नमस्कार ,
पुणे येथे एका कुत्र्याने एका दिवसात ४६ पुणे करांना चावा घेतला .
या सोबत ३० .०९.२०१५ ची
बातमी देत आहे. अश्या अनेक घटना भारत भर नित्य नियमाने घडत असतात . काही छापून येतात तर काही छापून येत
नाहीत.
आपल्याला कल्पना नसेल पण
" भारत " या देशात रोज अंदाजे १,४१,९६० सामान्य भारतीयांना श्वान दंश होतो.
या श्वान दंशाच्या घटनांमध्ये
८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
काय म्हणालात तुम्हाला अजूनही
श्वान दंश झाला नाही ? अहो म्हणून निर्धास्त राहू नकात. भटक्या कुत्र्यांची संख्या
एवढ्या वेगात वाढत आहे कि " ठाणे " या महाराष्ट्रातील एका शहरात २०२१ साली
अंदाजे २७ लाख एवढे भटके कुत्रे असू शकतील.
( एक कुत्री वर्षातून दोन वेळा पिल्ले देऊ शकते . प्रत्येक वेळी तिला अंदाजे १२ पिल्ले होतात त्यातील ६ जगतात
व ६ जगत नाहीत. )
या भटक्या कुत्र्यांच्या
संख्येच्या अनिर्बध वाढीवर बहुतांश भारतीय अनभिज्ञ आहेत.
No comments:
Post a Comment