Monday, February 18, 2019

आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग

नमस्कार , ,
"आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग "
"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे" . कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
- पु.ल. देशपांडे - संदर्भ : "आमचे भाषाविषयक धोरण "
सध्या मराठीची गत याहूनही वाईट झाली आहे .
दोन मराठी व्यक्ती , मराठी मध्ये बोलताना प्रत्येक वाक्यात अंदाजे ४० ते ८० % इंग्रजी शब्द वापरतात. आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमात देखील काहीसं असच अनुभवायला मिळतं . याबाबत आकाशवाणी निवेदक / निवेदिका ( आमच्या शुद्ध मराठीत RJ ) यांना याबाबत दूरध्वनी केला असता , " YOUNG GENERATION " ला कळण्यासाठी आम्ही असं मराठी कमी व इंग्रजी शब्द जास्त बोलतो , असं उत्तर मिळतं . आकाशवाणी वरील एका मराठी FM वाहिनीवरील, एका मराठी कार्यक्रमाचं नाव होतं , BREAKFAST SHOW .
मराठी मालिकांचे हाल तर याहूनही वाईट आहेत.

मराठी वृत्त वाहिन्या देखील इंग्रजी मिश्रित मराठीत बातम्या देत असतात , कार्यक्रम सादर करीत असतात . 

मी आधीही कोणाला इंग्रजी संभाषण करताना , JUST NOW FINISHED MY नाश्ता , असे कधीच ऐकले नाही , पण मराठी संभाषणात मात्र आताच BREAK FAST केला , असे सर्रास ऐकू येते.
शुद्ध मराठी बोलताना ( मातृभाषेत ) , कसली लाज वाटते , कसला कमीपणा वाटतो ?
कोठे नेऊन ठेवले आहे मराठी माणसांनी मराठीला ?
प्रतिक्रिया देण्या अगोदर कृपया व्यवस्थित वाचा , आपण मराठी संभाषणात किती इंग्रजी शब्द , वाक्ये वापरता याचा हि विचार करा .
चला , स्वतःपासूनच शुद्ध मराठी बोलायची सुरुवात करूया .
आपणच मराठीला वाचवूया !
सत्यजित अ शाह - ठाणे

No comments:

Post a Comment