Thursday, December 31, 2015

७ व्या इयत्तेत शिकणाऱ्या पायल यशवंत कांबळे या मुलीवर ७ - ८ भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला जखमी केले- STRAY DOG MENACE

नमस्कार  ,

कृपया हि बातमी वाचा.

या समस्यचे गांभीर्य ओळखा व याविरुध्द आवाज उठवा. 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


आजू बाजूला असलेल्या अनेक प्रश्नांविरूढ आवाज उठविण्यासाठी या तरुणाईचा उत्साह कोठे जातो ? - fightofacommonman

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

एकीकडे पाहतोय , वाचतोय कि नवीन वर्षाच्या ( इंग्रजी नवीन वर्षाच्या ) स्वागतासाठी तरुणाई एकदम उत्साहात आहे , पण दुसरीकडे असे सत्य जे मला दिसतंय ते असे आहे कि आपल्या आजू बाजूला असलेल्या अनेक प्रश्नांविरूढ आवाज उठविण्यासाठी या तरुणाईचा उत्साह कोठे जातो ?

मी शक्यतो असे काही लिहित नाही पण आज राहवले नाही म्हणून हे लिहिले.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Tuesday, December 29, 2015

HOW MANY MORE DEATHS DUE TO STRAY DOG BITE WILL MAKE GOVERNMENT SERIOUS TO TACKLE THIS ISSUE OF ALARMING INCREASING POPULATION OF STRAY DOGS ALL OVER INDIA ?

HOW MANY MORE DEATHS DUE TO STRAY DOG BITE WILL MAKE GOVERNMENT SERIOUS TO TACKLE THIS ISSUE OF ALARMING INCREASING POPULATION OF STRAY DOGS ALL OVER INDIA ?
Please read this news article
Stray dogs kill another kid in Bareilly, 7th in a year
Priyangi Agarwal
Bareilly:

Dec 29 2015 : The Times of India (Thane)

In unending attacks by stray dogs in Baheri tehsil of Bareilly district, a 10-yearold was mauled to death, the seventh kid to have died in the past year, with more than 30 children being attacked in the same period.
The boy , identified as Amit Kumar, a student of class II, became the seventh victim of dog attacks. Amit, along with his friend, had on Sunday evening gone to the outskirts of their native Siyatheri village to pluck wild berries when they were surrounded by a pack of dogs. While his friend managed to escape, dogs attacked Amit and hurt his head, neck and stomach. When the villagers reached the spot, the child had sustained severe injuries. He was rushed to hospital where doctors declared him brought dead.
According to the district administration and forest department stray dogs have become feral in the region after scavenging on animal residue like flesh, blood and bones, which are mostly discarded from slaughterhouses.
Sub-divisional magistrate of Baheri, Paras Nath Maurya, said, “We conducted a meeting with the forest officials and Nagar Palika on Monday .Forest department has been asked to identify the areas where ferocious dogs are present and ways to deal with them.“


" पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड " - BECOME AN ALERT CITIZEN

" पोलिसालाही  भरावा  लागला  नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "  

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

मंगळवार , २९.१२.२०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे जिल्ह्यातील  वर्तमान पत्रातील पृष्ठ क्रमांक १ व ४ वर आलेली " पोलिसालाही  भरावा  लागला  नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "  बातमी येथे माहितीसाठी देत आहे.

या बातमीसंदर्भात एक छोटेसे विश्लेषण हि पुढे देत आहे.

केल्याने होत आहे रे पण " नागरिकाने " आधी " जागरूक नागरिक " बनलेची  पाहिजे

" आपल्या देशात काहीच सुधारणा होणार नाही " ,  " हे सगळ असच चालत राहणार " , " मी एकटा कसा  काय समाजात बदल घडवू शकतो ? "  हि व अशी अनेक  समानार्थी वाक्ये अथवा अश्या " प्रतिक्रिया " अनेकदा म्हणजे नेहमीच आपल्याला ऐकू येतात . याचे एक कारण देखील आहे आणि ते म्हणजे बहुसंख्य भारतीय नागरिकांना फक्त " प्रतिक्रिया " देण्याची हौस असते. पण स्वतः क्रिया कधीच करायची नसते.

मी माझ्या एका कवितेत म्हटले आहे

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ,
      घरात बसून प्रतिक्रिया देणे निरर्थक आहे.

माझा अनुभव मात्र वेगळाच आहे . खालील दोन घटना आपल्यासमोर देत आहे. याचे सगळे पुरावे  ( छायाचित्रे , दंड केल्याची पावती , पत्र ) या स्वरुपात माझ्याकडे आहेत.

घटना क्रमांक १ ) : २४.११.२०१५ रोजी मी कार्यालयात जात असताना एक दुचाकीस्वार ज्याच्या वाहन क्रमांक पट्टीवर " पोलिस " असे लिहिले होते ( जो गुन्हा आहे ) , शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले , वाहन क्रमांक छोट्या अक्षरात व मोठ्या आकड्यात लिहिला होता . तो सिग्नलला थांबला होता तेंव्हा त्याला याबद्दल मी शांतपणे सांगितले, पण त्याने दुर्लक्ष केले . पुढचा धक्का म्हणजे तो समोरील सिग्नल हिरवा होण्यास १८ सेकंद बाकी असताना सिग्नल मोडून वेगात निघून गेला . तेंव्हा माझी सटकली. त्याचे छायाचित्र अगोदरच काढले होते.

रात्री घरी आल्यावर हे सगळ DCP TRAFFIC , THANE , व इतर पोलिस अधिकार्यांना ई मेल ने कळविले.

छायाचित्र टिपायला ३० सेकंद लागले. ई मेल पाठविण्यास ५ ते ८ मिनिटे लागली . त्यानंतर मी कधीच या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही.

पण याचा परिणाम पहा. मला २४.१२.२०१५ ला नौपाडा वाहतूक शाखेतून दूरध्वनी आला कि माझी तक्रारीवरून त्या दुचाकीच्या मालकाचा पत्ता शोधून वाहतूक पोलिसांनी त्याला बोलावले . ती दुचाकी दुसराच कोणीतरी चालवीत होता , त्याला देखील बोलावले व त्या गृहस्थाला वर लिहिलेल्या ४ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी  रुपये १०० म्हणजे एकूण रुपये ४०० दंड भरावा लागला. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर व त्या गृहास्थाला झालेल्या दंडाची पावती जोडली आहे ) 

घटना क्रमांक २  ) : शुक्रवार , ९ ओक्टोंबर , २०१५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५.५५ वाजता मी कार्यालयातून घरी निघालो होतो. . स्थळ ऐरोली कडून पटनी  कॉम्पुटर कडे जाणारा रस्ता .
समोर एक  दुचाकी चालविणारी व्यक्ती हि पोलिस असूनही त्या व्यक्तीने एकाच वेळी खालील  ३ नियम मोडले होते .
१. ) दुचाकी चालविताना शिरस्त्राण ( HELMET )  नव्हते घातले .
२. ) दुचाकी चालविताना भ्रमणध्वनी यंत्रावर ( MOBILE PHONE वर ) संभाषण करीत आहे
३. ) दुचाकीच्या मागे पोलिस असे एक वर्तुळाकार STICKER लावले आहे.

ताबडतोब ते छायाचित्र टिपले. त्याच दिवशी रात्री DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांना व इतर काही व्यक्तींना एक ई मेल व ते छायाचित्र पाठविले. हे सगळ करण्यासाठी फक्त ५ ते ७ मिनिटे एवढाच वेळ लागला . त्यानंतर मी त्याचा कधीच पाठपुरावा केला नाही.

मला बुधवार , ४ नोव्हेंबर , २०१५ ला दुपारी १२.१७ वाजता DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांच्या कडून मला एक ई मेल आला त्यात त्यांनी माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही केली हे कळविले. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर  जोडले  आहे ) 

आता मला सांगा की

१. ) पोलिसांना , राजकारण्यांना , मंत्र्यांना , राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना  वाहतुकीचे नियम माफ आहेत ?
२. ) केल्याने होत आहे कि नाही
३. ) हे सगळ करायला असा कितीसा वेळ आपल्याला लागतो ?

गेली अंदाजे ३.५ ( साडे तीन  ) वर्षे मी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घातले पाहिजे यासाठी विविध  पातळ्यांवर लढत आहे. त्या लढ्याला यश येताना दिसत आहे . मी काही वाहतूक चौक्यांमध्ये तेथील वरिष्ठ अधिकार्यांना भेटलो . त्यांनी मला पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल केलेल्या कारवाई बद्दल सांगितले कि  दर महिन्याला अंदाजे ५० ते १०० पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल दंडात्मक  कार्यवाही केली जाते. आपण याची शहनिशा करण्यासाठी DCP TRAFFIC , THANE यांच्याशी सम्पर्क साधू शकता.

आपणाला हे लक्ष्यात आले आहे कि नाही ते माहित नाही , पण गेले काही महिने दूरचित्रवाणी  ( T.V. ) वरील  नवीन मालिकांमध्ये जेंव्हा दुचाकीवरील एखादा प्रसंग असतो तेंव्हा त्या पुरुष , महिला कलाकारांनी शिरस्त्राण घातलेले असते .

हे तर मी नेहमीच सांगतो कि फक्त एकट्याच्या प्रयत्नांनी १०० % यश येण्यासाठी जास्त वेळ लागेल . पण जर " नागरिक " हि व्यकी " जागरूक नागरिक झाली व सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी हा प्रश्न घेतला तर तो दिवस दूर नाही जेव्हा " भारत " या देशातील  प्रत्येक पोलिस दुचाकीवर शिरस्त्राण घातलेला दिसेल. प्रत्येक राजकारणी , मंत्री, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , शासकीय कर्मचारी व नागरिक वाहतुकीचे व इतर सगळे नियम पाळताना दिसतील.

या पुढील लढाई आसन पट्टा ( SEAT BELT ) न लावणे , गाडीला काळ्या काचा असणे, विचित्र  पद्धतीने वाहन क्रमांक लिहिणे , वाहन क्रमांक पट्टीवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे , गाडीचा दिवा प्रखर पांढरा  ठेवणे ,  देवनागरी मध्ये वाहन क्रमांक लिहिणे , चित्र विचित्र असे भोंगे ( HORN ) बसविणे , सिग्नल न पाळणे , वाहन उलट दिशेला नेणे व इतर अश्या अनेक नियम मोडणाऱ्या च्या विरुद्ध चालू करायची आहे ( माझ्या कडून हि लढाई चालू सुद्धा  झाली आहे ) .

आपल्याला हे पटतंय ना ? " भारत " या देशात स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो.

चला मग कोणाची वाट  पाह्ताहात ?  आपण सगळे मिळून हि लढाई लढवूया ना ?

वारंवार स्वतःचे PROFILE PICTURE फेसबुक वर बदलणे , वारंवार खाद्य  पदार्थांची छायाचित्रे फेसबुक वर टाकणे , या पेक्षाही कमी वेळ " जागरूक नागरिक " बनण्यासाठी लागतो.

आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
ठाणे, महाराष्ट्र
एक अति सामान्य , पण जागरूक नागरिक.




Saturday, December 26, 2015

डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे " लोक बिरादरी प्रकल्प " - एक तीर्थक्षेत्र

नमस्कार सुंदर सकाळ ,

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात केव्हातरी चार धाम यात्रा सारख्या तीर्थयात्रेला जावून देवदर्शन करीत  असते.

याच दिवशी ( २७.१२.२०१४ ) , मागच्या वर्षी सारंग व वैभव या माझ्या नागपूर स्थित मित्रांमुळे आम्हाला एका फार मोठ्या तीर्थयात्रेला जावून देव दर्शनाचा  योग आला .

ते तीर्थक्षेत्र म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे " लोक बिरादरी प्रकल्प ". आणि देव म्हणजे साक्षात प्रकाश भाऊ ( डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ) .

निमित्त  होते " स्व. बाबा आमटे " यांचे जन्म शताब्दी वर्ष.

एका अप्रतिम कार्यक्रमाला हजार राहता आले याच आम्हाला अतिशय आनंद झाला . कार्यक्रमाची आखणी , सगळ्या पाहुण्याची सोय , आदरातिथ्य या व इतर अनेक बाबी प्रकाश भाऊंच्या मुलांनी व सुनांनी व " लोक बिरादरी प्रकल्प " मधील कार्यकर्त्यांनी फार चोख पणे सांभाळल्या होत्या .

मला , सारंग व वैभव या तिघांना खरोखर अत्युच्य अश्या तीर्थ क्षेत्री जावून देव दर्शन झाल्याचा अनुभव आला.

प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी तेथे भेट द्यावी जेणेकरून प्रकाश भाऊ , मंद ताई , त्यांची मुले , सुना , व अनेक कार्यकर्ते यांचे काम पाहता येईल व स्वतःच्या आयुष्याला एक मार्ग मिळेल.


आम्ही निघताना प्रकाश भाऊ व त्यांच्या कुटुंबाने एवढा प्रेमळ निरोप  दिला व पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले कि ते प्रेम , जिव्हाळा आम्ही कधीच विसरू शकत नाही. 


Saturday, December 19, 2015

" भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या कल्याण , डोंबिवली मध्ये दररोज ७० ते ८० तक्रारी "

" भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या कल्याण , डोंबिवली मध्ये दररोज ७० ते ८० तक्रारी "
नमस्कार ,
" महाराष्ट्र टाईम्स " या वर्तमान पत्रातील , शनिवार , १९ डिसेंबर , २०१५ च्या अंकात आलेली हि बातमी येथे देत आहे.
“ मुंबई मध्ये १३ लाख ७० हजार ४७७ जणांना कुत्रे चावल्याच्या घटनेत ४३४ जणांचा मृत्यू “ हि १७.१२.२०१५ च्या " नवा काळ " या वर्तमान पत्रामध्ये आलेली बातमी २ दिवसांपूर्वीच दिली होती.
जर तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या कुटुंबाला जर अजून पर्यंत श्वान दंश अथवा भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव अजूनही झाला नसेल तर आपण सुदैवी आहात .
भविष्यात काय होईल याचा काही नेम नाही. तेंव्हा कृपया नेहमीप्रमाणे शांत राहून श्वान दंश होण्याची वाट न पाहता खालील वाक्ये नीट वाचा आणि कृपया अमलात आणा .
1. ) Stand up for what is right , Even if you’re standing alone !

2. ) Evil Triumphs When Good People Sit Quiet



Thursday, December 17, 2015

मुंबई मध्ये १३ लाख ७० हजार ४७७ जणांना कुत्रे चावल्याच्या घटनेत ४३४ जणांचा मृत्यू - 13,70,477 cases of STRAY DOG BITE and 434 DEATHS because of REBIS

मुंबई मध्ये १३ लाख ७० हजार ४७७ जणांना कुत्रे चावल्याच्या घटनेत ४३४ जणांचा मृत्यू


नमस्कार ,

काय दचकलात ? हे सगळ खर आहे . मी काही गम्मत करीत नाही. 

हि बातमी १७.१२.२०१५ च्या " नवा काळ " या वर्तमान पत्रामध्ये आली आहे. 

मी नेहमीच सांगतो कि " भारत "  या देशात  " मानव " प्राण्या पेक्ष्या " भटक्या कुत्र्यांना  " जास्त किंमत दिली जाते. 

गेली ३ ते ४ वर्षे मी या भटक्या कुत्र्यांमुळे मानव  प्राण्याला होणाऱ्या त्रासाबद्दल गल्ली ते दिल्ली सगळीकडे दाद मागतोय , पण हा त्रास कमी न होता वाढतच चालला आहे. 

" ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत रोज अंदाजे ३० व्यक्तींना श्वान दंशाचा "प्रसाद"  मिळतो . 

अजून  एक  महत्वाचे , श्वान दंशाच्या घटनांमध्ये  ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके  सापडतात .

काय म्हणता तुम्हाला, तुमच्या मुलांना , आप्तेष्टांना  अजून श्वान दंश झाला नाही म्हणून तुम्ही गप्प आहात ? 

कृपया काळजी घ्या . कधीही , कोणालाही श्वान दंश होऊ शकतो.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet



Monday, December 7, 2015

" आजचा भारतीय " " आजची सत्यगीतं " या काव्य संग्रहातील एक कविता - POEM IN MARATHI " TODAY'S INDIAN " from my POETRY BOOK " AAJCHI SATYAGEETE "

नमस्कार ,
" आजचा भारतीय " हि माझ्या " आजची सत्यगीतं " या पहिल्या वहिल्या काव्य संग्रहातील एक कविता .
माझ्या अनेक लढायांमध्ये मला जे वाटले, मी जे अनुभवले ते या कविते मधून सगळं दर्शविले गेले आहे.
कसं आहे ना , मी नेहमी खालील पंक्तीन्प्रमाणे वागत असतो.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet





"पोस्टमन दादा " कविता - POEM " POSTMAN DADA "

नमस्कार ,
अंदाजे एक वर्षांपूर्वी माझी " पोस्टमन दादा " हि कविता " नवा काळ " मध्ये छापून आली होती.
कविता वाचल्यावर मला अनेक पोस्टमन दादांनी दूरध्वनी करून कविता लिहिल्याबद्दल धन्यवाद दिले आणि आवडल्याचे आवर्जून सांगितले
काहींनी तर सांगितले कि दोन प्रेमाचे शब्द देखील आजकाल दुरापास्त झाले आहेत , अश्या या वर्तमान काळात हि कविता अनेकांना भावली.


Friday, December 4, 2015

भटक्या कुत्र्यांची दहशत - STRAY DOG MENACE in THANE , MAHARASHTRA , INDIA - STRAY DOGS ARE BETTER TREATED THAN HUMANS

Hello ,
Sharing herewith a post of 5th Dec. 2013. For last many years, INDIANS like me are raising this serious issue of " STRAY DOG MENACE " to aal LEVELS of GOVERNANCE , but in INDIA GOVERNMENT does not believe in PRECAUTION IS BETTER THAN CURE.

Also in INDIA , STRAY DOGS ARE BETTER TREATED THAN HUMANS ".

But please say " MERA BHARAT MAHAA..............N ".

नमस्कार, आणि सुंदर सकाळ ,
५.१२.२०१३ ची एक POST येथे SHARE करीत आहे.
गेली अनेक वर्षे , मी या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीविरुद्ध गल्ली ते दिल्ली पर्यंत लढत आहे , पण दुर्दैवाने काहीच होत नाही.
भारत हा असा एकमेव देश आहे कि जेथे ' भटके कुत्रे " नावाचा प्राणी ( जनावर ) मजेत राहतो " आणि त्यांच्या दहशती मुळे " मानव प्राणी " हा भटक्या कुत्र्यांना घाबरून राहतो.
भारतीयांनो उठा आता , झोपेचे सोंग घेऊन शांत बसू नकात . वारंवार स्वतःचे PROFILE PICTURE बदलण्यापेक्ष्य भारत या देशाचे PICTURE बदला .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet


वसईत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद - STRAY DOG MENACE IN VASAI , MAHARASHTRA , INDIA

नमस्कार ,

या सोबत एक बातमी जोडत आहे.

हि बातमी मला ठाणे येथील एक प्रभावी व्यक्तीमत्व श्री. Praful Waghole जी  यांनी पाठविले आहे.

मुंबई असो , ठाणे असो ,  वसई  असो , नागपूर असो , पुणे असो , महाराष्ट्र असो , " भारत "  या एकमेव देशातील प्रत्येक शहरात , गावात, गल्लीत ,  बोळात अक्षरशः सगळीकडे श्वान दंशाच्या घटना वाढतच आहे .

नागरिक शांत आहे , शासन गप्प आहे.

वसईकर उठा , कृपया उठा .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet



Saturday, November 28, 2015

STILL YOU HAVE NOT ENJOYED STRAY DOG BITE ? काय आपणाला अजूनही श्वान दंश झाला नाही ?

सुंदर सकाळ आणि नमस्कार ,

आपणाला श्वान दंश झाला का ?

काय म्हणालात नाही ?

अरेरे किती दुर्दैवी आहात तुम्ही .

पण अजूनही संधी गेली नाही , असेच आपण " भटक्या कुत्र्याच्या त्रासावर " गप्प बसलात तर आपल्याला हि श्वान दंश लवकरच होईल.

काही वर्षात भारत या देशात श्वान दंश न झालेली व्यक्ती ( राजकारणी , नेते, मंत्री सोडून  ) शोधून सापडणार नाही.

" TIMES  OF  INDIA "  व " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त्त्पात्रातील २८.११.२०१५ च्या अंकातील या बातम्या यासोबत जोडत आहे.

गेली अंदाजे ४ एक वर्षे मी या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढणाऱ्या संख्येवर मी लढत आहे. अनेकवेळा शासन दरबारी हा प्रश्न नेला आहे.

आपल्या  भारत देश हा जगात एकमेव असा देश आहे  कि कोणताही प्रश्न अतिशय गंभीर  स्वरूप धारण केल्याशिवाय  त्यावर उपाय योजना करायची नसते . त्यातही ९९.९ ५ भारतीय नागरिक गप्प बसतात, त्यामुळे शासन काहीच हालचाल करीत नाही.

-          ठाणे  शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे ७०,००० झाली आहे.
-          ठाणे शहरात अंदाजे ३० व्यक्तीना श्वान दंश होतो.
-          भारत या देह्सात दरवर्षी अंदाजे ३५,००० हजार व्यक्ती रेबीस मुळे मृत्युमुखी पडतात.
-          अंदाजे ८० % श्वान दंशाच्या घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील मुलांना श्वान दंश होतो.
-          महाराष्ट्र राज्यात रोज अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.
-          म्हणजेच महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अंदाजे २८,१०,५०० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          " भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          म्हणजेच " भारत " या देशात दरवर्षी अंदाजे ५,१८,१५,४०० श्वान दंशाच्या घटना घडतात,

एका हाताच्या बोटावर मोजता येईल अश्या " प्राणी मित्रांमुळे " ( जे स्वतः मिटक्या मारून मांसाहार करतात - त्यावेळेला त्यांचे प्राणी प्रेम विसरतात )   या भटक्या कुत्र्यांपासून स्व-संरक्षण करण्यासाठी " मानव प्राणी " हातात काठी ग्यायला देखील घाबरतो.

दुसऱ्याला  श्वान दंश झाल्यावर मानव प्राणी गप्प बसतो. " माझ्या बापाचे काय जातो " हे मनात म्हणतो , पण स्वतःला , मुलाबाळांना , आप्तस्वकीयांना  श्वान दंश झाल्यावर मात्र खडबडून जागा होतो. हि आजच्या भारतीय नागरिकाची सत्य कहाणी आहे.

परत एकदा आपण भारतीयांना नम्र विनंती आहे कि भारत या देशात " मानव प्राण्यांचे " अस्तित्व टिकण्यासाठी या लढाईत उतरा , स्वतःवर शेकण्याची वाट पाहू नका .

फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " व्हा.

या प्रश्नावर कसा आवाज उठवायचा या साठी आपण मला  satyajitshah64@gmail.com या इ मेल वर  संपर्क साधू शकता.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





" डान्स बार सुरु होणार " कविता " नवा काळ " शनिवार , २८.११.२०१५ च्या अंकात

नमस्कार , 

एका ताज्या घटनेवर माझ्या कडून ' डान्स बार सुरु होणार " या शीर्षकाची एक कविता लिहिली गेली. 

" नवा काळ " चे मी अत्यंत आभार आहे कि त्यांनी हि कविता , शनिवार , २८.११.२०१५ च्या " नवा काळ " च्या अंकात छापून ती वाचकांपर्यंत नेली. 

आज दिवस भरात मला महाराष्ट्रातील अनेकविध ठिकाणाहून " नवा काळ " च्या वाचकांचे कविता आवडल्याचे दूरध्वनी आले .

माझ्या कविता शक्यतो अश्याच नीर-निराळ्या ताज्या ( कविता लिहिली गेली तेंव्हा ) घटनांवर असतात.

अश्याच अनेक कविता " आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहात आहेत.

हा माझ्या " नागरिक " या व्यक्तीला " जागरूक नागरिक " करण्याच्या उपक्रमातील एक भाग आहे.

आपला अभिप्राय satyajitshah64@gmail.com या ई मेल वर पाठवू शकता.



Monday, November 16, 2015

सर्रास पणे पायदळी तुडविले जाणारे वाहतुकीचे अनेक नियम

नमस्कार ,

सर्रास पणे पायदळी तुडविले जाणारे वाहतुकीचे अनेक नियम

अजून एका महत्वाच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचा श्रीगणेशा केला आहे.

" नवा काळ " ने सोमवार, १६.११.२०१५ च्या अंकात श्री. दिवाकर रावते - परिवहन मंत्री यांना मी  लिहिलेले पत्र छापले आहे.

त्याबद्दल मी जयश्री ताई खाडिलकर - संपादक , मालक यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

कृपया हे वाचा . आपण किती वर्षे गप्प बसणार ?

MOTOR VEHICLE ACT मध्ये वाहतुकीचे सगळे नियम हे सर्व भारतीयांना सम समान पणे लागू आहेत.

आपण e - paper वाचण्यासाठी  http://navakal.org/images/epaper.pdf     येथे CLICK करा. पण क्रमांक ६ वर हे चापून आले आहे.    

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet




Thursday, November 12, 2015

IN INDIA STRAY DOGS ARE BETTER TREATED THAN HUMANS

नमस्कार ,

आपल्या सर्वांना नवीन वर्ष अतिशय सुखा , समाधानाचे व भरभराटीचे जाओ .

या सोबत मी IBN LOKMAT या मराठी वृत्तवाहिनीवरील एका अति भयानक  बातमीबद्दल ( पिसाळलेल्या कुत्र्याचा ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे  यांना  चावा ) माहिती देणारी २ छायाचित्रे जोडत आहे.

हि बातमी दुपारी IBN LOKMAT वर दुपारी अंदाजे २.३० / ३.०० च्या सुमारास  दाखविली ( छायाचित्रात आहे त्या स्वरुपात ) गेली.

कोणीही  येवला, महाराष्ट्र राज्य , भारत येथील त्या ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे ज्यांना पिसाळलेला कुत्रा चावला यांचा कधीच विचार करणार नाहीत. त्या कोणाचाही दोष नसताना , त्यांना श्वान  दन्शाचा हा छळवाद.

पुन्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कि या श्वान दंशाच्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध ,  त्याच प्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्ये च्या प्रश्ना विरुद्ध आवाज उठवा.

तुम्हाला , तुमच्या प्रियजनांना श्वान दंश होई पर्यंत वाट पाहू नकात. लक्ष्यात ठेवा  शासनाला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही.

आपले दुर्दैव आहे कि भारत देशात भटक्या कुत्र्यांचे अति लाड होत आहेत आणि मानव प्राण्याची हेळसांड होत आहे.

उठा जागरूक नागरिक व्हा .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Friday, November 6, 2015

INDIA IS FACING VERY SERIOUS ISSUE OF STRAY DOG MENACE

नमस्कार ,

या सोबत जोडलेल्या ६ नोव्हेंबर , २०१५ च्या " लोकमत " नागपूर व " महाराष्ट्र टाईम्स " नागपूर च्या आवृत्तीमध्ये आलेल्या बातम्या वाचा.

हि अशी दयनीय  परिस्थिती महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी व आपल्या सध्याच्या माननीय , वंदनीय , आदरणीय अश्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामधील आहे.

नागपूरची हि अशी स्थिती तर मग बाकीच्या गावातील , शहरातील काय परिस्थिती असेल याचा विचार करा.

“ठाणे” या महानगरपालिका हद्दीत रोज अंदाजे २५ ते ३० श्वान दंशाच्या घटना घडतात. यावरून गणित मांडले तर महाराष्ट्र नावाच्या राज्यात रोज अंदाजे ७,७७० श्वान दंशाच्या घटना घडतात.

मुंबई मध्ये २०१२ साली ८२,२७४ जणांना श्वान दंश झाला तर २०१३ साली ८१,७१६ जणांना श्वान दंश झाला . म्हणजेच मुंबई मध्ये रोज अंदाजे २२० ते २३० जणांना श्वान दंश होतो. 

कृपया तुम्हाला , तुमच्या जवळच्यांना , तुमच्या आप्त स्वकीयांना श्वान दंश होण्याची व त्यांच्या वर एखादा दुर्धर प्रसंग येण्याची वाट पाहू नकात.
कृपया महाराष्ट्र शासनाच्या https://aaplesarkar.maharashtra.gov.in  या PORTAL  वर भटक्या कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या त्रासाबद्दल त्वरित तक्रार करा .

मी अनेकांसारखे  लोका  सांगे ब्रम्ह्द्यान असे करीत नाही , त्याच प्रमाणे फक्त प्रतिक्रिया देत बसत नाही , गेली ४ ते ५ वर्षे मी व माझे काही समविचारी मित्र या भटक्या कुत्र्यांच्या वाढत चाललेल्या संख्ये  विरुध्द अनेक पातळींवर लढत आहोत .

एक लक्ष्यात घ्या कि एक कुत्री दरवर्षी १२ पिल्लांना जन्म देते , जर हे असेच चालू राहिले तर येत्या काळात " भारत " नावाच्या देशात मानव प्राण्याच्या संख्ये एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या होणार आहे.

वारंवार स्वतःचे PROFILE PICTURES बदलाण्यापेक्ष्या देशाचे PICTURE बदला. 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 






Friday, October 23, 2015

STRAY DOG MENACE

Friends, 

for last few years, I am fighting against very serious issue faced by INDIANS , which is “ STRAY DOG MENACE “ . it is unfortunate that in INDIA , people wait till the explosion of any issue. Please go through this picture clicked by me few days back before  PADGHA TOLL NAKA on THANE – NASHIK highway. If you count , there are 12 STRAY DOGS at that location.

Some data :
Thane Municipal Limits : – Daily around 25 to 30 cases of STRAY DOG BITES are taking place

Thane District : – Daily around 210 cases of STRAY DOG BITES are taking place

Maharashtra State  : – Daily around 7,770 cases of STRAY DOG BITES are taking place

INDIA : – Daily around 90 Thousands to 1.2 LACS  cases of STRAY DOG BITES are taking place

Still you all wants to keep quiet ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt Them .  




Sunday, September 27, 2015

Fight of A COMMON MAN

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

या सोबत १९ सप्टेंबर , २०१५ चा व २७ सप्टेंबर , २०१५ चा HINDUSTAN TIMES या इंग्रजी वर्तमान पत्रातील मेघ पोळ हिने लिहिलेल्या बातम्या जोडत आहे. या प्रश्नावर मी १७  सप्टेंबर , २०१५ ला रात्री १०.०३ वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ई मेल ( छायाचित्रे पाठवून कळविले होते ). माझे प्रामाणिक मत आहे कि  भारतीय  नागरिकाने फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक व्हावे " व आपल्या हक्कांसाठी स्वतःच लढावे.
आणि कृपया मी का हे करू असे बिलकुल म्हणू नकात .  करा आणि बघा . केल्याने होत आहे रे आधी स्वतः ( दुसऱ्याने नाही )  केलेची पाहिजे. अजून एक - फक्त " प्रतिक्रिया "  न देता " क्रिया " करावे अशी माझी नम्र विनंती आहे.  

कृपया विसरू नकात कि हे सगळे भारत देशातील आदरणीय, वंदनीय , पूजनीय , माननीय व मोठ मोठ्या फलकांवर ( HOARDINGS ) वर झळकणारे , रस्ते अडवून सण साजरा करणारे यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष्य द्यायला वेळ नसतो.

या बातम्या दिल्याबद्दल मी मेघा पोळ हिचे  मनापासून आभार मानतो. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि लेखणी मध्ये खूप ताकद  आहे आणि माझ्या सारखा एक आती सामान्य नागरिक हि असे थोडे फार बदल घडवून  आणू शकतो..

Hello & Good Evening ,

Please read these 2  news article , published in Hindustan Times ( H.T.) dt. 19th Sept. 2015 & 27th Sept. 2015. First of all I am very much Thankful  to Ms. Megha Pol from H.T. for raising this issue on 19th Sept. 2015.

I had written about this with photographs to the Chief Minister of Maharashtra State on 17th Sept. 2015 @ 22.03 hrs.

It is my request to all INDIAN CITIZENS not to remain only “ CITIZEN “ , but to become “AN ALERT CITIZEN”.

Once again it has proved that efforts of A COMMON MAN like me pays off in such kind of social issues and also MEDIA plays crucial role in COMMON MAN's FIGHTS.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Monday, September 21, 2015

" आपले पोलिस " " वाहतूक पोलिस मित्र "

नमस्कार ,
आज ५ दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे. नुकतेच दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरळीत पार पडले.
आपण सगळे कबूल कराल कि अश्या प्रकारच्या सणात आपले पोलिस बंधू आणि भगिनी त्याच प्रमाणे वाहतूक पोलिस बंधू आणि भगिनी अक्षरशः अहोरात्र कामे करून सगळे सण सुरळीत पाने पार पाडण्यासाठी प्रयत्न शील असतात. अश्या वेळी त्यांना त्यांची तहान, भूख हि वीसरावी लागते.
आपलं जर त्याना या बद्दल तोंडी धन्यवाद दिले, एखादी पिण्याच्या पाण्याची बाटली दिली, तर पहा त्यांच्या चेहऱ्यावर कशी व किती ख़ुशी फुलते. माझ्या मते आपण एवढे जरूर करू शकतो. त्याच प्रमाणे नियमाने वागून त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतो.
त्यांचे हे कष्ट मी या दोनही कवितेन्मध्ये व्यक्त केले आहेत. दोनीही कविता " दक्षता " या महाराष्ट्र पोलिस पोलिसांच्या मासिकांमध्ये छापून आल्या आहेत.



Monday, September 14, 2015

कविता - " वाहतूक पोलिस मित्र "



" वाहतूक पोलिस मित्र "

नमस्कार  ,

या सोबत  मी लिहिलेली व " दक्षता " या मासिकाच्या सप्टेंबर, २०१५ च्या अंकात छापून आलेली " वाहतूक पोलिस मित्र " हि कविता जोडत  आहे.  " दक्षता "  हे    मासिक  वर्तमान  पत्राच्या ठेल्यावर मिळणार नाही. ते महाराष्ट्र पोलिस दर महिन्याला छापतात  व पोलिसांना व वर्गणीदारांना देतात. या कवितेद्वारे मी माझ्या वाहतूक पोलिसांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Hello, with this I have attached a POEM with Title “ Traffic Police – A Friend “ . This POEM is written by me and was published in the September , 2015 edition of one Monthly Magazine “ DAKSHATA “ which is published by Maharastra Police and is being curculated amongst POLICE Dept. and to the subscribers. These are my true feelings about Traffic Police and a sort of an APPRECIATION for their work towards keeping Traffic Smooth. 


Sunday, September 13, 2015

The Unique flyover Where instead of saving in travel time, the travel time has increased.

नमस्कार  ,

अनेक धोकादायक वळणांचा त्याच प्रमाणे अनेक अपघातग्रस्त ठिकाणे असलेला व त्याच प्रमाणे अतिशय विचित्र आकार ( DESIGN ) असलेला असा  जगावेगळा कापुरबावडी उड्डाणपूल हा " ठाणे " नावाच्या एका गावात माफ  करा शहरासारख्या वाटणाऱ्या गावात अने वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चालू झाला आहे. हा एक असा जगावेगळा उड्डाण पूल आहे कि ज्यामुळे वाहतुकीचा वेळ कमी होण्यापेक्षा वाढला आले. या पुलाच्या या अनेक असुविधान्बद्दल अनेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या आजी व माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक वेळा कळविले होते. तरीही हा असुविधाजनक उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला.

माझी देवाला मनापासून प्रार्थना आहे कि या विचित्र उड्डाणपुला मुळे भयानक असे अपघात होवू नये. त्या संदर्भात हि बातमी १३ सप्टेंबर , २०१५ च्या टाईम्स ऑफ इंडिया च्या अंकात आली आहे.

Hello,

This news article is published in a news paper “THE TIMES OF INDIA” dt. 13th Sept. 2015.

This KAPURBAVDI flyover at THANE , MAHARASHTRA , which is  dangerous in nature  , accident prone and with horrible design having very sharp turns has been recently opened  for traffic after lot of delay. This is a unique flyover because of instead of saving in travel time, the travel time has increased. In the past several times, I communicated with the past as well as current Chief Minister of MAHARASHTRA , about all these problems, issues , Accident Prone Areas etc. , but ultimately it was opened for traffic.

I pray to GOD for not having any major mishap on this HORRIBLE FLYOVER.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Wednesday, September 2, 2015

STRAY DOGS KILLED A BREAD EARNER OF A FAMILY IN KHED , MAHARASHTRA ( STRAY DOG MENACE )


Hello ,
For last 3 / 4 years , consistently I am writing to The Chief Ministers of Maharashtra about the exponential growth in the population of stray dogs as well about the increasing cases of STRAY DOG BITES, but unfortunately the condition remains UNCHANGED. With this , I have attached 2 news paper articles. One of the article gives information about killing of one youth ( who was a sole bread earner of his family ) because of STRAY DOG BITS,  in a village KHED ( in Maharashtra State ). Now his family is badly suffering.
It is my sincere request to all not to wait till you , your near and dear, friends, relatives to suffer badly from STRAY DOG BITS. Please raise your voice also against this very serious issue.
NEVER FORGET “ PREVENTION IS BETTER THAN CURE “.

नमस्कार ,

मी गेले ३ / ४ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रश्नावर व श्वान दंशाच्या वाढत्या घटनांवर अनेक वेळा ई मेल पाठविले, वेळो वेळी अनेक प्रकारची माहिती  पुरवली , पण परिस्थिती मध्ये काहीच बदल झाला नाही.

या सोबत वर्तमानपत्रातील दोन बातम्या जोडत आहे. तुम्हीच पहा आणि अजून किती वेळ या विषयावर आवाज न उठविता शांत राहायचे ते तुम्हीच ठरवा.

परत एकदा कळ कळीची विनंती आहे कि तुम्हाला , तुमच्या प्रियजनांना , आप्तस्वकीयांना , मित्र मैत्रीणीना भटका कुत्रा लचका तोडून , रक्त बंबाळ करण्याची वाट  पाहू नका.

विसरू नकात कि “ PREVENTION IS BETTER THAN CURE “.


Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet