Saturday, November 28, 2015

STILL YOU HAVE NOT ENJOYED STRAY DOG BITE ? काय आपणाला अजूनही श्वान दंश झाला नाही ?

सुंदर सकाळ आणि नमस्कार ,

आपणाला श्वान दंश झाला का ?

काय म्हणालात नाही ?

अरेरे किती दुर्दैवी आहात तुम्ही .

पण अजूनही संधी गेली नाही , असेच आपण " भटक्या कुत्र्याच्या त्रासावर " गप्प बसलात तर आपल्याला हि श्वान दंश लवकरच होईल.

काही वर्षात भारत या देशात श्वान दंश न झालेली व्यक्ती ( राजकारणी , नेते, मंत्री सोडून  ) शोधून सापडणार नाही.

" TIMES  OF  INDIA "  व " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त्त्पात्रातील २८.११.२०१५ च्या अंकातील या बातम्या यासोबत जोडत आहे.

गेली अंदाजे ४ एक वर्षे मी या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढणाऱ्या संख्येवर मी लढत आहे. अनेकवेळा शासन दरबारी हा प्रश्न नेला आहे.

आपल्या  भारत देश हा जगात एकमेव असा देश आहे  कि कोणताही प्रश्न अतिशय गंभीर  स्वरूप धारण केल्याशिवाय  त्यावर उपाय योजना करायची नसते . त्यातही ९९.९ ५ भारतीय नागरिक गप्प बसतात, त्यामुळे शासन काहीच हालचाल करीत नाही.

-          ठाणे  शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे ७०,००० झाली आहे.
-          ठाणे शहरात अंदाजे ३० व्यक्तीना श्वान दंश होतो.
-          भारत या देह्सात दरवर्षी अंदाजे ३५,००० हजार व्यक्ती रेबीस मुळे मृत्युमुखी पडतात.
-          अंदाजे ८० % श्वान दंशाच्या घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील मुलांना श्वान दंश होतो.
-          महाराष्ट्र राज्यात रोज अंदाजे ७,७०० व्यक्तींना श्वान दंश होतो.
-          म्हणजेच महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अंदाजे २८,१०,५०० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          " भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० श्वान दंशाच्या घटना घडतात,
-          म्हणजेच " भारत " या देशात दरवर्षी अंदाजे ५,१८,१५,४०० श्वान दंशाच्या घटना घडतात,

एका हाताच्या बोटावर मोजता येईल अश्या " प्राणी मित्रांमुळे " ( जे स्वतः मिटक्या मारून मांसाहार करतात - त्यावेळेला त्यांचे प्राणी प्रेम विसरतात )   या भटक्या कुत्र्यांपासून स्व-संरक्षण करण्यासाठी " मानव प्राणी " हातात काठी ग्यायला देखील घाबरतो.

दुसऱ्याला  श्वान दंश झाल्यावर मानव प्राणी गप्प बसतो. " माझ्या बापाचे काय जातो " हे मनात म्हणतो , पण स्वतःला , मुलाबाळांना , आप्तस्वकीयांना  श्वान दंश झाल्यावर मात्र खडबडून जागा होतो. हि आजच्या भारतीय नागरिकाची सत्य कहाणी आहे.

परत एकदा आपण भारतीयांना नम्र विनंती आहे कि भारत या देशात " मानव प्राण्यांचे " अस्तित्व टिकण्यासाठी या लढाईत उतरा , स्वतःवर शेकण्याची वाट पाहू नका .

फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " व्हा.

या प्रश्नावर कसा आवाज उठवायचा या साठी आपण मला  satyajitshah64@gmail.com या इ मेल वर  संपर्क साधू शकता.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet





No comments:

Post a Comment