हसा व निरोगी व्हा
निरोगी राहण्यासाठी मला फेसबुक या एका सामाजिक माध्यमाची ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठी भाषेत SOCIAL MEDIA ) बऱ्यापैकी मदत होते . कसे ते पहा ....
काल कंटाळा आला म्हणून विरंगुळ्यासाठी फेसबुक पहात होतो . एका मराठी आडनावाच्या तरुणाने त्याच्या " मालमता विक्री " च्या ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठी भाषेत PROPERTY DEALING ) या व्यवसायाविषयी माहिती दिली होती . दुसऱ्याचं अंधानुकरण करून ऐटीत इंग्रजीत माहिती दिली होती . त्या माहितीतील ( BEST REAL ESTATE INVESTMENT GUIDER ) हे वाक्य वाचून मला हसावं का रडावं ते कळेना . मी मुद्दाम GUIDER चा मराठीत काय अर्थ होतो हे GOOGLE मध्ये शोधले , पण GOOGLE ने GUIDER चा मराठीत अर्थ सांगण्यास असमर्थता दर्शवली . ( GOOGLE ने सपशेल हात टेकले ) .
मराठी असून देखील ओढून , ताणून अस्तित्वात नसलेल्या इंग्रजी शब्दांचा असा वापर पाहून माझे भरपूर मनोरंजन झाले . निरोगी व्हायला थोडीशी मदत झाली.
तेंव्हा " हसा व निरोगी व्हा " .
मी तुमचा निरोगी राहण्याचा "GUIDER" होऊ का ?
No comments:
Post a Comment