Monday, March 25, 2019

रिक्षवाल्यांना कायदे लागू नाहीत ?

रिक्षवाल्यांना कायदे लागू नाहीत ?

२२ मार्च, २०१९ , वेळ सायंकाळी अंदाजे ५.४५ / ६.०० , ठाणे पश्चिम , डॉबाबासाहेब आंबेडकर पुतळा , टेंभी नाका ,  ठाणे या स्मार्ट सिटी मधील हा एक अतिशय व्यस्त असा रहदारीचा रस्ता    रिक्षा वाला (  MH-04-HZ-4104  ) , भ्रमणध्वनीवर बोलत बोलत  रिक्षा चालवतो.   हे फक्त एक उदाहरण आहे , असे अनेक रिक्षा वाले  तीन पेक्ष्या जास्त प्रवासी बसवून सर्रासपणे रिक्षाहि वाहतूक करीत असतात .

रिक्षात तीन पेक्ष्या जास्त प्रवासीरिक्षावाल्यांना सगळ्या नियमातून सूट आहे का ? पोलिसांना हे दिसत नाही का ? हे थांबलं पाहिजे . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !





brother in law = मराठीत " भाभी "

brother in law = मराठीत  " भाभी "

अहो मी काही ढोसून नाही आलोय. हे असे भाषांतर GOOGLE या जगप्रसिद्ध संस्थेच्या संकेतस्थळावर मी जेंव्हा " brother in law meaning in marathi " असा प्रश्न टाकला तेंव्हा मिळालेले उत्तर आहे. 

माझ्या भावाच्या बायकोला काय म्हणायचे हा मला प्रश्न पडला आहे . तुमच्याकडे याचे उत्तर आहे ? 


Saturday, March 23, 2019

" प्राणी - पक्षी " संघटना गप्प का ? - साप्ताहिक "मुख्यमंत्री" - २५ मार्च, २०१८ ते ३१ मार्च, २०१९


" प्राणी - पक्षी " संघटना गप्प का ? - सत्यजित शाह
साप्ताहिक "मुख्यमंत्री" - २५ मार्च, २०१८ ते ३१ मार्च, २०१९

सध्या " पोपट " या एका मिठू मिठू करणाऱ्या  ( जो जे ऐकतो , जो जे शिकतो तेच बोलणाऱ्या )  एका  पक्ष्याला  ( राजकीय पक्ष्याला नव्हे तर  " पक्षी " असणाऱ्या पक्ष्यालाउगाचच भारतीय राजकारणात ओढून  ताणून गोवलं / ओढलं  जातंय , त्याला बदनाम केलं जातंय .  

या अगोदर अनेकदा राजकारण्यांनी अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , दररोज अंदाजे ,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या ,  पण अतिशय निरपराध , निष्पाप  अश्या  " कुत्रा " या  प्राण्याला देखील राजकारणात गोवले / ओढलं  होते

त्याचप्रमाणे घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा  , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या इतर अनेक निष्पाप  प्राणी , पक्षी यांना राजकारण्यांनी अनेकदा एकमेकांवर चिखलफेक ( रंगमंचमीची नव्हे ) करण्यासाठी  वापरून घेतले आहे

खरं तर हा त्या निष्पाप , मुक्या  पक्षी , प्राणी यांचा हा एक प्रकारे घोर अपमान आहे . पण गंमत पहा , भारत या देशात स्वसंरक्षणासाठी , श्वान दंशापासून वाचण्यासाठी मानव प्राण्याने " कुत्राया एका लोप पावत असलेल्या ( " लोप पावत असलेल्या " हे  उपरोधिक पणे म्हटले आहे ) (  अनिर्बंध संख्येने वाढणाऱ्या , दररोज अंदाजे ,५०,००० भारतीयांना श्वान दंश करणाऱ्या भारताच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या ,  पण अतिशय निरपराध , निष्पाप  अश्या  " कुत्रा " या  प्राण्याला )  " हाड " म्हटले , अथवा त्याला दगड मारला , काठी फेकून मारली कि कोठून तरी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संस्था वगैरे वगैरे धावून येतात , पोलिसांकडे तक्रार करतात   स्वसंरक्षणासाठी हाड करणाऱ्या , दगड मारणाऱ्या मानव प्राण्याला अटक करण्यास पोलिसांना भाग पाडतात . पण तेच प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , त्याच प्राणी संस्था , या अश्या इतर  पक्षी , प्राण्यांवर दिवस ढवळ्या , उघडपणे , प्रसार माध्यमांमध्ये , होणाऱ्या घोर अपमानावर मात्र मूग गिळून का गप्प बसले आहेत , गप्प बसतात  याचे कोडे मात्र मला कधीच सुटले नाही

" कुत्रे " नावाच्या प्राण्यांना वेगळा न्याय घोडे , गेंडा , माकड , म्हैस , बैल , रेडा , डुक्कर , घुबड , कावळा  , मांजर , बोका , उंदीर , . . . . . या इतर अनेक निष्पाप  प्राणी , पक्षी यांना वेगळा न्याय हे अयोग्य आहे . या पक्षपातीपणाचा  धिक्कार करावासा  वाटतो . हा अन्याय थांबला पाहिजे

ता. .  " पोपट " या पक्ष्याला मुका पक्षी नाही म्हणू शकणार कारण हा पक्षी जे ऐकतो , जे शिकतो तेच बोलतो