Thursday, July 17, 2014

ठाण्यात रोज ३१ जणांना श्वानदंश! Article in Maharashtra Times Sep 26, 2012, 02.00AM IST

This is a news article published on 26th Sept. 2012. Now almost 2 years have passed. Situation must have been WORSEN .

Come on THANEKAR WAKE UP FROM THIS DEEP SLEEP.  RAISE YOUR VOICE.

DO NOT WAIT TILL YOU OR YOUR NEAR AND DEAR TO SUFFER FROM STRAY DOG BITE.
ठाण्यात रोज ३१ जणांना श्वानदंश!
Sep 26, 2012, 02.00AM IST 

भटक्या कुत्र्यांच्या समस्येने ठाणेकर बेजार

>> आशिष पाठक

ठाण्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येबरोबरच श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दररोज सरासरी ३० जणांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून ठाणे महापालिका हद्दीत ४ हजार ६६९ जणांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच नगरपरिषदांच्या हद्दीतही थोड्याफार फरकाने तितक्याच लोकांचा कुत्र्यांनी चावे घेतल्याच्या घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या समस्येने खरोखरीच गंभीर रूप धारण केल्याचे दिसून येत आहे.

श्वानप्रेमींकडून भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहण्याची मागणी सतत केली जात असते. मात्र या कुत्र्यांच्या संख्यावाढीवर प्रभावी निर्बंध नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या कुत्र्यांचा संरक्षण किंवा पाळण्यासाठीही उपयोग नसतो.
त्यांना रोगप्रतिबंधक लसी दिल्या नसल्याने, अशा कुत्र्यांनी चावा घेतल्यास असाध्य रेबीज आजार होऊ शकतो. रेबीजवरील लस सहजपणे उपलब्ध होईलच याचीही खात्री नसते. त्यामुळे कुत्र्यांविषयी लोकांच्या मनात असलेला तिटकारा अधिकच वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात तब्बल १ हजार ६७ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यापासून ४ हजार ६६९ व्यक्तींना श्वानदंश झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली. याचा अर्थ सरासरीचा विचार करता दिवसाला ठाण्यात ३० जणांना श्वानदंश होतो!

जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, अंबरनाथ, बदलापूर आदी नगरपरिषदांच्या हद्दीत एप्रिल महिन्यापासून ऑगस्टअखेरपर्यंत ४ हजार ५७५ जणांना कुत्रे चावले. जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागात त्याच कालावधीत ४ हजार ६०५ श्वानदंशाचे प्रकार घडले आहेत. या घटनांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. रात्री उशिरा कामावरुन पायी परत येणारे नोकरदार आणि कुत्र्यांची खोड काढणारी लहान मुले साधारणपणे या कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान डोंबिवलीत एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या एक वर्षभरात १० हजार ४२७ जणांना कुत्रे चावले आहेत . गेल्या ऑगस्टमध्ये हा आकडा ८११ वर गेल्याने ही समस्या रोखण्यासाठी येथील पशुवैद्यक डॉ . मनोहर अकोले आणि ' रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन ' तर्फे रेबीजचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत . त्यासाठी २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत भटक्या कुत्र्यांना अॅण्टी रेबीज लसीकरण सप्ताह राबवला जातोय . गेल्या ३ दिवसांत डॉ . अकोले व त्यांच्या टीमने तब्बल ३६२ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले आहे . या सप्ताहात किमान पाचशे भटक्या कुत्र्यांना अॅण्टी रेबीज लसीकरण करण्याचे उद्दीष्ट्य ठरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment