Following news article was published in Thanevarta
ठाणे महापालिका आयुक्त असीम
गुप्ता यांनी परिवहन सेवेला
बस दुरूस्तीसाठी ३
कोटीचं अनुदान मंजूर केलं
आहे. ठाणे महापालिका
आयुक्त असीम गुप्ता
यांनी काल आमदार
एकनाथ शिंदे आणि
इतर पदाधिका-यांसमवेत
परिवहन आगाराची पाहणी केली.
यावेळी किरकोळ दुरूस्ती अभावीही
अनेक बसेस आगारामध्ये
पडून असल्याचं त्यांच्या
निदर्शनास आणण्यात आलं. आज
असीम गुप्ता यांनी
या बस दुरूस्तीसाठी
३ कोटी रूपये
मंजूर केले आहेत.
या पैशातून फक्त
सुटे भाग खरेदी
करून बसेस दुरूस्त
करायच्या आहेत. या अनुदानामुळं
येत्या १५ दिवसात
आगारातील किमान ५० बसेस
रस्त्यावर धावू शकतील.
यामुळं परिवहन सेवेचं प्रति
बस मागे १३
हजार रूपये उत्पन्न
वाढू शकणार आहे
आणि यामुळं परिवहन
सेवेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही
हातभार लागणार आहे. आगाराची
पाहणी केल्यानंतर ज्या
९३ बसेस दुरूस्तीच्या
पलिकडे गेल्या आहेत अशा
बसेसचा लिलाव करण्याचा निर्णयही
पालिका आयुक्तांनी जाहीर केला
आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment