Tuesday, February 26, 2019

२७ फेब्रुवारी , जागतिक मराठी दिन / मराठी भाषा दिवस / मराठी राजभाषा दिन


२७ फेब्रुवारीजागतिक मराठी दिन / मराठी भाषा दिवस / मराठी राजभाषा  दिन 
एक नम्र विनंती : मराठी आडनाव लावणाऱ्या , स्वतःला मराठी म्हणविणाऱ्या मराठी संभाषण करताना मराठी वापरण्याची लाज वाटणाऱ्या मराठी व्यक्तींनीच हे वाचावं . ) 
नमस्कार
अरे बापरे माफ करा , अनेक मराठी आडनाव असलेल्या मराठी व्यक्तींना " नमस्कार " हे कळणार नाही . अश्यांसाठी HELLO , HI , HOW ARE YOU ? 
" आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग "
"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे" . कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
- पु.. देशपांडे - संदर्भ : "आमचे भाषाविषयक धोरण "
सध्या मराठीची गत याहूनही वाईट झाली आहे .
दोन मराठी व्यक्ती , मराठी मध्ये बोलताना प्रत्येक वाक्यात अंदाजे ४० ते ८० % इंग्रजी शब्द वापरतात. आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमात देखील काहीसं असच अनुभवायला मिळतं . याबाबत आकाशवाणी निवेदक / निवेदिका ( आजच्या शुद्ध प्रचलित मराठीत RJ ) यांना याबाबत दूरध्वनी केला असता , " YOUNG GENERATION " ला UNDERSTANDING ( कळण्यासाठी ) आम्ही असं मराठी कमी इंग्रजी शब्द जास्त बोलतो , असं उत्तर मिळतं . आकाशवाणी वरील एका मराठी FM वाहिनीवरील, एका मराठी कार्यक्रमाचं नाव होतं , BREAKFAST SHOW ( त्या ऐवजी खमंग न्याहरी हे अतिशय योग्य [ APT ] नाव हवं होत ) .
मराठी मालिकांचे हाल तर याहूनही वाईट आहेत.
मराठी वृत्त वाहिन्या देखील इंग्रजी मिश्रित मराठीत बातम्या देत असतात , कार्यक्रम सादर करीत असतात .
मराठी जाहिराती देखील अंदाजे ५० % ते ७० % इंग्रजी मिश्रित असतात . 
हे इंग्रजी  मिश्रीत ( आजच्या शुद्ध प्रचलित मराठीत  ENGLISH MIXED )  मराठी एवढं वाढत जात आहे कि भविष्यात  " गोरी गोरी पान फुलासारखी छानहे    दि माडगूळकर ( गदिमा ) यांचे अजरामर असे  एक गीत भविष्यात खालील प्रमाणे देखील   गायले  जाऊ शकेल

POEM  -  " Fair Fair पान  Flower सारखी छान " म्हणजेच कविता -  " गोरी गोरी पान फुलासारखी छान    " 

Fair Fair पान  Flower सारखी छान 
Brother bring me एक वाहिनी छान !

Fair Fair वाहिनीची DARKNESS ची साडी 
DARKNESS  च्या  SAREE वर STARS  ची खडी 
STARS च्या पदराला LIGHTNING चा बाण !

SISTER IN LAW ला आणायाला MOON ची गाडी 
MOON च्या गाडीला DEER ची जोडी 
DEER ची गाडी तुडवी ROSE चे रान !

SISTER IN LAW शी FIGHT होता  तुला TWO थापा  
तुला TWO थापा   , तिला SUGAR चा पापा 
DOLLS सारखं होऊ WE BOTH सान !
  

मूळ  गीत  - " गोरी गोरी पान फुलासारखी छान "   

गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान !  
ता. . मला येथे मूळ गाण्याची अजिबात विल्हेवाट लावायची नाही , पण भविष्यातील मराठीची एक झलक फक्त दाखवायची आहे

मी  कोणाला इंग्रजी संभाषण करताना , JUST NOW FINISHED MY नाश्ता , असे म्हटलेले कधीच ऐकले नाही , पण मराठी संभाषणात मात्र आताच BREAK-FAST केला , असे म्हटलेले सर्रास पणे  आढळून येते. 
मराठी आडनावं असलेल्या उच्च शिक्षित , महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी MOTHER TONGUE ( मातृभाषा ) असलेल्या मराठी व्यक्तींची काही मराठी वाक्ये खाली नमुन्यादाखल ( FOR EXAMPLE ) देत आहे . 
- अरे पेपरात ( वृत्तपत्रात ) हे काय प्रिंट ( छापून ) आलाय ? 
- काय फाईन ( मस्त ) पाऊसिंग ( पाऊस पडतोय )  ना ? 
- काय हाईटेड ( उंच ) , यंग ( तरुण ) , च्याप ( व्यक्ती ) आहे .  
शुद्ध मराठी बोलायला  ( मातृभाषेत ) , कसली लाज वाटते ?  कसला कमीपणा वाटतो ? का इंग्रजीच्या कुबड्या घ्यायच्या ? 
कोठे नेऊन ठेवले आहे मराठी माणसांनीच  मराठीला ?
प्रतिक्रिया देण्या अगोदर सगळं कृपया व्यवस्थित वाचा , आपण स्वतः  मराठी संभाषणात किती इंग्रजी शब्द , किती इंग्रजी  वाक्ये वापरता याचा हि विचार करा .
चला , स्वतःपासूनच मराठी संभाषण  शुद्ध मराठीत करण्याची सुरुवात करूया . 
फक्त नावासाठी ( FAD / FASHION  म्हणून )  जागतिक मराठी दिन / मराठी भाषा दिवस / मराठी राजभाषा  दिन साजरा नको करूया . 
आपणच मराठीला लोप पावण्यापासून वाचवूया . 
सत्यजित शाह - ठाणे - 
संपर्क क्रमांक : ९८२११५०८५८
काय मगं ? ( WHATSAPP ) : ७०४५००१३४० 
https://fightofacommonman.blogspot.com/
#जागतिकमराठीदिन   #मराठीभाषादिवस   #मराठीराजभाषादिन


No comments:

Post a Comment