नमस्कार ,
आज ५ दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे. नुकतेच दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरळीत पार पडले.
आपण सगळे कबूल कराल कि अश्या प्रकारच्या सणात आपले पोलिस बंधू आणि भगिनी त्याच प्रमाणे वाहतूक पोलिस बंधू आणि भगिनी अक्षरशः अहोरात्र कामे करून सगळे सण सुरळीत पाने पार पाडण्यासाठी प्रयत्न शील असतात. अश्या वेळी त्यांना त्यांची तहान, भूख हि वीसरावी लागते.
आपलं जर त्याना या बद्दल तोंडी धन्यवाद दिले, एखादी पिण्याच्या पाण्याची बाटली दिली, तर पहा त्यांच्या चेहऱ्यावर कशी व किती ख़ुशी फुलते. माझ्या मते आपण एवढे जरूर करू शकतो. त्याच प्रमाणे नियमाने वागून त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतो.
त्यांचे हे कष्ट मी या दोनही कवितेन्मध्ये व्यक्त केले आहेत. दोनीही कविता " दक्षता " या महाराष्ट्र पोलिस पोलिसांच्या मासिकांमध्ये छापून आल्या आहेत.
No comments:
Post a Comment