद झाला.
कार्य
अहवाल प्रकाशित करण्याचे श्रेय कैलासवासी रामभाऊ म्हाळगी यांना जाते , अशी
माहिती मला आहे. पण आश्चर्य म्हणजे आजच्या या कलयुगात देखील आमदार श्री.
संजय केळकर साहेब , हि प्रथा चालू ठेवतात याचे आम्हा ठाणेकरांना खूप आनंद
आहे.
त्या कार्य अहवालाचे मुखपृष्ठ , व माझा लेख येथे जोडत आहे.
No comments:
Post a Comment