Thursday, November 12, 2015

IN INDIA STRAY DOGS ARE BETTER TREATED THAN HUMANS

नमस्कार ,

आपल्या सर्वांना नवीन वर्ष अतिशय सुखा , समाधानाचे व भरभराटीचे जाओ .

या सोबत मी IBN LOKMAT या मराठी वृत्तवाहिनीवरील एका अति भयानक  बातमीबद्दल ( पिसाळलेल्या कुत्र्याचा ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे  यांना  चावा ) माहिती देणारी २ छायाचित्रे जोडत आहे.

हि बातमी दुपारी IBN LOKMAT वर दुपारी अंदाजे २.३० / ३.०० च्या सुमारास  दाखविली ( छायाचित्रात आहे त्या स्वरुपात ) गेली.

कोणीही  येवला, महाराष्ट्र राज्य , भारत येथील त्या ३ महिला , ४ पुरुषे व अनेक जनावरे ज्यांना पिसाळलेला कुत्रा चावला यांचा कधीच विचार करणार नाहीत. त्या कोणाचाही दोष नसताना , त्यांना श्वान  दन्शाचा हा छळवाद.

पुन्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कि या श्वान दंशाच्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध ,  त्याच प्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्ये च्या प्रश्ना विरुद्ध आवाज उठवा.

तुम्हाला , तुमच्या प्रियजनांना श्वान दंश होई पर्यंत वाट पाहू नकात. लक्ष्यात ठेवा  शासनाला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही.

आपले दुर्दैव आहे कि भारत देशात भटक्या कुत्र्यांचे अति लाड होत आहेत आणि मानव प्राण्याची हेळसांड होत आहे.

उठा जागरूक नागरिक व्हा .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 



No comments:

Post a Comment