पिसाळलेल्या कुत्र्याचा ४० जणांना चावा Jul 12, 2014, 07.05PM IST म.टा.वृत्तसेवा,येवला
येवला शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ४० जणांना चावा घेतला असून यापैकी तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरम्यान, या कुत्र्यामुळे परिसातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येवला शहरातील मोमीनपुरा भागात या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालतांना अनेकांना चावा घेतला. धामोडे गावाच्या दिशेने हा पिसाळलेला कुत्रा मोमीनपुरा भागात येताना त्याने वाटेत येणाऱ्या प्रत्येकालाच चावा घेत इकडून तिकडे अन् तिकडून इकडे मोठा धुमाकूळ घातल्याचे जखमी व प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सुमारे चाळीस जणांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे वृत्त असून येवला शहरातील ग्रामीण रुग्णालयात १० जुलै रोजी १९ तर १२ जुलै रोजी २ अशा एकूण २१ जण कुत्र्याच्या चावत जखमी झाल्याची नोंद झाली आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात या सर्व जखमींना 'रेबीज'च्या लशीचे इंजेक्शन टोचण्यात आल्यानंतर तातडीने नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इम्रान शेख (अडीच वर्षे), प्रतीक चाटेकर(११), शिव थोरात(५), राजू राजपूत(२८), मोहम्मद अन्सारी(४), शेख मोहम्मद हुसेन (८०), शेख अहमद (३२), शकीलाबाई ठाणगे (४०), सुखदेव लभडे,(८०), भाऊसाहेब लभडे(५५) दोघेही रा.निमगाव मढ, ता. येवला, पुष्पा शेंद्रे (४५), शानू शेंद्रे (४) दोघेहीरा.कोटमगाव, ता. येवला, भूषण गायकवाड(१०), शबाबी हाफिज अहमद(६०), मोहनराज पगारे (५२), शेख फारुख (५५), जतीन जाधव (५०), तब्बसुम कुरेशी (३४), शिलाबाई खंडागळे (४०), सौदागर मोहम्मद कासीम (६०), नुरीला अन्सारी (६५), सरस्वती दुनबळे, रा.वडगाव बल्हे,ता. येवला,हनुमान शिंदे (३१) रा.कुसमाडी, ता. येवला,अंजुम जावेद अख्तर (साडेचार वर्षे) आदींसह २१ जण या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यात गंभीर जखमी झाले आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याने पहाटे चार ते सकाळी आठ नऊ पर्यंत थैमान घातले होते अशी माहिती पुढे आली आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात या जखमींवर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत भडांगे यांनी तातडीने उपचार केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment