Monday, January 8, 2018

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा का साजरा करावा लागतो ?

प्रति , 

प्रत्येक मराठी माणूस , आकाशवाणी वर मराठी कार्यक्रम सादर करणारे मराठी भाषिक निवेदक , निवेदिका , मराठी मालिकांचे लेखक , लेखिका , मराठी वृत्त वाहिनीवर मराठी भाषेत बातम्यासादर करणारे मराठी भाषिक पुल्लीगी , स्त्रीलिंगी बातमीदार , दूरचित्रवाहिनींवरील मराठी निवेदक , निवेदिका , . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
नमस्कार , आणि प्रसन्न सकाळ  ,
माझ्या मनातील खंत मी येथे मांडत ( ओकत ) आहे .
असे कळते कि , मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी  भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर दि.  ते  १५  जानेवारी २०१८  हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडाम्हणून साजरा करण्याच्याशासनाने निर्णय घेतलेला आहे. (  हि माहिती  https://dioparbhaninews.blogspot.in/2017/12/1-15.html  येथे पाहू शकता ) 

माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे दि.  ते  १५  जानेवारी  हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडाम्हणून साजरा केला आहे .  

लक्ष्यात घ्या कि मराठी मातीतच, मराठी भाषेचे संवर्धन करावे  लागते , यातच सगळं सामावलं आहेतामिळनाडू मध्ये कधीही तामिळ भाषेचे , गुजरात मध्ये कधीही गुजराथी भाषेचे , जर्मनी मध्ये जर्मन भाषेचे ,चीन मध्ये चिनी भाषेचे , , . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  कधीही संवर्धन आठवडा , पंधरवडा , महिना वगैरे साजरा करून भाषेचे संवर्धन , पुनर्रुजीवन केलेले कधी ऐकिवा नाही .
मग मराठी भाषेलाच ते सुद्धा मराठीच्या मायभूमीत असे करण्याची का निकड भासते याचा कधी तरी मराठी माणसाने विचार केला आहे ? 

याचे कारण एकदम सोप्प आहे ( हेच वाक्य मराठी माणूस कसे बोलेल ते पहा " याचे REASON ( कारण ) एकदम SIMPLE ( सोप्प ) आहे " ) 

माझे हेच म्हणणे आहे की , दोन / अनेक मराठी व्यक्ती अव्यावसायि कामासाठी  एकत्र जमतात , तेंव्हा देखील ते संभाषणात शक्य तितके शुद्ध मराठी शब्दवाक्ये का नाही वापरत ? दुसरा हसेल म्हणू ? याचा अर्थ अश्या व्यक्तींना स्वतःच्या आई ची देखील लाज वाटते ? अहो मराठी हिआपली मातृ भाषा आहेया भाषेत बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याचा का हो भरमसाठ वापर करायचा ? 

आजकाल , आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रम , दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम , मराठी मालिका , मराठी बातम्या , मराठी जाहिराती , या  इतर अनेक ठिकाणी इंग्रजीचे यावह असे अतिक्रमण झाले आहेजसा संगणकात जंतू ( VIRUS शिरतो अथवा शरीरात कर्करोगाचा  ( CANCER चा जंतू शिरतो ,  सगळ्याचा नायनाट करतो , तसेच  काहीसे  मराठी भाषेच्या बाबतीत हि झाले आहे.
अहो  आकाशवाणी वरील एका मराठी कार्यक्रमात एका वाक्यात ROMANTIC हा एक इंग्रजी शब्द त्याच प्रमाणे ENJOY हा एक इंग्रजी शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही म्हणून हेलिहिण्याचा सगळा प्रपंच.
. ) ROMANTIC = शृंगारिक , ( तुम्हाला काय वाटतं कि शृंगार हा ROMANTIC नसतो ?  . ) गाणे ENJOY करा = गाण्याचा आस्वाद लुटा ( तुम्हाला काय वाटतं कि गाण्याचा आवड घेतल्यावर ENJOY करता येत नाही ? )
अहो तुम्हाला जर झुणका भाकर खायची आहे आणि झुणका BREAD , दिल तर कसं वाटेल ?
फेसबुक वर एक शुद्ध मराठी आडनाव असलेल्या स्त्रीलिंगी व्यक्तीने मराठीत लिहिले होते त्यातील काही वाक्ये येथे देत आहे " मला आणि माझ्या मिस्टरांना ( नवऱ्याला ) माझ्या SCHOOL  ( शाळे )  मध्ये CHIEF GUEST ( प्रमुख पाहुणे ) म्हणून INVITE केलं  ( आमंत्रित केलं  )  होत.. फारच TOUCHY EXPERIENCE ( हृदयस्पर्शी अनुभव ) होता. " .  ती स्त्रीलिंगी व्यक्ती  मराठी माध्यमातील शाळेतच शिकली होती .  अहो नवऱ्याला मिस्टर म्हटल्यावर तो काय जगा वेगळा ठरतो ?  
अहो कधी तरी तुम्ही दोन व्यक्तींना इंग्रजी बोलताना 
. ) COME ON WE WILL GO FOR नाश्ता / जेवण                                                                                                                                                                                                  . ) I WILL DROP   YOU घरी ........ वगैरे असे ऐकले आहे ? नाही ना ? मग मराठी माणसालाचमराठी माणसात , १० % मराठी बोलण्याची लाज का वाटते ? का मराठीत शब्द नाहीत ? हो मराठी सारखी प्रघल्भ  गोड भाषा नाही . का हो मराठी माणसाला मराठी बोलताना इंग्रजी शब्द , इंग्रजी वाक्ये याच्या सदा  दा कुबड्या घ्याव्या लागतात ?
असं तर नाही ना कि शुद्ध मराठी बोलणे अश्या मराठी व्यक्तींना कमी प्रतिष्ठेचे ( BELOW DIGNITY ) वाटतं कि काय ?
एक शेवटचे , हे सगळं मी एक अमराठी माणूस असून देखील हि  मला वाईट वाटते . 
भविष्यात बहुतेक मराठी भाषिक त्यांच्या पुढच्या पिढीला ( NEXT GENERATION ) ला माझ्या सारख्या एखाद्या अमराठी व्यक्ती कडे शुद्ध मराठी शिकण्यासाठी शिकवणी ( TUITION  )लावतील . 
इंग्रजी शब्दांना समानार्थी मराठी शब्द हवे असतील तर मला विचारा , माझ्या पोतडीत  नेहमी वापरल्या जाणाऱ्या अंदाजे ४००० इंग्रजी शब्दांचे समानार्थी मराठी शब्द आहेत.
पुन्हा आपल्या सगळ्यांना कळ कळीची व नम्र विनंती आहे कि मराठी त बोला , मराठीत लिहा , मराठीला जगवा ,

आपला कृपाभिलाषी ,
सत्यजीत  शाह - ठाणे
०९८२११५०८५८



No comments:

Post a Comment