Friday, March 15, 2019

धकाधकीच्या जीवनातील विनोदी क्षण

धकाधकीच्या जीवनातील विनोदी क्षण - ( शाकाहारी चहा , शाकाहारी कॉफी , शाकाहारी ताजा फळाचा रस , शाकाहारी फळांचा साठविलेला रस )
फरिदाबाद येथील एका त्री तारांकित विश्रामगृहात ( THREE STAR HOTEL ) आमच्या काही परदेशी पाहुण्यांसोबत राहिलो होतो.
तेथे न्याहारीसाठी स्व: सेवा ( SELF SERVICE ) अशी व्यवस्था होती . कोण कोणते पदार्थ आहेत हे मी पाहत असताना एके ठिकाणी दोन वेग वेगळ्या टाक्या दिसल्या व त्याच्या बाजूला TEA व COFFEE असे लिहिलेल्या पाट्या होत्या . गम्मत म्हणजे त्या पाट्यांवर शाकाहारी पदार्थांसाठी ज्याप्रमाणे ठळक दिसेल असा हिरवा ठिपका असतो तसा हिरवा ठिपका त्या चहा व कॉफी च्या पाट्यांवर होता . थोडसं पुढे गेल्यावर फळांचे रस ठेवलेली पात्र होती , त्यावर FRESH JUICE व CANNED JUICE असे लिहिलेल्या पाट्या होत्या . त्या पाट्यांवर देखील शाकाहारी पदार्थांसाठी ज्याप्रमाणे ठळक दिसेल असा हिरवा ठिपका असतो तसा हिरवा ठिपका होता . मी तर कधीही मांसाहारी चहा , मांसाहारी कॉफी , मांसाहारी ताजा फळाचा रस , मांसाहारी फळांचा साठविलेला रस पाहिला , ऐकला नव्हता . ते सर्व पाहून माझे छानसं मनोरंजन झाले .
मी तेथील व्यवस्थापकाला विचारलं देखील कि तुमच्याकडे मांसाहारी चहा , मांसाहारी कॉफी , मांसाहारी ताजा फळाचा रस , मांसाहारी फळांचा साठविलेला रस मिळतो का ? त्याला प्रश्न नाही कळाला . जेंव्हा त्याला त्या पाट्या दाखविल्या तेंव्हा तो ही खदा , खदा हसू लागला .
आपल्या धकाधकीच्या जीवनात असे अनेक विनोदी क्षण येत असतात . मी तर असे ते क्षण मस्त पैकी उपभोगत असतो . ज्यामुळे माझा उच्च रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होत असते .
या सोबत पुरावा म्हणून शाकाहारी चहा , शाकाहारी कॉफी , शाकाहारी ताजा फळाचा रस , शाकाहारी फळांचा साठविलेला रस व त्या पाट्या यांची छायाचित्रे येथे देत आहे .





No comments:

Post a Comment