Monday, January 1, 2018

" ONE MAN ARMY " चळवळींसाठी "जनादेश पुरस्कार"

नमस्कार ,  

३१ डिसेम्बर, २०१७ रोजी , मला माझ्या अनेक " ONE MAN ARMY " चळवळींसाठी दैनिक " जनादेश " च्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात "जनादेश पुरस्कार" देण्यात आला.

" जनादेश " हे ठाणे येथून प्रसिद्ध होणारे एक मराठी दैनिक आहे.  हे दैनिक श्री. कैलाश म्हापदी या एका तरुणाने १४ वर्षांपूर्वी  खरी पत्रकारिता टिकविण्यासाठी सुरु केले . 

दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी , ते  समाजातील निवडक व्यक्तींचा "जनादेश पुरस्कार" देऊन गौरव करतात . 

गंम्मत  म्हणजे ज्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका  दरवर्षी अगदी खोऱ्याने ( अनेक व्यक्तींना ) विविध पुरस्कार देतात अहं  वाटतात , त्याप्रमाणे न करता  श्री. कैलाश म्हापदी  हे  निवडक ४ / ५ व्यक्तींनाच  पुरस्कार देतात .त्यामुळेच हा पुरस्कार घेताना आनंद झाला.  महत्वाचं म्हणजे मला उपस्थितांसमोर माझे विचार मांडायची संधी  देखील श्री. कैलाश म्हापदी यांनी दिली . 

असो . माझ्या बरोबर अन्य ५ व्यक्तींचा देखील "जनादेश पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आला . 

एक महत्वाचं सांगायचं राहीलं  कि श्री. कैलाश म्हापदी यांनी हे पुरस्कार आम्हाला कोणत्याही राजकारणी व्यक्तींच्या हस्ते न देता , समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करणाऱ्या  व्यक्तींकडून दिला गेला. 

एका  अतिशय आगळ्या वेगळ्या समारंभाचा साक्षीदार असल्यामुळे हे सगळं तुमच्यासमोर आणलं . 

असो , माझ्या लढाया या अनेक वर्षांपासून चालू आहेत त्या अशाच चालू आहेत . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 



No comments:

Post a Comment