Monday, August 1, 2016

Stray Dogs Becomes Dangerous For Us



नमस्कार , आणि सुंदर संध्याकाळ ,


" Stray Dogs Becomes Dangerous For Us "


जे ९९.९० % भारतीयांना कधीच दिसत नाही , ते सगळं या ध्वनी चित्र फितीत दाखविले आहे .


आज सकाळीच मी सध्या रहात असलेल्या रहिवासी संकुलाच्या बाहेर कार्यालयात जाण्यासाठी माझ्या व्यावसायिक भागीदाराची वाट पहात होतो . माझ्यासमोर ते १० भटके कुत्रे अगोदर एका चार चाकी वाहनाच्या मागे धावत होते . ते वाहन पुढे गेल्यावर त्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका दुचाकीस्वाराला लक्ष्य केलं आणि त्याच्या मागे लागले . त्याच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न काही कुत्रे करीत होते. पण तो दुचाकीस्वार जोरात दुचाकी चालवून पळून जाण्याच्या नादात पडता पडता वाचला . मी हे सगळं टिपू शकलो नाही .


या चित्रफितीत डोंबिवलीच्या डॉक्टर आनंद हर्डीकर तळमळीने बोलताना दिसत आहेत . ते सुद्धा त्यांचे स्वतःचे रुग्णालय सांभाळून या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या विषयावर इतर अनेक प्रश्नांवर लढत असतात.

No comments:

Post a Comment