Monday, April 25, 2016

पाणी टंचाई तील , शहरातील पाणी नासाडी - WASTAGE OF WATER IN CITIES


नमस्कार ,

पाणी टंचाई तील , शहरातील  पाणी नासाडी

सगळा महाराष्ट्र पाणी टंचाई चा सामना  करीत आहे. सगळीकडे पाणी वाचविण्याचे प्रयत्न चालू आहेत , पण अजूनही  शहरातील अनेक इमारतींच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून या प्रकारे पाणी वाया  जात आहे.  शहरात पाणी जमिनीखालील टाकीत साचवीले  जाते आणि मग त्यातून गच्चीवरील टाकीत ते पंपाद्वारे चढविले जाते. खरे तर प्रत्येक गच्चीवरील टाकी मध्ये , टाकी पाण्याने भरल्यावर पाणी थांबण्यासाठी एक VALVE हवा असतो , त्याचप्रमणे पंप आपोआपच थांबला पाहिजे नाहीतर हे असे पाणी वाया जाते. अजूनही अनेक उंच इमारतींमध्ये टाकीतून पाणी वाया  गेल्यावर ( OVER FLOW )  जेम्हा ते गच्चीवरील खाली येणाऱ्या नळीतून ( PIPE ) मधून खाली येते तेंव्हा खाली असलेला पहारेकरी ( WATCHMAN ) पंप बंद करतो. पाणी वाया जाऊन ते  पंप बंद होई पर्यंत रोज भरपूर पाणी वाया गेलेले असते.   या प्रकारे आजच्या या पाण्याच्या भयानक टंचाई मध्ये देखील हजारो लिटर पाणी असेच वाया जात आहे.

नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र ( OCCUPATION CERTIFICATE ) देताना हे सगळ बहुतेक पाहिले जात नाही असेच यावरून दिसते. असह्य अनेक इमारती महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये असतील.


 या सोबत एक छायाचित्र जोडले आहे , त्यावरून तुम्हाल या  पाण्याच्या नासाडीची कल्पना येईल.

No comments:

Post a Comment