Go through the following latest news of stray dog bite.
How many days this will continue ?
पहिले पान » ठाणे,
ताज्या
घडामोडी
July 19, 2014 09:28:08 AM |
नालासोपा-यातील शाळेत शिक्षिका, विद्यार्थ्यांना कुत्रा चावला
श्रीमती
इरावती देवी हिंदी हायस्कूलमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने वर्गात कृष्णा बावरिया या शिक्षिकेवरच हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली.
नालासोपारा - कळव्यात कुत्र्याने लहान
मुलींवर हल्ला करून लचके
तोडल्याची घटना ताजीच
असतानाच शुक्रवारी येथील श्रीमती
इरावती देवी हिंदी
हायस्कूलमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने वर्गात
कृष्णा बावरिया या शिक्षिकेवरच
हल्ला केल्याची घटना
शुक्रवारी घडली.
विशेष
म्हणजे स्वत:वर
हल्ला झालेला असतानाही
या शिक्षिकेने आपल्या
वर्गातील मुलांना वाचवले. जखमी
शिक्षिकेला वसई महापालिकेच्या
सर डीएम पेटीट
रुग्णालयात दाखल केले
आहे. वसई- विरार
परिसरात कुत्र्यांची दहशत असताना
महापालिका मूग गिळून
गप्प आहे.
श्रीमती
इरावती देवी िहदी
हायस्कूलमध्ये दुपारी दोनच्या सुमारास
पिसाळलेला कुत्रा वर्गात शिरला.
त्याने विद्यार्थ्यांच्या अंगावर हल्ला केला.
बावरिया यांनी त्याला वर्गातून
हाकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा
त्याने शिक्षिकेच्या दोन्ही हातांना आणि
डाव्या पायाला जोराचा चावा
घेतला.
कुत्र्याला
घाबरून वर्गातील मुले आपला
जीव मुठीत घेऊन
पळापळ करत होते.
तेव्हा ही घटना
समजलेल्या स्थानिक नागरिकांनी कुत्र्याला
हाकलून शिक्षिकेला वाचवले. जखमी
शिक्षिकेला वसई महापालिकेच्या
सर डीएम पेटीट
रुग्णालयात दाखल केले.
हा कुत्रा वर्गात
शिरल्यानंतर त्याने लहान मुलांना
लक्ष्य केले.
मात्र,
शिक्षिकेने धाडस करून
कुत्र्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी
तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन
शिक्षिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
केले. महापालिकेच्या अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांना याची
माहिती देऊनही त्यांनी या
घटनेची दखल घेतली
नसल्याचा आरोप गायकवाड
यांनी केला.
या
शिक्षिकेच्या उपचाराचा सर्व खर्च
पालिकेने उचलून तात्काळ मोकाट
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा
राष्ट्रवादीच्या वतीने पालिकेवर आंदोलन
छेडण्यात येईल, अशा इशारा
गायकवाड यांनी दिला. वसई
विरार महापालिकेने मोकाट
कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि त्यांचा
बंदोबस्तासाठी लाखो रुपयांची
तरतूद केली. पण
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
संपलेला नाही.
No comments:
Post a Comment