नमस्कार ,
अडीच वर्षाच्या मुलाला भटक्या
कुत्र्याचा चावा
आहे मी हे काही मनातले सांगत
नाही . हि घटना महाराष्ट्र राज्यातील डोंबिवली
मधील गांधीनगर या भागातील आहे.
२४.०४.२०१६ च्या "
महाराष्ट्र टाईम्स " या वर्तमान पत्रातील हि बातमी वाचा म्हणजे तुम्हाला माझ्या
सारखी , डॉक्टर आनंद हर्डीकर - डोंबिवली यांच्या सारखी वेडी माणसे या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या
अनिर्बंध वाढीविरुद्ध का लढत आहे हे कळेल.
कुत्र्याच्या चाव्याचा जोर
( BITE FORCE INTENSITY ) हा मानवी चाव्याच्या जोरापेक्ष्या ४ पट असतो. म्हणजे विचार
करा ज्याला श्वान दंश होतो त्याचे काय हाल होत असतील.
तुम्हाला माहित नसेल पण
श्वान दंशाच्या घटनांमधील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.
काय म्हणालात जोपर्यंत तुमच्या
जवळच्यांपैकी कोणाला श्वान दंश होणार नाही तोपर्यंत तुम्ही गप्प बसणार ?
No comments:
Post a Comment