" अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार "
" अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार "
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार चालू पुन्हा करण्यास परवानगी दिली अशी एक बातमी वृत्तवाहिन्यांवर ऐकली . ते ऐकल्यावर " अखेर डान्स बार पुन्हा सुरु होणार " हि एक कविता सुचली.
ती कविता येथे देत आहे . माझ्या मते अनेकांच्या याच प्रकारे भावना असतील .
ता. क . हि स्वरचीत कविता आहे . ( कोणाचीतरी कविता चोरी करून स्वतःच्या नावाने खपवित नाही ) . आपण देखील या कवितेची चोरी करून स्वतःच्या नावाने खपविण्याचे दुष्कृत्य करू नये हि एक चेतावणी . .
उठणार रे उठणार
डान्स बार वरची बंदी उठणार
होणार कि हो होणार
आबांच्या आत्म्याला असह्य वेदना होणार ।। १ ।।
होणार कि हो होणार
शौकिनांचा जणू दुष्काळच दूर होणार
होणार कि हो होणार
फुलण्याआधीच अनेक संसार उध्वस्त होणार ।। २ ।।
नोटबंदीचा विसर कि हो पडणार
२००० च्या नोटांची बरसात कि हो होणार
माला माल होणार कि हो होणार
अनेक तरन्नुम आता माला माल होणार ।। ३ ।।
वाहणार कि हो वाहणार
दारूच्या नदयाच नदया वाहणार
जाणार कि हो जाणार
उत्सुकतेपोटी तरुणाई भरकटत जाणार ।। ४ ।।
चालत होत कि चालत होत
जे लपून छपून चालत होत
होणार कि होणार
ते आत्ता खुल्लम खुल्ला होणार ।। ५ ।।
होणार कि हो होणार
पैसेवाल्यांची चंगळ होणार
होणार कि हो होणार
शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मात्र वाढ होणार ।। ६ ।।
लागणार कि हो लागणार
गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागणार
जाणार कि हो जाणार
महाराष्ट्र चार पावले मागेच कि हो जाणार ।। ७ ।।
अहो होणार कि हो होणार
अखेर डान्स बार सुरु कि हो होणार
बार बालांची मदमस्त पाऊले
फ्लोर वर छम छम करीत कि हो थिरकणार ।। ८ ।।
सत्यजित अ शाह - ठाणे
No comments:
Post a Comment