Thursday, August 4, 2016

मराठी टिकविणे / इंग्रजीची गुलामगिरी

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" मराठी टिकविणे "

सध्या सगळीकडे मराठी माणसे , मराठी वर्तमानपत्रे ,मराठी आकाशवाणी , मराठी दूरदर्शन , मराठी दुरर्दशन वाहिन्यांवरील मराठी मालिका , मराठी वृत्त वाहिन्या मराठी वाक्यांमध्ये एवढ्यांदा इंग्रजी शब्द वापरतात , कधी कधी तर संपूर्ण वाक्य / वाक्ये इंग्रजीत असतात. हे पाहून इंग्रजीची गुलामगिरी अजूनही गेली नाही असेच जणू वाटते.

पण सोमवार , 1 ऑगस्ट , 2016 च्या " लोकसत्ता " या वृत्तपत्रातील या बातमी च्या मथळ्यामध्ये " भ्रमणध्वनी " हा मराठी शब्द ( MOBILE च्या ऐवजी ) वापरल्यामुळे मला एवढा आनंद झाला आहे कि , हे सगळ्यांना कळवावेसे वाटले.

मराठी आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमाचे नाव " BREAKFAST SHOW " हे मी स्वतः ऐकले आहे. त्या कार्यक्रमाचे नावं " खमंग न्याहरी " , " खमंग नाश्ता " असे शुद्ध मराठी असू शकते. मी याबद्दल लगेच त्या आकाशवाणी केंद्रावर दूरध्वनी करून , जेंव्हा त्या कार्यक्रमाच्या निवेदकाशी बोललो तेंव्हा , त्याने संभाषणादरम्यान SORRY , MISTAKE , THANK YOU , अशी विविध इंग्रजी शब्दे देखील वापरली. मी मात्र कपाळाला ( स्वतःच्या ) हात मारून घेतला .

नुकतीच एका मराठी दूरदर्शन वाहिनीवर एक मराठी मालिका सुरु झाली आहे . त्यात तर म्हणे वाक्येच्या वाक्ये इंग्रजीमध्ये आहेत.

अशा अनेक गोष्टी आहेत जेथे मराठी माणसे इंग्रजीचा आसरा , इंग्रजीच्या कुबड्या का घेतात हे मला अजिबात कळत नाही .

मराठी हि एवढी नकोशी झाली आहे ?


No comments:

Post a Comment