मुंबई मध्ये १३ लाख ७० हजार
४७७ जणांना कुत्रे चावल्याच्या घटनेत ४३४ जणांचा मृत्यू
नमस्कार ,
काय दचकलात ? हे सगळ खर आहे . मी काही गम्मत करीत नाही.
हि बातमी १७.१२.२०१५ च्या " नवा काळ " या वर्तमान पत्रामध्ये आली आहे.
मी नेहमीच सांगतो कि " भारत " या देशात " मानव " प्राण्या पेक्ष्या " भटक्या कुत्र्यांना " जास्त किंमत दिली जाते.
गेली ३ ते ४ वर्षे मी या भटक्या कुत्र्यांमुळे मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासाबद्दल गल्ली ते दिल्ली सगळीकडे दाद मागतोय , पण हा त्रास कमी न होता वाढतच चालला आहे.
" ठाणे " महानगर पालिकेच्या हद्दीत रोज अंदाजे ३० व्यक्तींना श्वान दंशाचा "प्रसाद" मिळतो .
अजून एक महत्वाचे , श्वान दंशाच्या घटनांमध्ये ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
काय म्हणता तुम्हाला, तुमच्या मुलांना , आप्तेष्टांना अजून श्वान दंश झाला नाही म्हणून तुम्ही गप्प आहात ?
कृपया काळजी घ्या . कधीही , कोणालाही श्वान दंश होऊ शकतो.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment