Saturday, April 30, 2016

" १०८ " रुग्णवाहिका ( AMBULANCE ) सेवेला " जागरूक डॉक्टर " चा दणका

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,

" १०८ " रुग्णवाहिका ( AMBULANCE ) सेवेला " जागरूक डॉक्टर " चा दणका

२९.०४.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील बातमी येथे देत आहे. हि बातमी वाचून अनेकांनी “ अरे भारत देशात हे सगळ नेहमीच होतंच असते “असे म्हणून हे नेहमीप्रमाणे सोडून दिल ही असेल.

" चलता है ! " हे जे भारतीयांच्या रक्तात भिनले आहे ते अतिशय घातक असे आहे . या मुळेच शासकीय कर्मचाऱ्यांना कोणताच धाक राहिलेला नाही.

" चलता है ! " प्रमाणे " मीच का करू ? " हे एक पळपुटे पणाचे गोंडस कारण ( EXCUSE ) भारतीय प्रत्येक दुरावस्थेवर देत असतो.

डॉक्टर आनंद हर्डीकर हे वैद्यकीय व्यवसाय ( MEDICAL PRACTICE ) करतात. त्यांचे स्वतःचे रुग्णालय ( HOSPITAL ) डोंबिवली येथे आहे . तेही तुमच्या आमच्या सारखे त्यांच्या व्यवसायात मग्न असतात . त्यांनाही संसार ( बायको , मुल बाळ ) आहे . पण ते एक " जागरूक नागरिक " म्हणून जगतात त्याच प्रमाणे अनेक प्रश्नांवर लढतात देखील . दुसरा कोण तरी लढेल , माझ्या बापाचे काय जातील असे सोयीस्कर पणे म्हणून , पळवाट काढून प्रश्नांवर शांत रहात नाहीत .

त्यांना कधीही FB वर GOOD MORNING , GOOD EVENING , GOOD NIGHT करताना नाही पाहिले. त्यांना कधीही FB वर रोज नित्य नियमाने " सुविचार " टाकताना नाही पाहिले . हो पण त्यांना अनेकदा " सु आचार " करताना पाहिले . ते कधीही वारंवार FB वर PROFILE PICTURE बदलत नाहीत , तर " भारत " या देशाचे PICTURE बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. ते शक्यतो प्रतिक्रिया न देता क्रिया करण्यावर भर देतात.

खालील दोन ओळी जरूर वाचा आणि तुम्हीच ठरवा .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


No comments:

Post a Comment