भारतीय मानसिकता - १
मी ठाणे या एका शहरातील एका रहिवासी संकुलात ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत HOUSING COMPLEX मध्ये ) राहतो . आमच्या रहिवासी संकुलात तरण तलाव , व्यायामशाळा व इतर अनेक सुविधा असलेले एक छोटेसे क्रीडा संकुल ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत CLUB HOUSE ) देखील आहे.
या सोबत एक आज , शुक्रवार , ८ मार्च, २०१९ रोजी सायंकाळी मी आमच्या क्रीडा संकुलाच्या द्वाराबाहेरील टिपलेले छायाचित्र दिले आहे. आपल्याला द्वाराबाहेर पादत्राणे ठेवण्यासाठी एक छोटेसे कपाट दिसत आहे . ते कपाट पादत्राणे ठेवण्यासाठीच
तेथे ठेवले आहे , पण आपण जर निरखून
पाहिले तर आपणांस असे आढळून येईल के पादत्राणांच्या
दोन जोड्या सोडल्यास बाकी सर्व पादत्राणे मनाला येईल तेथे विखुरलेल्या अवस्थेत अक्षरशः फेकली आहेत . त्या दोन जोड्यांपैकी एक जोडी पादत्राणांची
( जी पहिल्या रांगेत व्यवस्थितपणे
ठेवली आहेत ) ती माझी आहेत ( मी नेहमी तेथेच ठेवतो. ) .
हे पादत्राणे ठेवण्यांवरून भारतीयांची मानसिकता दिसून येते . ती मानसिकता म्हणजे मला कोण अडवणार ? मला हवे तेथे मी पादत्राणे ठेवणार नव्हे फेकणार . अगदी निरखून पहिले तर असे आढळेल कि त्या पादत्राणांमध्ये
५ / ७ जोड पादत्राणे हि लहान मुलांची आहेत . ती मुले मोठ्यांनी विखुरलेल्या अवस्थेत ठेवलेली पादत्राणे पाहतात व त्याप्रमाणे अनुकरण करतात .
तुम्हीच सांगा अश्या कोठेही पादत्राणे फेकणाऱ्या सुशिक्षित ( ? ) , सुसंस्कृत
( ? ) , स्वतःला श्रीमंत ( ? ) म्हणवून घेणाऱ्या भारतीयांना काय म्हणायचं ?
काही होणार नाही असे म्हणून मी गप्प बसणाऱ्यांपैकी
नाही .
मी अश्या प्रकारच्या अनेक घटना , प्रसंग या फेसबुक नावाच्या सामाजिक माध्यमाद्वारे उघड करणार आहे .
निदान जनाची नाही तरी मनाची तरी वाटून कधीतरी हि मानसिकता बदलेल अशी आशा आहे .
केल्याने होत आहे रे . . . . . . .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
https://fightofacommonman.blogspot.com/
No comments:
Post a Comment