Thursday, March 21, 2019

प्राणी , पक्षी , राजकारणी व्यक्ती , प्राणी मित्र , प्राणी संघटना

प्राणी , पक्षी , राजकारणी व्यक्ती , प्राणी मित्र , प्राणी संघटना 

सध्या " पोपट " या एका मिठू मिठू करणाऱ्या  ( जो जे ऐकतो , जो जे शिकतो तेच बोलणाऱ्या )  एका  पक्ष्याला  ( राजकीय पक्ष्याला नव्हे तर  " पक्षी " असणाऱ्या पक्ष्याला ) उगाचच भारतीय राजकारणात ओढून  ताणून गोवलं / ओढलं  जातंय , त्याला बदनाम केलं जातंय .  

या अगोदर अनेकदा राजकारण्यांनी अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , व दररोज अंदाजे १,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या व भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या ,  पण अतिशय निरपराध , निष्पाप  अश्या  " कुत्रा " या  प्राण्याला देखील राजकारणात गोवले / ओढलं  होते . 

त्याचप्रमाणे घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा  , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या व इतर अनेक निष्पाप  प्राणी , पक्षी यांना राजकारण्यांनी अनेकदा एकमेकांवर चिखलफेक ( रंगमंचमीची नव्हे ) करण्यासाठी  वापरून घेतले आहे . 

खरं तर हा त्या निष्पाप , मुक्या  पक्षी , प्राणी यांचा हा एक प्रकारे घोर अपमान आहे . पण गंमत पहा , भारत या देशात स्वसंरक्षणासाठी , श्वान दंशापासून वाचण्यासाठी मानव प्राण्याने " कुत्रा "  या एका लोप पावत असलेल्या ( " लोप पावत असलेल्या " हे  उपरोधिक पणे म्हटले आहे ) (  अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , व दररोज अंदाजे १,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या व भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या ,  पण अतिशय निरपराध , निष्पाप  अश्या  " कुत्रा " या  प्राण्याला )  " हाड " म्हटले , अथवा त्याला दगड मारला , काठी फेकून मारली कि कोठून तरी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संस्था वगैरे वगैरे धावून येतात , पोलिसांकडे तक्रार करतात व  स्वसंरक्षणासाठी हाड करणाऱ्या , दगड मारणाऱ्या मानव प्राण्याला अटक करण्यास पोलिसांना भाग पाडतात . पण तेच प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , त्याच प्राणी संस्था , या अश्या इतर  पक्षी , प्राण्यांवर दिवस ढवळ्या , उघडपणे , प्रसार माध्यमांमध्ये , होणाऱ्या घोर अपमानावर मात्र मूग गिळून का गप्प बसले आहेत , गप्प बसतात  याचे कोडे मात्र मला कधीच सुटले नाही ? 

" कुत्रे " नावाच्या प्राण्यांना वेगळा न्याय व घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा  , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या व इतर अनेक निष्पाप  प्राणी , पक्षी यांना वेगळा न्याय हे अयोग्य आहे . या पक्षपातीपणाचा  धिक्कार करावासा  वाटतो . हा अन्याय थांबला पाहिजे . 

ता. क.  " पोपट " या पक्ष्याला मुका पक्षी नाही म्हणू शकणार कारण हा पक्षी जे ऐकतो , जे शिकतो तेच बोलतो . 


No comments:

Post a Comment