प्राणी मित्र - प्राणी मैत्रीण यांची दादागिरी - एक दुर्दैवी वास्तव
बुधवार , २२.जून , २०१६ रोजी , रात्रौ ८.३० ते ९.३० या वेळात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर चांगली चर्चा ( थेट प्रक्षेपण / LIVE TELECAST ) " ABP माझा " या एका प्रतिष्ठित वृत्त वाहिनीने घडवून आणली होती . त्यात सुदैवाने मला देखील सहभागी होता आले.
गम्मत म्हणजे त्यामुळे फेसबुकवर प्राणीमित्र / प्राणिमैत्रीण माझ्यावर चवताळले आहेत.
अहो मी ही तक्रार नाही करत.. ही तुम्हाला भारत या देशातील प्राणी मित्र / प्राणी मैत्रिणी यांची दादागिरी दाखवावीशी वाटली म्हणून हा सगळं खटाटोप .
या सोबत दोन छायाचित्रे जोडत आहे , जी मला फेसबुक वर टिप्पणी ( COMMENTS) म्हणून आली आहेत.
या अगोदर प्राणी मित्रांच्या दादागिरीबद्दल ऐकून होतो . पण आज अनुभव आला. त्या मुलीने मला चक्क अप्रयत्यक्ष पणे पोलिसात तक्रार करण्याचा धमकी वजा इशारा दिला आहे.
मी हे आमदार श्री. संजय केळकर यांना कळविले , तेंव्हा त्यांचे उत्तर आले की अजिबात काळजी करू नको.
अशी दमदाटी प्राणी मित्रांनी या अगोदर ठाण्यातील एका प्रतिष्ठित दैनिकाच्या उपसंपादकांना देखील झाली होती , पण त्यांनी जेव्हा याला भिक नाही घातली तेंव्हा प्राणी मित्र गप्प बसले.
Forwarding below thoughts of Mahatma Gandhi on the issue of STRAY DOG MENACE .
In the article in 'Young India' in 1926, Mahatma Gandhi, the strongest voice on non-violence, had said he favoured killing of dogs "whenever they are a menace to the society".
"A roving dog without an owner is a danger to society and a swarm of them is a menace to its very existence... If we want to keep dogs in towns or villages in a decent manner, no dog should be suffered to wander. There should be no stray dogs even as we have no stray cattle..."But can we take individual charge of these roving dogs? Can we have a pinjrapole for them? If both these things are impossible, then there seems to me no alternative except to kill them," Gandhi had said.
Read more at: http://www.oneindia.com/india/culling-of-stray-dogs-mahatma-gandhi-s-write-up-quoted-in-sc-1931404.html
या वर दिलेल्या महात्मा गांधी यांच्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरील विचार मी कालच्या कार्यक्रमात मांडले होते.
मी पुरावा असल्याशिवाय शक्यतो बोलत नाही , व अभ्यास केल्याशिवाय , माहिती काढल्याशिवाय बोलत नाही .
खालील माहितीने आपल्याला धक्का बसेल.
१. ) ठाणे महानगर पालिका हद्दीत दररोज अंदाजे ९० / १०० व्यक्तींना श्वान दंश होतो.
२. ) महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ९,००० / १०,००० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
३. ) भारत या देशात दररोज अंदाजे १,६०,००० / १,७०,००० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
कृपया लक्ष्यात घ्या की शासनाकडे माहिती फक्त शासकीय रुग्णालये येथे आलेल्या श्वानदंश ग्रस्त व्यक्तींचीत असते , बाकी ६० ते ७० % व्यक्ती उपचार खाजगी रुग्णालयातून करतात.
श्वानदंशाच्या घटनेत ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
अशी दमदाटी करून काय साध्य होईल याची मला कल्पना नाही .
या प्राणी मित्रांना घाबरून कोणीही आजपर्यंत याविरुद्ध ब्र काढीत नव्हते.
आपल्याला आश्चर्य वाटेल की जर भटका कुत्रा / कुत्रे अंगावर हल्ला करण्यासाठी आला आणि आपण त्याला स्वसंरक्षणासाठी दगड मारला तरीही कोठून तरी प्राणी मित्र / प्राणी मैत्रीण येतात , पोलिसांना बोलावले जाते, आणि कधी नव्हे ते पोलीस तात्काळ हजर होऊन त्या मानव प्राण्याला पकडून नेतात .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment