" प्राणी - पक्षी " संघटना गप्प का ? - सत्यजित अ शाह
साप्ताहिक "मुख्यमंत्री" - २५ मार्च, २०१८ ते ३१ मार्च, २०१९
सध्या " पोपट " या एका मिठू मिठू करणाऱ्या ( जो जे ऐकतो , जो जे शिकतो तेच बोलणाऱ्या ) एका पक्ष्याला ( राजकीय पक्ष्याला नव्हे तर " पक्षी " असणाऱ्या पक्ष्याला ) उगाचच भारतीय राजकारणात ओढून ताणून गोवलं / ओढलं जातंय , त्याला बदनाम केलं जातंय .
या अगोदर अनेकदा राजकारण्यांनी अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , व दररोज अंदाजे १,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या व भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या , पण अतिशय निरपराध , निष्पाप अश्या " कुत्रा " या प्राण्याला देखील राजकारणात गोवले / ओढलं होते .
त्याचप्रमाणे घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या व इतर अनेक निष्पाप प्राणी , पक्षी यांना राजकारण्यांनी अनेकदा एकमेकांवर चिखलफेक ( रंगमंचमीची नव्हे ) करण्यासाठी वापरून घेतले आहे .
खरं तर हा त्या निष्पाप , मुक्या पक्षी , प्राणी यांचा हा एक प्रकारे घोर अपमान आहे . पण गंमत पहा , भारत या देशात स्वसंरक्षणासाठी , श्वान दंशापासून वाचण्यासाठी मानव प्राण्याने " कुत्रा " या एका लोप पावत असलेल्या ( " लोप पावत असलेल्या " हे उपरोधिक पणे म्हटले आहे ) ( अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , व दररोज अंदाजे १,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या व भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या , पण अतिशय निरपराध , निष्पाप अश्या " कुत्रा " या प्राण्याला ) " हाड " म्हटले , अथवा त्याला दगड मारला , काठी फेकून मारली कि कोठून तरी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संस्था वगैरे वगैरे धावून येतात , पोलिसांकडे तक्रार करतात व स्वसंरक्षणासाठी हाड करणाऱ्या , दगड मारणाऱ्या मानव प्राण्याला अटक करण्यास पोलिसांना भाग पाडतात . पण तेच प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , त्याच प्राणी संस्था , या अश्या इतर पक्षी , प्राण्यांवर दिवस ढवळ्या , उघडपणे , प्रसार माध्यमांमध्ये , होणाऱ्या घोर अपमानावर मात्र मूग गिळून का गप्प बसले आहेत , गप्प बसतात याचे कोडे मात्र मला कधीच सुटले नाही ?
" कुत्रे " नावाच्या प्राण्यांना वेगळा न्याय व घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या व इतर अनेक निष्पाप प्राणी , पक्षी यांना वेगळा न्याय हे अयोग्य आहे . या पक्षपातीपणाचा धिक्कार करावासा वाटतो . हा अन्याय थांबला पाहिजे .
ता. क. " पोपट " या पक्ष्याला मुका पक्षी नाही म्हणू शकणार कारण हा पक्षी जे ऐकतो , जे शिकतो तेच बोलतो .
No comments:
Post a Comment