Friday, March 31, 2017

15000 to 20000 people die due to rabies every year as per estimate

Today , i.e. on 31 st March, 2017 , Member of Parliament Shri. Tamradhwaj Sahu raises the issue of deaths due to rabies."15000 to 20000 people die due to rabies every year as per estimate" in the parliament.

http://www.thehindu.com/…/parliament-bu…/article17749212.ece )

सुविचार - सुआचार

नमस्कार , 

" सुविचार - सुआचार "

गेली अनेक दिवस, महिने , वर्षे मी Facebook  व whatsapp वर दररोज सुविचारांचा धो धो पाऊस पडताना पाहत आहे. 

त्या वरच मला सुचलेली वाव मी स्वतः लिहिलेले ( कोणाचीही न चोरता ) हि कविता . 

" सुविचार - सुआचार " 

करा करा कि हो 
        बाकीच्यांचा थोडा तरी विचार 
टाकू नका हो 
        रोज रोज न चुकता सुविचार ।। १ ।।


करा करा कि हो 
        थोडासा तरी मनाशी विचार 
अमलात आणता का हो 
        तुम्ही तरी तो टाकलेला  सुविचार ? ।। २ ।। 


सतवीत असतो कि हो 
        नेहमीच मला हा विचार 
कोणाचे चोरता कि हो 
         रोजच तुम्ही हे विविध सुविचार ? ।। ३ ।। 


बघा पटतो का हो 
       तुम्हाला अनोखा एक विचार 
न टाकता रोज सुविचार 
       करा रोज एक तरी सुआचार ।। ४ ।।


भासला तुम्हाला का हो 
        माझा हा एक अविचार ? 
समजा यालाच कि हो 
        आजचा माझा एक सुविचार ।। ५ ।। 
        

सत्यगीत

( सत्यजित अ शाह - ठाणे ) 
संपर्क क्रमांक : ०९८२११५०८५८ 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


Tuesday, March 28, 2017

उल्हासनगर -पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा १० जणांना चावा
Published 21-Mar-2017 22:50 IST

ठाणे- भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठया प्रमाणात हैदोस सुरू असून एकाच परिसरातील शाळेतील लहान मुलांसह नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. पालिकेला या पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती दिल्यानंतर तब्बल तासांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून नेण्यात आले.

 
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. येथील सुभाष टेकडीतील परिसरात  सकाळी वाजल्यापासून पिसाळलेल्या एका कुत्र्याने प्रथम जाणाऱ्या काही महिलांना चावा घेण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या साडया फाडल्या. काही जणांना चावा घेतला. नागरिकांना या पिसाळलेल्या कुत्र्याबाबत कळताच ते आपल्या दारासमोर काठया घेऊन त्या कुत्र्याला परिसरातून हाकलण्यासाठी प्रयत्न करत होते. अशातच शाळेत जात असणाऱ्या लहान मुलांना त्या पिसाळलेल्या कुत्र्याने पायाला चावा घेतला

पालिकेने ज्या संस्थेला कुत्रे पकडण्याचा ठेका दिला आहे त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या त्या कुत्र्यासह इतर कुत्र्यांनाही पकडून नेले. पिसाळलेल्या कुत्र्याने त्या तिन्ही कुत्र्यांना चावा घेतल्यामुळे त्यांना देखील उपचारासाठी त्या पथकाने पकडून नेले आहे

कुत्रा चावून जखमी झालेल्या १० नागरिकांपेकी काहींनी खासगी तर काहींनी सरकारी रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे नागरिक खुपच भयभीत झाले आहेत. पालिकेने शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2017/03/21225136/News-In-Marathi-Dog-Bite-to-10-citizen.vpf


( जनजागृतीसाठी एका जागरूक नागरिकांकडून  )


पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

कोकण
पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा
By pudhari | Publish Date: Mar 17 2017 11:04PM | Updated Date: Mar 17 2017 11:04PM
मालवण : प्रतिनिधी

मालवणात मोकाट जनावरांचा प्रश् नेहमीच चर्चिला जात असताना शुक्रवारी एका बेवारस पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांचा चावा घेत जखमी केले. जखमी झालेल्यांमध्ये नागरिकांसह नगरपालिका कर्मचारी आणि एका पर्यटकाचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती वार्यासारखी पसरल्यानंतर मालवणात खळबळ उडाली आणि त्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली. सुमारे दीड दोन तासांनंतर मालवण बंदर जेटी येथे हा कुत्रा मृत झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जखमी झालेल्या या दहाही जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

मालवणातील सोमवारपेठ भागात दुपारच्या सुमारास नागरिकांची वर्दळ सुरू असणार्या गावंडीवाडा भागातून आलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत समोर दिसेल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. एक- दोन नव्हे तर तब्बल दहा जणांचा या कुत्र्याने चावा घेतला. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने समोर दिसेल त्याला चावा घेत हल्ला चढविल्याने त्या कुत्र्याची शहरात दहशत निर्माण झाली. कुत्र्याच्या या हल्ल्यामुळे शहरात एकच धावपळ सुरू झाली. ही गोष्ट मालवण नगरपालिकेला कळल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी कुत्र्याला पकडण्यासाठी धाव घेतली. या पकडापकडीत .. चे सफाई कामगार मनोहर जाधव यांचाही कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याच्या या हल्ल्यात घन:श्याम पराडकर, हेमलता वेंगुर्लेकर, पूजा हुले, शालिनी सावंत, लक्ष्मी हिंदळेकर, प्रज्ञा मालंडकर, प्रियांका मसुरकर, दत्तराज मसुरकर, मनोहर जाधव, शैलेश गोठपगार यांना कुत्र्याने जखमी केले. या सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

मालवणात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांचा चावा घेतल्याचे कळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत, आरोग्य सभापती आपा लुडबे, मोहन वराडकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत रुग्णांची चौकशी केली. 

मालवण शहरात मोकाट गुरे, कुत्रे, बकरी यांच्या बंदोबस्ताबाबत नगरपालिका कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने मोकाट जनावरांचा हैदोस शहरात वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे आजची कुत्र्याने चावा घेतल्याची घटना आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेने मालवणातील मोकाट जनावरांचा प्रश् पुन्हा ऐरणीवर आला आहे.



( जनजागृतीसाठी एका जागरूक नागरिकांकडून  )