Saturday, April 2, 2016

“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार “

“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना "ठाणे" वाहतूक पोलिस दंडाची पावती घरपोच करणार “
नमस्कार ,
बहुतेक एक वर्षाच्या वर झाले असेल डॉक्टर रश्मी ताई करंदीकर यांनी DCP TRAFFIC THANE याचा पदभार सांभाळून .
ठाणे येथील वाहतूक व्यवस्थापनाबाबत अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. वाहतुकीला शिस्त येत आहे . ९० % च्या वर नागरिक दुचाकीवर शिरस्त्राण घालीत आहेत. अनेक पोलिस देखील दुचाकीवर शिरस्त्राण घालीत आहेत.
वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण देखील वेगाने होत आहे . या बद्दल मी रश्मी ताई व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो.
" वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार " हि " पुण्यनगरी " या दैनिकात आलेले बातमी यासोबत जोडत आहे , व या खाली देखील UNICODE मध्ये देत आहे .
जर सगळ्यांनीच नियम पाळले तर , भारत देश कुठल्या कुठे पोहोचेल.


“ वाहतुकीचे नियम मोडणार्यांना दंडाची पावती घरपोच करणार “
ठाणे : ठाणे वाहतूक पोलीस आता वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना त्यांच्या दंडाची पावती घरपोच करणार आहेत. या कामी शहरातील सिग्नलवर बसवण्यात आलेल्या कॅमेर्यांची मदत घेण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील महामार्गावर असणार्या आनंदनगर, तीनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि कापूरबावडी या महत्त्वाच्या सिग्नलवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे थेट तीनहात नाक्यावरील ठाणे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. येथे नियंत्रण कक्षातील कर्मचारी त्यावर लक्ष ठेवतात. येथील एलसीडी स्क्रीनवर वाहतूक पोलीस शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवतात. शहरात मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्यातून अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणास्तव ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे अशा प्रकारे बेशिस्त चालकांना दंडाची पावती थेट घरपोच पाठवण्याची योजना मागील आठवड्यापासून सुरू केली आहे.


No comments:

Post a Comment