नमस्कार ,
या सोबत जोडलेल्या ६ नोव्हेंबर , २०१५ च्या " लोकमत
" नागपूर व " महाराष्ट्र टाईम्स " नागपूर च्या आवृत्तीमध्ये आलेल्या
बातम्या वाचा.
हि अशी दयनीय परिस्थिती
महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानी व आपल्या सध्याच्या माननीय , वंदनीय , आदरणीय अश्या
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामधील आहे.
नागपूरची
हि अशी स्थिती तर मग बाकीच्या गावातील , शहरातील काय परिस्थिती असेल याचा विचार करा.
“ठाणे” या
महानगरपालिका हद्दीत रोज अंदाजे २५ ते ३० श्वान दंशाच्या घटना घडतात. यावरून गणित मांडले
तर महाराष्ट्र नावाच्या राज्यात रोज अंदाजे ७,७७० श्वान दंशाच्या घटना घडतात.
मुंबई मध्ये २०१२ साली ८२,२७४ जणांना श्वान दंश झाला तर २०१३
साली ८१,७१६ जणांना श्वान दंश झाला . म्हणजेच मुंबई मध्ये रोज अंदाजे २२० ते २३० जणांना
श्वान दंश होतो.
कृपया तुम्हाला , तुमच्या जवळच्यांना , तुमच्या आप्त स्वकीयांना
श्वान दंश होण्याची व त्यांच्या वर एखादा दुर्धर प्रसंग येण्याची वाट पाहू नकात.
कृपया महाराष्ट्र
शासनाच्या https://aaplesarkar. maharashtra.gov.in या PORTAL वर भटक्या कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या त्रासाबद्दल
त्वरित तक्रार करा .
मी अनेकांसारखे लोका सांगे
ब्रम्ह्द्यान असे करीत नाही , त्याच प्रमाणे फक्त प्रतिक्रिया देत बसत नाही , गेली
४ ते ५ वर्षे मी व माझे काही समविचारी मित्र या भटक्या कुत्र्यांच्या वाढत चाललेल्या
संख्ये विरुध्द अनेक पातळींवर लढत आहोत .
एक लक्ष्यात
घ्या कि एक कुत्री दरवर्षी १२ पिल्लांना जन्म देते , जर हे असेच चालू राहिले तर येत्या
काळात " भारत " नावाच्या देशात मानव प्राण्याच्या संख्ये एवढी भटक्या कुत्र्यांची
संख्या होणार आहे.
वारंवार स्वतःचे
PROFILE PICTURES बदलाण्यापेक्ष्या देशाचे PICTURE बदला.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment