Saturday, July 5, 2014

कोपरी पुलाचं रुंदीकरण तातडीने मार्गी लावण्याची माजी आमदार संजय केळकर यांची मागणी



Following news article with photo in attachment  is published at Thanevarta.



कोपरी पुलाचं रुंदीकरण तातडीने मार्गी लावण्याची माजी आमदार संजय केळकर यांची मागणी

पुर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरीपुल रुंद करण्याच्या मागणीसाठी काल माजी आमदार संजय केळकर यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकेश निगम यांची भेट घेऊन या पुलाच्या कामातील अडथळे दुरु करण्याची मागणी केली. कोपरी पुलाचं रुंदीकरण करण्याचा विषय २००३ पासुन प्रलंबित आहे. कोपरी पुलाचं रुंदीकरण त्वरेनं करावं यासाठी स्वाक्षरी अभियानही करण्यात आलं होतं. या पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम खातं रेल्वेकडे तर रेल्वे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवुन आपली जबाबदारी झटकतं आहे. पुर्व द्रुतगती महामार्ग जवळपास पदरी झाला असुन कापुरबावडीतील माजिवाडा पुलही लवकरचं खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. पदरी असलेला हा रस्ता कोपरी पुलावर चौपदरी होत असल्यानं सकाळसंध्याकाळ हया पुलावर वाहतुक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. अडीचशे मिटरचा हा पुल ओलांडण्याकरीता वाहनांना बराचं वेळ लागतो. त्यामुळे या पुलाचं रुंदीकरण त्वरेनं करावं अशी मागणी संजय केळकर यांनी या भेटीत केली. २००३ मध्ये रुंदीकरणासाठी येणारा कोटीचा खर्च आता ५० कोटीच्या आसपास गेला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आराखडे देत नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे तर रेल्वे आराखडे मंजूर नसल्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याचं म्हणणं आहे. येत्या सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात एक बैठक होणार असुन या बैठकीत या प्रश्नावर निर्णय होईल अशी आशा आहे.
 

 

No comments:

Post a Comment