Wednesday, August 24, 2016

बिबट्याला ठार आणि भटक्या कुत्र्यांना मोकाट असा विचित्र न्याय का ?



नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

आत्ताच एका मराठी वृत्त वाहिनीवर ( आजच्या मराठीत ज्याला  NEWS CHANNEL  असे म्हणतात ) " नरभक्षक बिबट्याला वन कर्मचाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केले " हि बातमी पाहिली .  म्हणे हा बिबट्या नरभक्षक झाला होता आणि त्याने दोन मानव प्राण्यांना ठार केले होते.

आता हे पाहणे उचित ठरेल कि त्या वन कर्मचाऱ्यांना पोलीस कधी पकडताहेत त्यांच्यावर कोणती कडक कायदेशीर कार्यवाही  करणार आहेत..

हे मी असे म्हटले आहे , कारण , तुम्हा सगळ्यांना माहीत आहे कि गेली काही वर्षे "भारत" या देशात अनेक भटक्या कुत्र्यांच्या चाव्या ( श्वान दंशामुळे )  मूळे कितीतरी निष्पाप बालकांचा , मानव प्राण्यांचा बळी / प्राण गेला आहे . त्याच प्रमाणे अनेक निष्पाप मानव प्राण्यांना भटक्या कुत्र्यांनी  जखमी केले आहे . पण  एखाद्या मानव प्राण्याने स्वसौरक्षणासाठी अश्या भटक्या कुत्र्यांना जर दगड अथवा काठीने मारले तरीही अचानक कोठून तरी प्राणी मित्र , प्राणी मैत्रीण उगवते , पोलिसांना दूरध्वनी करतात , तत्परतेने पोलीस येतात , त्या दगड , काठी मारणाऱ्याला अटक करून पोलीस चौकीत  नेतात.

बिबट्या हा काय प्राणी नाही ? का फक्त भटका कुत्रा हाच एकमेव प्राणी या " भारत " देशात आहे ?

बिबट्याला ठार आणि भटक्या कुत्र्यांना मोकाट असा विचित्र न्याय का ?  

काय म्हणायचे ?

" मेरा भारत महान "






No comments:

Post a Comment