नमस्कार , सुंदर सकाळ ,
" BEAUT"Y"FUL THANE - SMART THANE "
आपल्याला वाटले असेल कि माझ्याकडून BEAUTYFUL शब्दातील अक्षर रचनेत चूक झाली ( SPELLING MISTAKE ) असेल , पण नाही.
स्मार्ट ठाणे येथील तुळशीधाम जवळील एका स्वछता गृहाजवळ ठाणे म न पा ने स्थानिक नागरसेविकेच्या पैशातून एक मनोरा सदृश्य काहीतरी बांधलं आहे ( का बांधलं आहे हे ठाणेकर करदात्यांना खरच ठाऊक नाही ) . त्यात एक घड्याळ आहे , व त्यावर सरकणाऱ्या अक्षरात स्वच्छ ठाणे वगैरे वगैरे व इंग्रजीत BEAUTYFUL THANE असे काहीतरी लिहिलेले आळी पळीने सरकत जाते .
हे BEAUT"Y"FUL वाचून हसावे का रडावे हे मला कळत नव्हते . माझी तर दांडीच गुल झाली होती .
असो , ठाणे म न पा दिलेल्या कामाचे पैसे देण्या अगोदर , ती दिलेली कामे योग्य व बिनचूक झाली आहेत का हे पाहत नाही असेच वाटते .
बहुतेक यात चूक कोणाची आहे हे ठरविण्यासाठी एखादी समिती नेमली जाईल / सल्लागार नेमला जाईल , त्यावर पुन्हा लाखो रुपये खर्च होतील . सरतेशेवटी असाही निश्कार्ष काढला जाईल कि यात सत्तारूढ पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षाने रचलेला डाव आहे अथवा असाही निष्कर्ष काढतील कि SMART CITY मधील Y मुद्दाम BEAUT"Y"FUL मध्ये घेतला आहे .
नशीब तो शब्द BEAUTY"FOOL" असा लिहिलेला नाही . तसंही भारतीय नागरिक , निवडणूक झाल्यावर पुढील ५ वर्षे FOOL च बनत असतो.
No comments:
Post a Comment