Saturday, December 26, 2015

डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे " लोक बिरादरी प्रकल्प " - एक तीर्थक्षेत्र

नमस्कार सुंदर सकाळ ,

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात केव्हातरी चार धाम यात्रा सारख्या तीर्थयात्रेला जावून देवदर्शन करीत  असते.

याच दिवशी ( २७.१२.२०१४ ) , मागच्या वर्षी सारंग व वैभव या माझ्या नागपूर स्थित मित्रांमुळे आम्हाला एका फार मोठ्या तीर्थयात्रेला जावून देव दर्शनाचा  योग आला .

ते तीर्थक्षेत्र म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे " लोक बिरादरी प्रकल्प ". आणि देव म्हणजे साक्षात प्रकाश भाऊ ( डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ) .

निमित्त  होते " स्व. बाबा आमटे " यांचे जन्म शताब्दी वर्ष.

एका अप्रतिम कार्यक्रमाला हजार राहता आले याच आम्हाला अतिशय आनंद झाला . कार्यक्रमाची आखणी , सगळ्या पाहुण्याची सोय , आदरातिथ्य या व इतर अनेक बाबी प्रकाश भाऊंच्या मुलांनी व सुनांनी व " लोक बिरादरी प्रकल्प " मधील कार्यकर्त्यांनी फार चोख पणे सांभाळल्या होत्या .

मला , सारंग व वैभव या तिघांना खरोखर अत्युच्य अश्या तीर्थ क्षेत्री जावून देव दर्शन झाल्याचा अनुभव आला.

प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी तेथे भेट द्यावी जेणेकरून प्रकाश भाऊ , मंद ताई , त्यांची मुले , सुना , व अनेक कार्यकर्ते यांचे काम पाहता येईल व स्वतःच्या आयुष्याला एक मार्ग मिळेल.


आम्ही निघताना प्रकाश भाऊ व त्यांच्या कुटुंबाने एवढा प्रेमळ निरोप  दिला व पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले कि ते प्रेम , जिव्हाळा आम्ही कधीच विसरू शकत नाही. 


No comments:

Post a Comment