Saturday, July 30, 2016

ठाण्यात श्वानांची संख्या 55 हजार

नमस्कार ,

" ठाण्यात श्वानांची संख्या 55 हजार "

31 जुलै , 2016 च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .
माझ्या मते "ठाणे " महानगर पालिका हद्दीत आजच्या घडीला भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे 80,000 ते 90,000 असण्याची दाट शक्यता आहे . अहो "हिरानंदानी इस्टेट" या एका निवासी संकुलामध्ये अंदाजे 800 ते 1000 भटके कुत्रे आहेत. मी सध्या राहत असलेल्या "हाईड पार्क" या छोट्याशा निवासी संकुलामध्ये अंदाजे 60 ते 80 भटके कुत्रे आहेत. आमच्या लगतच्या परिसरात अंदाजे 200 ते 250 भटके कुत्रे आहेत.

त्याचप्रमाणे नसबंदी चे आकडे हे खरे वाटत नाहीत . जर एवढ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाली असेल तर जागो जागी भटक्या कुत्र्यांची पिल्लावळ कशी काय दिसते ? का यातही परकीय शक्तीचा , अथवा विरोधी पक्षाचा हात आहे ? का बाहेरील कुत्रे ठाण्यात येऊन पिल्लावळी वाढवून परत त्याच्या मूळ गावी जात आहेत ?

दुर्दैव हे आहे कि अजूनही एकाही राजकीय पक्षाला या अति गंभीर प्रश्नावर हालचाल करावीशी वाटत नाही


No comments:

Post a Comment